10th SSC Hall Ticket 2026 Download Process In Marathi : दहावी परीक्षेच हॉल तिकीट जारी

10th SSC Hall Ticket 2026 Download Process In Marathi : असं करा स्टेप बाय स्टेप डाउनलोड

10th SSC Hall Ticket 2026 Download Process : दहावी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा पाया असतो. दहावीची परीक्षा म्हटलं की प्रत्येक विद्यार्थ्याचे त्याचबरोबर विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या आई-वडिलांच्या मनाची घालमेल सुरू असते. आता दहावीची परीक्षा अगदी मोजक्याच दिवसांवर येऊन ठेपली आहे.

SSC Hall Ticket दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात म्हणजेच आता पुढील महिन्यात सुरू होणार आहेत. दहावीच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ची घाई झाली आहे.

HSC 12th Board Exam Online Hall Ticket Download 

दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने MSBSHSE 19 जानेवारी रोजी दहावीच्या हॉल तिकीट जारी केले आहे. दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत पार पडणार आहे.

SSC Hall Ticket दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी केवळ एक महिना शिल्लक आहे. त्याआधी बोर्डाने mahahsscboard.in आणि mahahsscboard.maharadhtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट जारी केले आहेत. हे हॉल तिकीट तुम्ही डाऊनलोड करू शकता.

हे हॉल तिकीट कसे डाउनलोड कराल हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहू. हे हॉल तिकीट डाउनलोड करून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. शाळेकडून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिले जाईल. परंतु विद्यार्थ्यांनाही त्यापूर्वी जर हॉल तिकीट बघायचे असेल तर तुम्ही या साइटवर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करून शकता.

हॉल तिकीट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. शाळेकडून हॉल तिकीट दिले जाईल. या हॉल तिकिटावरील मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला परीक्षेसाठी बसता येणार आहे. चला तर जाणून घेऊ दहावीच्या हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे.

दहावीच्या हॉल तिकीट असे करा डाउनलोड

10th SSC Hall Ticket 2026 Download Process

सर्वप्रथम तुम्हाला mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशन मध्ये एसएससी या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर लॉगिन फॉर इन्स्टिट्यूट येईल तेथे शाळांनी लॉगिन करायचे आहे.
त्यानंतर साइन इन हेअर यावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकून सबमिट या बटनवर क्लिक करा.
त्यानंतर रोल नंबर टाकून एसएससी हॉल तिकीट डाउनलोड करा .