26 january 2025 speech in marathi : 26 जानेवारी निमित्त मराठीत भाषण
26 january 2025 speech in marathi : नमस्कार मित्रहो, तुम्हालाही 26 जानेवारी निमित्त तुमच्या शाळेत, कॉलेजमध्ये भाषण करायचे आहे तर या लेखाच्या माध्यमातून आपण आज 26 जानेवारी निमित्त केले जाणारे भाषण अत्यंत सोप्या शब्दांमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया भाषणाला…
26 january speech in marathi : आदरणीय व्यासपीठ, गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनो, आज आपण आपल्या देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम या शुभदिनी आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
26 january speech in marathi : 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु खरे स्वातंत्र्य तेव्हाच मिळते जेव्हा देशाची स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येते. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचे संविधान अंमलात आले आणि भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. Republic Day
26 january speech in marathi : प्रजासत्ताक दिन हा भारताच्या इतिहासातला एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान लागू झाले. पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आपण Republic Day प्रजासत्ताक दिन का साजरा करतो? हा दिवस आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्व शहीदांना आणि स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या बलिदानामुळेच आपल्याला आज स्वतंत्र देश मिळाला.
आपण या दिवशी विविध कार्यक्रम करत असतो जसे की,
Republic Day Speech : देशभर राष्ट्रीय ध्वज फडकावून या दिवसाची सुरुवात होते, राजपथवर भव्य सैन्य परेड आयोजित केली जाते, देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीगीत म्हणून देशभक्तीची भावना व्यक्त केली जाते. असे विविध कार्यक्रम आपण या दिवशी साजरी करत असतो.
Republic Day Speech : 26 जानेवारी हा दिवस आपल्याला या देशाच्या महान स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो. या महान स्वतंत्र्य सैनिकांनी संघर्षाने बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यासारख्या महान व्यक्तिमत्त्व यांनी आपल्याला देशाच्या सेवेत कर्तव्याचा धडा शिकवला आहे.
Republic Day Speech In Marathi स्वातंत्र्य हा केवळ अधिकार नाही तर आपली एक जबाबदारी आहे. जवाहरलाल नेहरु यांनी 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अमलात आणण्यासाठी निवडण्यात आला होता.
Republic Day Speech In Marathi आपला देश आणखीन कशी प्रगती करेल यावर आपण सर्वांनी काम केले पाहिजे. 26 जानेवारी हा दिवस आपल्याला देशाची एकता व अखंडता कायम राखण्याचा संदेश देतो म्हणून आपण 26 जानेवारी अत्यंत उत्साहाने साजरा करतो.
शेवटी मी एवढेच म्हणेन :
“या भारतात बंधुभाव नित्य वसू दे,
दे वरचि असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे।”
वंदे मातरम्