7 Year Old Brutally Beaten by Teacher : 7 वर्षाच्या मुलाला स्पेलिंग चुकीसाठी शिक्षिकेने केली मारहाण

7 Year Old Brutally Beaten by Teacher : 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण

7 Year Old Brutally Beaten by Teacher : Ambernath School Horror अंबरनाथ शहरातील धक्कादायक घटना. एका इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग आलं नाही म्हणून शिक्षिकेने 7 वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या शिक्षिकेने चिमुकल्या मुलाच्या पाठीवर आणि पायावर काठीने फटके दिले आहेत. ही घटना उघडकीस आल्यावर संतापाची लाट उसळली आहे. त्या शिक्षिके विरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ambernath School Horror अंबरनाथ शहरातील पश्चिमेला असणाऱ्या साऊथ इंडियन शाळेत लहान मुलाला बेदम मारहाण केल्याचा अमानुष प्रकार घडला. मुलाचे वय फक्त 7 वर्ष असून तो दुसरी इयत्तेत शिकत आहे. घटनेच्या दिवशी त्या विद्यार्थ्याला त्याची वर्गशिक्षिका विजयश्री शकेवार हिने एका शब्दाचे स्पेलिंग विचारलं होतं परंतु त्या मुलाला ते स्पेलिंग सांगता आलं नाही त्याच ते स्पेलिंग चुकलं ते पाहून ती शिक्षकाची चीडली आणि तिने काठी घेऊन त्या चीमुरड्या मुलाच्या पाठीवर आणि पायावर फटके बसवले. हा सगळा प्रकार पाहता सगळीकडे संतापाची लाट उसळली आहे.

यामुळे तो मुलगा खूप घाबरला त्या दिवशी घरी आल्यावर तो खूप गप्प होता. मुलाचं काहीतरी बिनसलं हे लक्षात आल्यावर त्याच्या आईने त्याला प्रेमाने जवळ घेतले व त्याची विचारपूस केली. आईने त्याला जसे जवळ घेतले तसाच त्याला त्याच्या रडण्याला बांधा फुटला आणि त्याने रडत रडत आईला शाळेत घडलेला सगळा प्रकार सांगितला.

Ambernath School Horror शिक्षिकेने मुलाला मारहाण केल्याच ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली व आईलाही खूप राग आला मात्र तिच्या त्या वागण्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मुलाच्या आईने अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली. शिक्षिका विजयश्री शकेवार हिच्या विरोधात तक्रार नोंदवली. त्या आधारे पोलिसांनी शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा अजामीनपात्र असून त्यामुळे आता या शिक्षिकेला जेलची हवा नक्कीच खावी लागणार आहे.

Ambernath School Horror या घटनेमुळे अंबरनाथ मध्ये संताप पसरला आहे. लहान मुलांना अशी वागणूक कोण देऊ शकत असे नागरिक विचारत आहेत आणि त्या शिक्षिकेला शिक्षा करा असे म्हणत आहेत.