8th Pay Commission Implemented From Today : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती होणार वाढ
8th Pay Commission 2026 : सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाची एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नवीन वर्ष 1 जानेवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. यामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना याचा मोठा लाभ होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारीपासून आठवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र नवीन वेतन आयोग अंतर्गत पगार वाढ येण्यास उशीर होणार आहे. काही दिवसांनी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग अंतर्गत पगार दिला जाणार आहे. या संदर्भात शिफारस सादर केली आहे. यासाठी 18 महिन्यांचा वेळ आहे.
पगार कितीने वाढणार?
सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना आता प्रतीक्षा आहे की त्यांचा पगार किती वाढेल. मात्र आठव्या वेतन आयोगातील पगार वाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते.
उदाहरणार्थ, कर्मचाऱ्यांचा मूळ पगारा 18 हजार रुपये असेल तर तो वाढवून 51480 होऊ शकतो. आठव्या वेतन आयोग अंतर्गत 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शन धारकांना लाभ होणार आहे. केंद्र सरकार दर 10 वर्षांनी वेतन आयोग लागू करते. यापूर्वी 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता.
कोणाचा पगार कितीने वाढणार?
आठव्या वेतन आयोगानुसार बेसिक सॅलरीमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
- लेव्हल 1 कर्मचाऱ्यांचा पगार 18000 वरून तब्बल 38 हजार 700 रुपये होईल.
- लेव्हल 2 ज्या कर्मचाऱ्यांचा पगार 29,200 रुपये आहे त्यांचा 62780 रुपये होईल
- लेव्हल 10 कर्मचाऱ्यांचा पगार 56 हजार 100 रुपयावरून 1 लाख 20 हजार 615 होण्याची शक्यता आहे.
- लेव्हल 15 मध्ये कर्मचाऱ्यांचा पगार 1 लाख 81,200 वरून 3 लाख 91 हजार 730 रुपये होण्याची शक्यता आहे.
- लेव्हल 18 पदासाठी कर्मचाऱ्यांचा पगार 250000 लाख रुपयावरून 5 लाख 37 हजार 500 रुपये होईल.