Magel Tyala Vihir Anudan Yojana 2025 In Marathi : सरकार देत आहे विहीर खोदण्यासाठी 5 लाख रुपये
Magel Tyala Vihir Anudan Yojana 2025 In Marathi : राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी एक योजना आणली आहे.
Magel Tyala Vihir Anudan Yojana 2025 In Marathi : या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 5 लाख रुपयापर्यंतचे अनुदान दिले जाते. मागेल त्याला विहीर योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते. ही योजना काय आहे ते आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Magel Tyala Vihir Anudan Yojana 2025 In Marathi : महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत मागेल त्याला विहीर ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी 5 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.
Agriculture Well Subsidy Scheme : या योजनेत कामाची मंजुरी सामग्री 60.40 प्रमाण किमान 0.40 व कमाल दोन हेक्टर हे सलग क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. अधिक क्षेत्राच्या लाभधारकांसाठी सामूहिक विहीर सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.
ठळक विशिष्टे
Magel Tyala Vihir Anudan Yojana Features
- शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विहीर खोण्यासाठी राज्य सरकारकडून 5 लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार.
- विहीर खोदण्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी कायमस्वरूपी हक्काचे पाणी उपलब्ध होईल.
- यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादन वाढण्यास मदत होईल.
- शेतीमध्ये सिंचनाची सुविधा झाल्याने तरुण वर्ग ही शेतीकडे वळेल.
- या योजनेची पात्रता, आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे.
- महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी 5 लाख रुपयांची अनुदान योजना सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी सहज आणि कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होणार आहे.
- मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे.
- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये नवीन विहीर खोदण्यासाठी मनरेगा योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते.
- या योजनेअंतर्गत विहीर खोदल्यानंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आकारावर विहिरीच्या प्रकारावर आणि परासरातील उपलब्ध पाण्याचे जलसंधारण स्थितीनुसार अवलंबून आहे.
योजनेची उद्दिष्टे
Magel Tyala Vihir Anudan Yojana Purpose
- आपल्या शेतात विहीर खोदल्यानंतर शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होईल यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. शेतीला पाणी मिळाल्यामुळे तरुण वर्ग ही शेतीकडे वळण्याची शक्यता आहे.
- पाण्याअभावी होणारे शेतीचे नुकसान थांबण्यास मदत होईल. अशा विहीर खोदण्यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या ही कमी होईल.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
Magel Tyala Vihir Anudan Yojana Benefits In Marathi
Agriculture Well Subsidy Scheme शेतात पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी बागायती पिके घेऊ शकतील. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्यामुळे शेतकरी आर्थिक समृद्ध होईल आणि त्याचे उत्पन्न वाढेल. शेतीला योग्य वेळी पाणी मिळाल्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही.
योजनेची पात्रता व अटी
Magel Tyala Vihir Anudan Yojana Terms
- अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- त्याच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे किमान 1 एकर जमीन असावी. त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आधीपासूनच विहीर नसावी. ही अट ही ठेवण्यात आली आहे.
- अर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे.
- शेतकरी विहीर खोदत असलेल्या ठिकाणापासून 500 मीटरच्या परिसरात दुसरी विहीर नसावी.
- अर्जदाराने यापूर्वी सरकारच्या विहीर खोदण्याच्या योजनेचा लाभ घेतल्या नसावा.
- याबरोबरच शेतकरी अर्जदार मंडळीच्या जॉब कार्ड धारक कुटुंबाचा सदस्य असणे आवश्यक आहे.
योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Magel Tyala Vihir Anudan Yojana Documents
अर्जदाराचे आधार कार्ड
रेशन कार्ड
उत्पन्न दाखला
बँक पासबुक
रहिवासी प्रमाणपत्र
ग्रामसभेचा ठराव
शेतीचा सातबारा आठ अ उतारा
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
अर्जदाराच्या जातीचा दाखला आवश्यक असल्यास
विहीर योजनेची अर्ज प्रक्रिया
Magel Tyala Vihir Anudan Yojana Apply Online
Magel Tyala Vihir Anudan Yojana शेतकरी maha-egs horticultural हे ॲप डाऊनलोड करून ऑनलाईन अर्ज करू शकतात. याबरोबरच ग्रामपंचायतीमार्फत ही अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यामुळे शेतकरी सोप्या पद्धतीने आपला अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर तो तालुकास्तरावरील मनरेगा कार्यालयात वर्ग केला जाईल. त्यानंतर तुमचे आवश्यक कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे. पात्र लाभार्थ्याची यातून निवड केली जाईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना विहिरीच्या कामाला मंजुरी देण्यात येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल. त्या अनुदानाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतामध्ये विहीर खोदू शकतो. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या मनरेगा केंद्राशी संपर्क साधू शकता किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवकाशी चर्चा करून या योजनेची माहिती घेऊ शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न:- मागेल त्याला विहीर योजना द्वारे किती अनुदान मिळते?
उत्तर:- पात्र शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी 5 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते.
प्रश्न:- या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय?
उत्तर:- शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याच्याकडे एक एकर जमीन असावी व त्याच्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
प्रश्न:- ऑनलाइन अर्ज कुठे करावा?
शेतकरी maha-egs horticultural हे ॲप डाऊनलोड करून यावर अर्ज करू शकतात किंवा ग्रामपंचायतीमार्फत अर्ज करू शकता.
प्रश्न:- मागील त्याला विहीर योजनेचे फायदे काय?
उत्तर:- या योजनेअंतर्गत सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल आणि शेतकरी समृद्ध होईल.