Marathwada Flood Relief News 2025 In Marathi : शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज

Marathwada Flood Relief News 2025 In Marathi : शेतकऱ्यांना राज्य सरकारची मदत जाहीर, दिवाळीपूर्वी मिळणार?

Marathwada Flood Relief News 2025 In Marathi : राज्यात झालेल्या अधिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांची पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे.

Marathwada Flood Relief राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे, घराचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

Marathwada Flood Relief या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांची पॅकेजची घोषणा केली आहे. याबरोबरच त्यांनी मदतीसाठीची 2 हेक्टरची मर्यादा हटवून ती 3 हेक्टर केली आहे. Marathwada Flood Relief News 2025 In Marathi त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मात्र ही रक्कम दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Marathwada Flood Relief News यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की. पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाईल. तसेच डोंगरी भागातील नुकसानग्रस्त घरांना 10 हजार रुपये अधिकची रक्कम देण्यात येणार आहे. याबरोबरच नुकसान झालेल्या दुकानदारांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी काय मदत?

Marathwada Flood Relief News 2025 In Marathi

Marathwada Flood Relief News राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील जमीन खरडून गेलेली आहे, अशा शेतकऱ्यांना पुन्हा माती टाकावी लागेल असे फडणवीस म्हणाले. यासाठी त्यांना 47 हजार रुपये प्रति हेक्टरी भरपाई दिली जाणार आहे. याबरोबरच प्रति विहीर 30 हजार रुपयाची मदत गाळ काढण्यासाठी ही दिली जाणार आहे. कारण अनेकांच्या विहिरीमध्ये पुराचे पाणी जाऊन त्यामध्ये गाळ साचला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Marathwada Flood Relief News 2025 In Marathi

Marathwada Relief Packege राज्यात एक कोटी 43 लाख 52 हजार 281 जमिनीवर पिकाची लागवड करण्यात आली होती. यापैकी जवळपास 68 लाख 69 हजार 756 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात काही जमिनीचे अंशतः नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी जमिनीवर पूर्ण पिकाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

सरसकट शेतकऱ्यांना मदत..

Marathwada Relief Packege राज्यात झालेल्या अतिवृष्टी मध्ये 29 जिल्ह्यामध्ये नुकसान झाले आहे. 253 तालुक्याचा मदतीसाठी आम्ही सरसकट समावेश केला आहे.

Marathwada Flood Relief News 2025 यामध्ये 2059 मंडळाचा समावेश आहे. या मंडळामध्ये पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने 65 मिलिमीटर पाऊस पडण्याची आठ शिथिल केली आहे. तिथे पिकाचे नुकसान झालं आहे त्या सगळ्या भागाला मदत देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे.

फडणवीस यांच्या नेमक्या घोषणा काय?

Marathwada Flood Relief News 2025

  • ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे. त्यांना 47 हजार रुपये प्रति हेक्टरी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. याबरोबरच 3 लाख रुपये प्रति हेक्टर मनरेगाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. त्यामुळे खरडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एकूण साडेतीन लाख रुपये मदत देण्यात येणार आहे.
  • अतिवृष्टीमध्ये पूर्णपणे नष्ट झालेल्या, पडझड झालेल्या घरांना नवीन घर बांधण्यासाठी सरकार मदत करणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील नवीन घर समोर ठेवून त्यांना पूर्ण पैसे त्या घराची निर्मिती करण्यासाठी दिले जाणार आहे.
  • डोंगरी भागातील घरांना 10 हजार रुपये अतिरिक्त आर्थिक मदत केली जाणार आहे.
  • जिथे कमी प्रमाणात घराची पदर झाली आहे, झोपडपट्ट्याची पडझड झाली आहे. त्यांनाही काही प्रमाणात मदत केली जाणार आहे.
  • गाईच्या गोठ्यासाठी वेगळी मदत राज्य सरकार करणार आहे.
  • ज्या दुकानदाराचे नुकसान झाले आहे. त्यांना 50 हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
  • ज्यांच्या जनावराचा यामध्ये मृत्यू झाला आहे अशांना प्रति जनावर 37 हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत.एनडीआरएफच्या मदतीमध्ये तीन जनावरांनाच मदत करता येते. मात्र राज्य सरकार मृत्यू झालेल्या प्रत्येक जनावरासाठी मदत करणार आहे. ही मदत ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32 हजार रुपये प्रति जनावर असणार आहे.
  • कुक्कुटपालन करणाऱ्यांना प्रति कोंबडी शंभर रुपये एवढी नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
  • अतिवृष्टीमुळे अनेक भागातील शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण शेतकऱ्यांना माती आणून ती जमीन व्यवस्थित करावी लागेल. यासाठी राज्य सरकार त्यांना 47 हजार रुपये हेक्टरी रोख रक्कम देणार आहे. याबरोबरच मनरेगाच्या माध्यमातून तीन लाख रुपयांची हेक्टरी मदत करण्यात येणार आहे म्हणजे खरडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना साडेतीन लाख रुपयांचे मदत होणार आहे.
  • पुराच्या पाण्यामुळे किंवा अधिक अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये गाळ जमा झाला आहे अशा शेतकऱ्यांना विहिरीतील गाळ काढण्यासाठी 30 हजार रुपये प्रति विहीर मदत देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

याबरोबरच राज्य सरकारकडून अन्नधान्याच्या कीटही दिल्या जाणार आहेत.

ग्रामीण भागामध्ये ज्या पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी दहा हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थिती झालेल्या तालुक्यांमध्ये शेती वीज पंपाची वीज जोडणे अबाधित राहील. त्यामुळे नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई मिळेल. टंचाईच्या काळात करण्यासारख्या सगळ्या गोष्टी राज्य सरकार करणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पिक भरपाई बाबत काय घोषणा?

Marathwada Flood Relief News In Marathi देशात NDRF नियमानुसार 8500 रुपये प्रति हेक्टरी कोरडवाहू शेतीला दिले जातात. हंगामी बागायती शेतीला 17000 रुपये प्रति हेक्टरी आणि बागायती शेतीला 55 हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी मदत केली जाते. त्यामध्ये 65 लाख हेक्टर साठी 6175 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

याबरोबरच पुढील पिके घेता यावे यासाठी अतिरिक्त 10 हजार रुपये प्रति हेक्टर मदत शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. यासाठी 6500 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे.

म्हणजेच कोरडवाहू शेतकऱ्याला हेक्टरी एकूण 18 हजार 500 रुपये मिळतील. हंगामी बागायती शेतकऱ्याला 27 हजार प्रति हेक्‍टरी मिळतील आणि बागातील शेतकऱ्यांना 32500 मदत मिळेल.

Marathwada Flood Relief 2025 In Marathi महाराष्ट्र राज्यामध्ये 45 लाख शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढलेला आहे. विमा काढणारे शेतकऱ्यांना याव्यतिरिक्त पूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 17000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे दिले जातील. त्यामुळे त्यांचा विमा उतरलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे कोरडवला 35 हजार रुपये आणि बागायतीला 50 हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळेल.

पीक विम्यातून कमीत कमी पाच हजार कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे. राज्य सरकारच्या वतीने एकूण 31 हजार 628 कोटी रुपयांचा पॅकेज राज्यातील शेतकऱ्यांना दिले आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळणार?

Marathwada Flood Relief 2025

Marathwada Flood Relief In Marathi राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेज तर घोषित केले. मात्र कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत मिळेल याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, परभणी, वाशिम जालना आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये 50 टक्क्याहून अधिक नुकसान झाले आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यात 75 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

लातूर धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये 80 ते 100% नुकसान झाले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल. तिथे जेवढे नुकसान झाले आहे त्याप्रमाणे मदत शेतकऱ्यांना दिली मिळेल.