day nulm national urban livelihood mission benefits in marathi : रोजगार- व्यवसायासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज

काय आहे सरकारची DAY-NULM योजना

day nulm national urban livelihood mission benefits in marathi : जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, त्यातून रोजगार मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे. कारण या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 10 लाख रुपयाचे कर्ज कमी व्याजदरामध्ये उपलब्ध करून दिले जात आहे.

काय आहे केंद्र सरकारची DAY-NULM योजना? कोणाला मिळतो या योजनेचा लाभ? याची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत.

DAY-NULM या योजनेच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. याद्वारे तुम्हाला प्रशिक्षण, मदत, वैयक्तिक किंवा समूह अंतर्गत व्यवसायासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज, फेरीवाल्यांसाठी मार्केटिंग आणि प्रशिक्षण याबरोबरच गरजूंना राहण्याची सुविधा ही दिली जाते.

day nulm national urban livelihood mission benefits in marathi : देशातील शहरी भागातील गरिबांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन (DAY-NULM) 2013 मध्ये सुरू करण्यात आले.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शहरी भागामध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबांना मदत करून त्यांची गरीबी आणि असुरक्षितता कमी करणे आणि त्यांना रोजगार व आत्मनिर्भर बनण्याची संधी देणे हा आहे.

day nulm national urban livelihood mission benefits : ही योजना आवास आणि शहरी कार्य मंत्रालय अंतर्गत चालवली जाते. या योजनेचा उद्देश म्हणजे शहरी भागातील गरिबांना स्वयंरोजगार आणि कुशल रोजगार देणे. या योजनेअंतर्गत सरकार कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वस्त दराने कर्ज, आजीविका मदत आणि सामुदायिक संघटना निर्माण करण्यावर भर देते.

स्टील सेंटर- सेल्फ हेल्प ग्रुपद्वारे प्रशिक्षण व रोजगाDAY-NULM च्या अंतर्गत शहरांमध्ये स्किल सेंटर स्वयंसहायता समूह स्थापन करण्यात आले आहे, जेणेकरून गरिबांना प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि रोजगार मिळू शकेल.

कशी काम करते DAY-NULM योजना?
ही योजना अनेक स्तरावर काम करते. या अंतर्गत शहर उपजीविका केंद्रामध्ये प्रशिक्षण आणि नोकरीच्या संधी दिल्या जातात.

day nulm national urban livelihood mission benefits in marathi : बचत गट गरीब महिलांसाठी व्यवसाय करण्यासाठी, त्यांना स्वयंरोजगाराची दिशा देण्यासाठी मदत करते. याव्यतिरिक्त सबसिडीवर असणारे कर्ज 5 ते 7 टक्के एवढ्या कमी दराने उपलब्ध करून देण्यात येते. प्रशिक्षण घेणाऱ्या नागरिकांना स्थानिक बाजार किंवा संस्थाशी जोडून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

कोणाला घेता येतो योजनेचा लाभ
शहरी भागात राहणारे गरीब कुटुंब आणि महिला. स्ट्रीट वेंडर किंवा फेरीवाले ज्यांना कामासाठी प्रशिक्षण आणि कर्ज हवे आहे.
बेघर व्यक्ती ज्यांना राहण्यासाठी घर नाही आणि जागेची आवश्यकता आहे.
तरुण वर्ग जे स्वयंरोजगार आणि स्किल प्रशिक्षण द्वारे रोजगार मिळवू इच्छित आहेत.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
सर्वात प्रथम ऑनलाइन अर्ज करण्यासाठी DAY-NULM च्या अधिकृत वेबसाईट https://null.gov.in/ ला भेट द्या. त्यानंतर अप्लाय फॉर स्कीम किंवा सेल्फ अप्लॉयमेंट प्रोग्राम हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमच्यासमोर एक ऑनलाईन अर्ज येईल तो भरा आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करून सबमिट करा.

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
day nulm national urban livelihood mission benefits : तुम्ही तुमच्या शहरातील नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालयात जाऊन यासाठी अर्ज करू शकता. तिथे गेल्यानंतर तुम्ही nulm उपजीविका मिशन कार्यालयाशी संपर्क साधा. तिथून अर्ज घेऊन अर्ज भरा. त्यासोबत आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक आणि व्यवसाय संबंधित माहिती भरा आणि अर्ज त्यांच्याकडे सबमिट करा.

प्रशिक्षण आणि मदत

तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्ही पात्र आहात का याची तपासणी केली जाईल. यानंतर निवड झालेल्या तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि कर्ज स्वीकृतीची सुविधा दिली जाईल.