Devendra fadnavis 11 thousand crores for farmers affected by heavy rains css in marathi : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 15 दिवसात मिळणार पैसे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Devendra fadnavis 11 thousand crores for farmers affected by heavy rains css in marathi : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसारासाठी राज्य सरकारने 32 हजार कोटी रुपयांची पॅकेज घोषित केले आहे. यातील आतापर्यंत 8 हजार कोटी रुपयांची वितरण सरकारकडून करण्यात आले असून याचा लाभ 40 लाख शेतकऱ्यांना झाला आहे.

Maharashtra government approves 11000 crore flood relief for farmers ffected by September heavy rains : यातच आणखी 11 हजार कोटी रुपये वितरित करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ही 11000 कोटीची मदत पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

Devendra fadnavis 11 thousand crores for farmers affected by heavy rains css in marathi : सरकारने पॅकेज घोषित करून अनेक दिवस उलटले तरी शेतकऱ्यांना अजून एक छदामही मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत आज बच्चू कडूनच्या नेतृत्वाखाली नागपूरला संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Maharashtra government approves 11000 crore flood relief for farmers ffected by September heavy rains : सरकारने पॅकेजची घोषणा केली मात्र पैसे कधी देणार? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. त्यावर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 11000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना पंधरा दिवसाच्या आत ही मदत त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Devendra fadnavis 11 thousand crores for farmers affected by heavy rains css in marathi : आमचे सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यांना आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहोत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी 11000 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही.

Maharashtra government approves 11000 crore flood relief for farmers ffected by September heavy rains : पुढील पंधरा दिवसात अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. ही मदत अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील किमान 90% शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यापूर्वी जशा याद्या मिळाल्या तसा निधी वितरित करण्यात आला. ज्यांना केवळ दोन हेक्टरसाठी मदत मिळाली आहे त्यांना पुढील हेक्टरसाठी सहाय्य दिले जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Devendra fadnavis 11 thousand crores for farmers affected by heavy rains css in marathi : काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत तर काहींच्या नोंदीमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाते असल्याचे दिसून आले आहे. या सर्व बाबी तपासून उर्वरित दहा टक्के शेतकऱ्यांपर्यंत तातडीची मदत पोहोचण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

Maharashtra government approves 11000 crore flood relief for farmers ffected by September heavy rains : कुठलेही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत. अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जाऊ नये यासाठी ई-केवायसी केली जात आहे. ॲग्रीस्टॅकचा डेटा राज्य सरकार कडे असून यामध्ये ज्या शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे त्यांची पुन्हा ई केवायसी केली जात नसून सहायता निधी थेट त्यांच्या खात्यात जमा रक्कम जमा करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शेतमाल विक्रीसाठी नोंदणी करा

Devendra fadnavis 11 thousand crores for farmers affected by heavy rains css in marathi : राज्यामध्ये शेतमालाच्या खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. अशा नोंदणी मुळे पारदर्शकता आली असून आता शेतकऱ्यांना हमीभाव मिळत आहे.

Devendra fadnavis 11 thousand crores for farmers affected by heavy rains css in marathi : यापूर्वी व्यापारी शेतकऱ्याकडून कमी दराने माल घेऊन सरकारला जास्त दराने विकत असत. नोंदणी केल्यामुळे सरकारी खरेदी केंद्रावर किंवा सरकारने जारी केलेल्या हमीभावाप्रमाणे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच मालाची विक्री करण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.