नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड (NHB) योजना
national horticulture board nhb cold storage subsidy scheme in marathi : केंद्र सरकारची नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड देशभरामध्ये कोल्ड स्टोरेज आणि हॉर्टिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चरला प्रोत्साहन देण्यासाठी 7.5 कोटी रुपये पर्यंतचे अनुदान देत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी, कंपन्या आणि कृषी संबंधित उद्योगासाठी 35 ते 50 टक्के पर्यंत कॅपिटल कॉस्टची सबसिडी देण्यात येत आहे.
national horticulture board nhb cold storage subsidy scheme : शेतकऱ्यांच्या फळ, भाज्या आणि बागायती उत्पादनचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी आणि त्याला चांगला दर मिळवण्यासाठी सरकारने अनुदानची योजना सुरू केली आहे. या अंतर्गत नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड कोल्ड स्टोरेज बनवण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि आधुनिक बनवण्यासाठी मदत करत आहे.
या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना आधुनिक आणि ऊर्जा वाचवणारे कोल्ड स्टोरेज तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहन करण्यात येत आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डची ही योजना (कॅपिटल इन्व्हेस्टमेंट सबसिडी स्कीम फॉर कोल्ड स्टोरेज) या नावाने चालवली जात आहे.
याचा उद्देश फळे, भाज्या आणि नाशिवंत बागायती उत्पादनासाठी आधुनिक साठवणुकीचे भंडार सुविधा तयार करणे आहे. जेणेकरून भाजीपाला तोडल्यानंतर किंवा फळे तोडल्यानंतर त्याचे कमीत कमी नुकसान व्हावे आणि शेतकऱ्यांना त्याचे चांगले दर मिळावे. जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल आणि नाशवंत फळाचे – भाज्यांचे नुकसान होणार नाही.
किती मिळते सबसिडी
केंद्र सरकार या योजनेअंतर्गत 35 ते 50 टक्के पर्यंत सबसिडी देते.
सामान्य क्षेत्रात प्रोजेक्ट उभारण्यासाठी 35 टक्के अनुदान देण्यात येते.
पूर्वोत्तर राज्य, डोंगरी राज्य आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 50% पर्यंत अनुदान देण्यात येते.
अधिक तर सबसिडी मर्यादा 7.50 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त काही विशेष तंत्रज्ञानासाठी अतिरिक्त मदतही दिली जाते.
Controlled Atmosphere Generator साठी 1.25 कोटी रुपये युनिट पर्यंत.
Specialized CA Doors साठी 2.5 लाख रुपये प्रति डोरपर्यंत.
PLC उपकरणे आणि आधुनिक इन्सुलेशन टेक्नॉलॉजीवरही वेगळी मदत दिली जाते.
कोण करू शकते अर्ज
ही योजना कुठलाही व्यक्ती, कंपनी, शेतकरी गट किंवा सहकारी संस्था या सर्वांसाठी खुली आहे. ज्यांना कोणाला कोल्ड स्टोरेज युनिट बनवायचे आहे किंवा आधुनिक करायचे आहे त्यांच्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे.
या योजनेमध्ये अनेक प्रकारच्या प्रोजेक्टचा समावेश आहे. चला जाणून घेऊ कुठकुठले प्रोजेक्ट आहेत..
1 नवीन कोल्ड स्टोरेज युनिट बनवण्यासाठी.
2 जुने कोल्ड स्टोरेज विस्तार करण्यासाठी किंवा मॉडेलायझेशन करण्यासाठी.
3 controlled Atmosphere {CA} असणारे कोल्ड स्टोरेज.
4 विशेष करून ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळाचे उत्पादन घेतले जाते.
कर्जा संबंधित फायदे
ही योजना एक क्रेडिट लिंक सबसिडी योजना आहे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला बँकेतून कर्ज घेणे आवश्यक असते. योजनेअंतर्गत शेतकरी किंवा उद्योजक बँकेतून कर्ज घेऊन कोल्ड स्टोरेज प्रॉडक्ट तयार करू शकतात किंवा विस्तार करू शकतात. जेव्हा प्रोजेक्ट पूर्ण होईल तेव्हा नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड त्याची तपासणी करेल, तपासणी केल्यानंतर सबसिडी बँक ऍड्रेस फॉर्म म्हणजेच नंतर देण्यात येईल.
अर्ज प्रक्रिया
प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा – कोल्ड स्टोरेजची डिझाईन, क्षमता, तंत्रज्ञानाची माहिती आणि येणारा खर्च यामध्ये दाखवा.
NHB ला अर्ज जमा करा – अर्जासोबत प्रोजेक्ट अहवाल आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करा.
तांत्रिक तपासणी – NHB ची अधिकृत संस्था प्रोजेक्टच्या तांत्रिक बाबींची तपासणी करेल.
कर्ज मिळणे आणि निर्मिती – बँक कर्ज मंजूर करते आणि प्रोजेक्ट सुरू केला जातो.
सत्यापण आणि अनुदान वितरण – काम पूर्ण झाल्यानंतर एनएचबी निरीक्षण करते आणि पात्रतेनुसार अनुदान सबसिडी दिली जाते.
कुठे लागू आहे ही योजना
national horticulture board nhb cold storage subsidy scheme in marathi : केंद्र सरकारची ही योजना देशभरामध्ये संपूर्ण राज्यांसाठी लागू आहे. मात्र पूर्वोत्तर डोंगरी आणि अनुसूचित क्षेत्रासाठी विशेष प्राधान्य देण्यात येते. ही योजना विशेष करून अशा परिसरासाठी लागू केली जाते तिथे नाशिवंत फळे जसे की चेरी- सेफ आदीचे उत्पादन अधिक आहे.
सोलर पावर्ड स्टोरेज सारख्या योजनावर काम करत आहे सरकार
सरकार आता या योजनेला अधिक प्रभावी बनवण्याच्या दिशांमध्ये काम करत आहे. यामध्ये अनुदानाची रक्कम वाढवणे, नवीन तंत्रज्ञान सारखे सोलर पावर्ड कोल्ड स्टोरेजचा समावेश करणे आणि अन्य कृषी योजना सोबत एकत्रीकरणाच्या दिशेमध्ये सुधारणा करण्यात येत आहे.