village level soil testing lab scheme apply online in marathi : आपल्या गावात उघडा मृदा परीक्षण लॅब

Village level soil testing lab scheme : सरकार देत आहे दीड लाख रुपये, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

village level soil testing lab scheme apply online in marathi : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना स्वस्त माती तपासणी सुविधा देण्यासाठी आणि गाव स्तरावर रोजगार वाढवण्यासाठी व्हिलेज लेवल सॉईल टेस्ट लॅब (VLSTL) योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण तरुण, बचत गट आणि कृषी संबंधित उद्योजक आपल्या गावामध्ये सॉईल टेस्टिंग लॅब म्हणजेच माती परीक्षण प्रयोगशाळा उघडू शकतात. यासाठी केंद्र सरकार दीड लाख रुपयांची आर्थिक मदत करत आहे.

ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने मृदा परीक्षण म्हणजेच सॉईल टेस्टिंग लॅब योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गावामध्ये राहणारे तरुण, बचत गट आणि कृषी संबंधित उद्योजक आपल्या गावामध्येच सॉईल टेस्टिंग लॅब उघडू शकतात.

कृषी मंत्रालयाच्या नवीन योजनेअंतर्गत आता गाव स्तरावर व्हिलेज लेवल सॉईल टेस्टिंग लॅब उघडली जाऊ शकते. ही लॅब तरुण, बचत गट समूह, rawe प्रोग्राम अंतर्गत प्रशिक्षित कृषी सखी, कृषी विद्यालयातील विद्यार्थी किंवा pacs संबंधित उद्योजक ती चालू शकतात. सरकार या योजनेअंतर्गत दीड लाख रुपये आर्थिक मदत देते.

किती खर्च आणि किती मिळते मदत

Village level soil testing lab scheme गाव पातळीवर सॉईल टेस्टिंग लॅब सुरू करण्यासाठी दीड लाख रुपये पर्यंतची रक्कम केंद्र सरकारकडून देण्यात येते.

यातील एक लाख रुपये माती परीक्षण साठी आवश्यक असणाऱ्या मशनरीसाठी आणि एक वर्षाच्या वार्षिक मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट (AMC) वर्क खर्च होतात तर 50000 हजाराचा उपयोग डिस्टल वाटर, एचपी मीटर, कंडक्टिविटी मीटर, इलेक्ट्रॉनिक बॅलेन्स, क्लास वेअर आणि अन्य आवश्यक साहित्य खरेदीसाठी दिले जातात. सरकार ही संपूर्ण रक्कम लाभार्थीच्या खात्यावर एकरकमी डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) च्या माध्यमातून जमा करते.

योजनेचा मुख्य उद्देश

village level soil testing lab scheme apply online in marathi : या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना गाव स्तरावर स्वस्त आणि सहज माती परीक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्यांना माती परीक्षणासाठी दूर गावी जाण्याचे काम पडू नये. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि योग्य अहवाल मिळेल.
रिपोर्टच्या आधारावर फर्टीलायझरची योग्य मात्रा निश्चित केली जाईल.
मातीची गुणवत्ता आणि आरोग्य संदर्भात जागृती निर्माण होईल.
शेतीवर होणारा खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ होईल.
ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
स्थानिक स्तरावर मातीची तपासणी होईल आणि मिळालेला डेटानुसार रिसर्चसाठी मदत होईल.

कोणाला मिळेल लाभ

soil testing lab scheme तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही दहावी परीक्षा विज्ञान हा विषय घेऊन पास होणे आवश्यक आहे. यासोबतच कम्प्युटरचे नॉलेज असणे, ते चालवता येणे आवश्यक आहे. लॅबसाठी अर्जदाराकडे स्वतःची जागा असावी किंवा चार वर्षाचे रेट एग्रीमेंट असावे.
अर्जदाराने सर्वात प्रथम vlstl साठीची जागेची निवड करावी. नंतर जमीन आणि उपकरण खरेदीसाठी कागदपत्र जमा करावेत.
जिल्हास्तरीय कमिटी हा प्रस्ताव तपासेल, त्यानंतर राज्यस्तरावरील कमिटी एक महिन्याच्या आत याला परवानगी देईल. त्यानंतर राज्य सरकार एका आठवड्यामध्ये आर्थिक मदत देईल. रक्कम मिळाल्यानंतर 15 दिवसाच्या आत उद्योजकाला उपकरण आणि साहित्य खरेदी केल्याच्या पावत्या जमा कराव्या लागतील.

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

माती परीक्षण लॅब सुरू करण्यासाठी अर्जदाराकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. ज्यामध्ये स्वतःच्या मालकीची जमीन किंवा किरायाने घेतलेली जमिनीचे अग्रीमेंट, बँक डिटेल्स आणि अर्जदाराचा फोटो आवश्यक आहे. या व्यतिरिक्त राज्यनुसार काही याव्यतिरिक्त कागदपत्रे ही लागू शकतात. याची माहिती तुम्हाला स्थानिक कृषी विभागाकडून दिली जाईल.