ration card applying process you need not to go any office for it can apply online through umang mobile app : आता घरी बसल्या बनवा रेशन कार्ड

मोबाईल ॲपद्वारे असा करा अर्ज

आता राशन कार्ड बनवण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवण्याची आवश्यकता नाही. आता तुम्ही घरी बसल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया…

Ration Card Online Applying Process : देशात आजही अनेक असे लोक आहेत की जे दोन वेळाचे रेशन खरेदी करू शकत नाहीत. अशा गरीब आणि गरजवंत कुटुंबासाठी भारत सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम अंतर्गत स्वस्त दरात किंवा मोफत धान्याची सुविधा दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक परिवारा जवळ रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.

यापूर्वी रेशन कार्ड तयार करण्यासाठी लोकांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागल्या होत्या आणि त्यानंतर अनेक महिलांच्या प्रतीक्षेनंतर रेशन कार्ड तयार होत असे. मात्र आता सरकारने ही प्रक्रिया खूप सोपी केली आहे. आता तुम्ही घरी बसून मोबाईल ॲपच्या द्वारे रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.

UMANG ॲपद्वारे करा घरी बसून अर्ज

जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड बनवायचे आहे तर आता यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला केवळ तुमच्या मोबाईल मध्ये उमंग ॲप डाऊनलोड करावे लागेल. अँड्रॉइड युजर याला गुगल प्ले स्टोअर वरून आणि आयफोन यूजर ॲपल स्टोर वरून हे ॲप डाऊनलोड करू शकतात. ॲप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलद्वारे रजिस्ट्रेशन करून घ्या.

त्यानंतर होम पेजवर जाऊन सर्विस सेक्शन मध्ये जा. खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला Utility Service अंतर्गत तुम्हाला रेशन कार्डचा पर्याय दिसेल. तिथे Apply Ration Card या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपले राज्य निवडा आणि विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख आणि पत्ता भरा. त्यानंतर आपली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा. तुमचा अर्ज भरून पूर्ण होईल.

कोण करू शकतो ॲपद्वारे अर्ज

सध्या उमंग ऍप द्वारे देशातील काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येच रेशन कार्ड साठी अर्ज केला जाऊ शकतो. यामध्ये चंदीगड लडाख, दादर आणि नगर हवेली यांचा समावेश आहे. या ठिकाणावरील लोक या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात. इतर राज्यांमध्ये ही सुविधा लवकरच सुरू होणार आहे. सरकार सतत ही सेवा अन्य राज्यापर्यंत पोहोचण्यासाठीबकाम करत आहे.

यामुळे प्रत्येक गरजूला डिजिटल माध्यमातून सुविधा मिळेल. याचा फायदा म्हणजे आता लोकांना सतत सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता पडणार नाही. केवळ मोबाईल द्वारे काही क्लिक करून घरबसल्या रेशन कार्ड साठी अर्ज करू शकता. येणाऱ्या काळामध्ये ही सुविधा संपूर्ण देशामध्ये लागू होणार आहे.