Ladki Bahin Yojana e-KYC Process In Marathi : अन्यथा 18 नोव्हेंबर नंतर मिळणार नाही लाभ
Ladki Bahin Yojana e-KYC Process In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना eKYC पूर्ण करावी लागणार आहे. लाडक्या बहिणीना ही eKYC पूर्ण करण्यासाठी 18 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर एवढा 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. आज तो कालावधी संपायला केवळ 1 दिवस बाकी राहिला आहे. तरीही अजून लाखो महिलांची eKYC प्रक्रिया अपूर्ण आहे.
Ladki Bahin Yojana e-KYC Process ई-केवायसी ची मुदत संपण्यास एकच दिवस शिल्लक राहिला असल्याने लाडक्या बहिणींमध्ये खळबळीचे वातावरण सुरू झाले आहे.
Ladki Bahin Yojana e-KYC Process लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी पती किंवा वडिलांचे आधार कार्ड प्रमाणीत करून घ्यावे लागते. मात्र अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या वडिलांचे किंवा पतीचे निधन झाले आहे. अशा महिलांना eKYC प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती.
Ladki Bahin Yojana e-KYC मात्र आता यावर तोडगा निघाला आहे. अशा महिलांना eKYC पूर्ण करण्यासाठी वडिलांचे किंवा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटीत महिला असतील तर त्यांच्यासाठी घटस्फोटीत प्रमाणपत्र अपलोड करावे लागणार आहे.
Ladki Bahin Yojana e-KYC या महिलांसाठी वेबसाईट मध्ये तांत्रिक बदल करण्यात येणार आहेत. मात्र अशा महिलांना त्यांचा आधार कार्ड क्रमांक प्रमाणित करून eKYC अपूर्ण ठेवावी लागणार आहे. म्हणजेच महिलांना त्यांचे आधार कार्ड प्रमाणित करून अर्धी प्रोसेस या योजनेची 18 तारखेच्या आत करावी लागणार आहे.
पती किंवा वडील नसणाऱ्या महिलांना कसा मिळेल लाभ
Mukhyamantri Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिला लाभार्थ्यांच्या पती किंवा पती आणि वडील दोघांचा मृत्यू झाला आहे किंवा ज्या अविवाहित महिलांचे वडील मृत आहेत, तसेच विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता महिला यांना ई-केवायसी करताना आधार क्रमांक कोणाचा नोंदवायचा अशी अडचण निर्माण झाली होती. हा प्रश्न आता सुटलेला आहे. वेबसाईट मध्ये तांत्रिक बदल करण्यात येणार आहे.
Ladki Bahin Yojana त्यापूर्वी अशा महिलांनी फक्त त्यांचेच आधार कार्ड प्रमाणित करून अपूर्ण केवायसी प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत करून घेणे आवश्यक आहे. अपूर्ण eKYC पूर्ण करून घेण्याबाबत सरकारमार्फत स्वतंत्र निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच अशा महिलांनी परस्पर इतर नातेवाईकांचे आधार कार्ड प्रमाणे करू नये असे देखील सांगण्यात आले आहे.