Fraud Banking Apps Make Your Bank Account Empty : लक्षात ठेवा या बाबी
Fraud Banking Apps Make Your Bank Account Empty : सध्या इंटरनेटवर अशा अनेक बनावट बँकिंग ॲप्स उपलब्ध आहेत. ज्या लोकांची खाजगी माहिती चोरून त्यांच्यासोबत सायबर फसवणूक करत आहेत. अशावेळी तुम्हीही बँकिंग ॲप्स वापर करत असाल तर तुम्ही अशा फसवणूक करणाऱ्या बँकिंग ॲप्स पासून दूर राहणे आवश्यक आहे. चला जाऊन घेऊया अधिक माहिती.
Fraud Banking Apps इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. यामधीलच एक सुविधा म्हणजे बँकिंग सुविधा आहे.
यापूर्वी छोटे-मोठे काम करण्यासाठी ही बँकेत जावे लागत होते मात्र आता नेट बँकिंग ॲप द्वारे बँक संबंधित सर्व कामे ऑनलाईन घरी बसून होत आहे. यामुळे लोकांना खूप मोठा फायदा झाला आहे.
मात्र यामुळे लोकांना जेवढी सुविधा मिळत आहे तेवढ्याच प्रमाणात फसवणुकीचे प्रकरणही समोर येत आहेत.
असे अनेक लोक आहेत जे फसवणूक आणि बनावट बँकिंग ॲप डाऊनलोड करतात आणि फसवणुकीला बळी पडतात.
Fraud Banking Apps सध्या इंटरनेटवर अनेक अशा फसवणूक करणाऱ्या बँकिंग ॲप्स उपलब्ध आहेत. ज्या लोकांची खाजगी माहिती चोरतात आणि ती सायबर हल्लेखोरापर्यंत पोहोचते. अशा स्थितीमध्ये तुम्हीही काही बँकिंग ॲप्स वापर करत असाल तर तुम्ही हे व्यवहार करताना सावध राहिले पाहिजे.
कारण तुम्ही डाऊनलोड करत असलेले बँकिंग ॲप बनावट असू शकते. चला जाणून घेऊया तुम्ही या फसवणूक करणाऱ्या बँकिंग पासून कसे वाचू शकता.
बनावट नावाच्या ॲप पासून सावधान
Fraud Banking Apps Make Your Bank Account Empty Know These Important Tips
आपल्या बँकेच्या नेट बँकिंग ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची चांगल्या प्रकारे तपासणी करा आणि ती आपल्याच बँकेची काय आहे ना याची खात्री करा. यासाठी तुम्ही एप्लीकेशन चे नाव लक्षपूर्वक वाचा अनेक वेळेस फ्रॉड ॲप चे नावही आपल्या बँकेच्या ॲपच्या नावाप्रमाणेच असते.
या नावामध्ये छोटासा एखादा फरक असतो तो अनेकदा आपल्या नजर चूकीमुळे सुटून जातो. त्यामुळे कुठल्याही बँकेचे ॲप डाऊनलोड करताना त्याची स्पेलिंग चांगल्या पद्धतीने वाचा. केवळ बँक चा आयकॉन आहे म्हणून किंवा मिळताजुळता नाव आहे म्हणून तुम्ही कुठलेही बँकिंग ॲप डाऊनलोड करू नका. कारण याद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते.
ॲपचे रिव्ह्यू पहा
आपल्या बँकेचे बँकिंग ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी वाचा आणि पहा की हे ॲप किती लोकांनी डाऊनलोड केलेले आहे. कारण फ्रॉड करणाऱ्या ॲप्स डाऊनलोड संख्या खूप कमी असते. हे सतत लक्षात ठेवा.
लिंक द्वारे ॲप डाऊनलोड करू नका
Fraud Banking Apps Make Your Bank Account Empty Know These Important Tips
कुठल्याही लिंक वर जाऊन कुठलेही बँकिंग ॲप डाऊनलोड करू नका. विशेष करून एखाद्या अनोळखी व्यक्तींनी तुम्हाला एसएमएस द्वारे ही लिंक पाठवली असेल तर त्यावर चुकूनही क्लिक करू नका सतत एप्लीकेशन ॲप google play store किंवा एप्पल ॲप स्टोअर वर जाऊनच ॲप डाऊनलोड करावे.
बँकेत जाऊनही योग्य करू शकता डाऊनलोड.
तुम्हाला जर प्ले स्टोअर वर किंवा ॲपल स्टोअर वर आपल्या बँकेचे कुठले ॲप डाऊनलोड करावे हे जर कळत नसेल तर किंवा तुमच्यासमोर अनेक बनावट ॲप दिसत असतील तर तुम्ही तुमच्या संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन अधिकृत बँकेचे असलेले ऑनलाइन एप्लीकेशन म्हणजेच ॲप डाऊनलोड करा यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.