UIDAI Aadhar Deactivation In Marathi : तुमचे नाव आहे का यादीत
UIDAI Aadhar Deactivation In Marathi : आज प्रत्येकाकडे आधार कार्ड झाले आहे. आधार कार्ड म्हणजे महत्त्वपूर्ण दस्तावेज झाला आहे. जेव्हापासून आधार आयडी सुरू झाले तेव्हापासून करोडो लोकांचे UIDAI कडे रजिस्ट्रेशन झाले आहे.
अजूनही अनेक जण आधार प्रणाली पासून दूर आहेत. नवीन जन्मलेली मुले त्यांचेही आधार क्रमांक तयार करावे लागत आहेत. पुढे शिक्षणासाठी ते गरजेचे करण्यात आले आहे. अशावेळी UIDAI कडे आकडा वाढतच चालला आहे. यामुळे UIDAI ने आधार क्रमांक निष्क्रिय करण्याची मोहीम सुरू केली आहे.
UIDAI Aadhar Deactivation आधार डेटाबेस ची अचूकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी देशव्यापी महत्त्वकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत 2 कोटींपेक्षा अधिक मृत व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रिय करण्यात आले आहेत. वास्तविक या 15 वर्षाच्या काळात करोडोच्या संख्येने आधारधारक मृत झालेले आहेत.
परंतु त्याची माहिती यूआयडीएआयला मिळालेली नसल्यामुळे आजही त्यांचे Aadhar Card आधार नंबर सक्रिय आहेत. यामुळे या आयडींचा वापर करून अनेक ठिकाणी फसवणुकीची प्रक्रिया उघडकीस येत आहे. बँक अकाउंट उघडली जात आहेत, फ्रॉड केले जात आहे, सरकारी योजनांचा लाभ घेतला जात आहे अशा अनेक प्रकारे गैरवापर केला जात आहे. हे सर्व प्रक्रिया थांबवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.
मृत व्यक्तींची माहिती घेऊन त्यांच्या आधार क्रमांक बंद केले जात आहेत. लोकांना आपल्या घरातील मृत व्यक्तींच्या आधार क्रमांक कसे बंद करायचे याची माहिती नाही. त्यामुळे आधारालाही याची माहिती मिळत नाही.
Aadhar Card News त्यामुळे आता युआयडीएआयने अशा मृत व्यक्तींची माहिती भारताचे रजिस्टर जनरल, विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या नागरिक नोंदणी प्रणाली, सार्वजनिक वितरण प्रणाली आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम अशा ठिकाणाहून घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पुढे बँक आणि इतर संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
या संस्थान कडे तो व्यक्ती मृत असल्याची माहिती असली तरीही UIDAI कडून वेगळी यंत्रणा राबवून त्याची पडताळणी केली जाईल. यामुळे जिवंत असलेल्या व्यक्तीचे आधार रद्द होण्याची शक्यता टाळली जाईल. त्याचबरोबर आधारच्या पोर्टलवरही एक नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची नोंदणी पर्याय दिला जाणार आहे. कुटुंबातील सदस्य स्वतः प्रमाणेच करून मृत व्यक्तीचा आधार क्रमांक मृत्यू नोंदणी क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील पोर्टलवर देऊ शकतात.
मृत्यूच्या अधिकृत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या सुविधेचा वापर करून मृत व्यक्तीच्या आधार क्रमांकाची नोंदणी करावी असे UIDAI ने आवाहन केले आहे.