The government will provide free treatment up to Rs 20 lakhs : फडणवीसांनी दिली माहिती
The government will provide free treatment up to Rs 20 lakhs. : महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत 5 लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार केले जात होते. यापूर्वी त्यात 1300 आजार होते. आता एकूण 2400 आजारापर्यंत उपचार मोफत करण्यात आले आहे.
त्याचबरोबर 9 आजार वर उपचार करण्यासाठी जास्त खर्च येतो. अशा 9 आजारांवर उपचारांचा 20 लाखापर्यंतचा खर्च राज्य सरकारने करण्याचा निर्णय घेतला आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उदगीर जिल्हा लातूर येथे आयोजित जाहीर सभा झाली त्यामध्ये सांगितले.
Devendra Fadnvis News फडणवीस पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या मोफत उपचारासाठी आयुष्यमान आरोग्य मंदिर दिले आहे. आरोग्य मंदिराच्या माध्यमातून प्रत्येकाला मोफत आरोग्य सेवा मिळत आहेत.
Devendra Fadnvis News In Marathi या योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार केले जात होते. परंतु 9 आजारांवर 5 लाखांपेक्षा जास्त पैसा द्यावा लागतो. 5 लाखांपेक्षा अधिक 10, 15 ते 20 लाखांपर्यंत उपचारासाठी येणारा खर्च राज्य सरकार करणार आहे. कोणालाही पैसे नाही म्हणून ऑपरेशन व इलाज होणार नाही असे होणार नाही. आता प्रत्येकाला उपचाराचा खर्च मिळणार आहे.
रुग्णांचे रेशन कार्ड, आधार कार्ड कुठले आहे हे न पाहता राज्य सरकारी 20 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सभेत सांगितले. त्याचबरोबर भारतात 7 लाख, तर महाराष्ट्रात 40,000 गावे आहेत.
महाराष्ट्रातील 6.5 कोटी लोक गावात तर 6.5 कोटी लोक शहरात राहतात. गावाप्रमाणे शहरांनाही महत्त्व असून वर्षानुवर्ष शहरांकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरीकरणाकडे लक्ष न दिल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
देशाचा 65 टक्के जीडीपी शहरात तयार होतो. शिक्षणाच्या संधी शहरात तयार होतात. नरेंद्र मोदी सरकारने अटल अमृत योजनेच्या माध्यमातून देशातील शहरांना लाखो कोटी रुपये दिले, तर महाराष्ट्रातील शहर विकासासाठी 50000 कोटी रुपये दिले आहेत आणि त्यातूनच आता विकासाची कामे देखील सुरू करण्यात आली आहेत असे फडणवीस यांनी सांगितले.