Pm Suraksha Bima Yojana 2025 Get Rs 2 Lakh Insurance For Just Rs 20 Application Process : जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Pm Suraksha Bima Yojana 2025 : केंद्र सरकारच्या वतीने स्वस्त विमा योजना चालवण्यात येत आहे. यामध्ये केवळ 20 रुपयाच्या प्रीमियम वर तुम्हाला 2 लाख पर्यंत विमा संरक्षण दिले जाते.
महागड्या विमा प्रीमियम मुळे अनेक लोक आरोग्य विमा काढत नाहीत. यामुळे केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना नावाची योजना सुरू केली आहे.
PMSBY योजना अंतर्गत केवळ 20 रुपये चा प्रीमियम भरून तुम्हाला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
Pm Suraksha Bima Yojana 2025 केंद्र सरकारची ही योजना मुख्य करून गरीब लोकांसाठी आणि असंघटित क्षेत्रातील लोकांना लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. चला जाणून घेऊया या योजनेची पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे.
पीएम सुरक्षा बीमा योजना म्हणजे काय?
What Is Pm Suraksha Bima Yojana
PMSBY Eligibility मोदी सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत जर दुर्घटना मध्ये कुठल्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा त्याला अपंगत्व येते आणि जर तो या योजनेअंतर्गत पात्र असेल तर त्याला 2 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण देण्यात येते. या योजनेअंतर्गत वर्षभरासाठी तुम्हाला केवळ 20 रुपये प्रीमियम भरायचा आहे.
काय आहे पात्रता
Pm Suraksha Bima Yojana Eligibility
- या योजनेसाठी 18 ते 70 वयोगटातील कुठलाही व्यक्ती अर्ज करू शकतो.
- अर्जदार व्यक्तीचे देशातील कुठलीही बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत 1 जून 31 मे पर्यंत पिरियड असतो. प्रत्येक वर्षी 31 मे रोजी पूर्वी प्रीमियम भरावा लागतो यासाठी तुम्ही ऑटो डेबिट सुविधा चा वापर करू शकता.
- जॉईंट होल्डर पण या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना 20 रुपये वेगवेगळे प्रीमियम म्हणून द्यावे लागतील.
- जर तुमच्याकडे एक पेक्षा अधिक बँकेचे अकाउंट आहे तर तुम्हाला केवळ एकाच अकाउंट वर या योजनेचा लाभ घेता येईल. जर एकापेक्षा अधिक अकाउंटद्वारे अर्ज केला तर त्याला डुप्लिकेट मानले जाईल आणि डुप्लिकेट कव्हर मध्ये सहभागी नसतील.
पीएम सुरक्षा बीमा योजना किती मिळते रक्कम
Pm Suraksha Bima Yojana 2025 Get Rs 2 Lakh Insurance For Just Rs 20 Application Process
या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीचा जर अपघात झाला किंवा दुर्घटनामध्ये त्याचा मृत्यू झाला किंवा त्याला अपंगत्व आले तर 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येते. या व्यतिरिक्त अंशतः विकलांग प्रकरणांमध्ये 1 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्यात येते.
कसा करावा अर्ज
How to Apply Pm Suraksha Bima Yojana
तुम्ही PMSBY च्या अधिकृत वेबसाईट, बँक पोर्टल किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून अर्ज करू शकता. अर्ज करतेवेळी या गोष्टीचे लक्ष ठेवा की तुमच्या नॉमिनी ची माहिती देणे आवश्यक आहे.