दररोज 121 रुपये गुंतवणुकीवर मिळवा लाखोंचा परतावा
LIC Kanyadan Policy : जर तुम्हीही तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक सुरू करत असाल तर ही पॉलिसी तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. चला जाणून घेऊया एलआयसीची कन्यादान योजना म्हणजे काय आहे आणि यासाठीची पात्रता व अर्ज करण्याची प्रक्रिया काय?
तुम्हालाही तुमच्या मुलीच्या नावावर गुंतवणूक करायची आहे? तर भारतीय जीवन विमा (LIC)ची कन्यादान पॉलिसी तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्ही दररोज केवळ 121 रुपयांची बचत करून लाखो रुपयाचा परतावा मिळवता येतो. याबरोबरच तुमच्या बचतीवर टॅक्स सूट पण मिळता. चला एलआयसीच्या या बचत योजना संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहू..
मुलींसाठी गुंतवणूक
ज्या लोकांना आपल्या मुलीचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करायचे आहे त्यांच्यासाठी एलआयसीची कन्यादान योजना मध्ये गुंतवणूक करणे खूप फायद्याचे आहे. ही एक सुरक्षित योजना आहे. यामध्ये तुम्ही छोटी छोटी बचत करून मोठी गुंतवणूक करू शकता. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मुलीच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत संपूर्ण खर्चा साठीचा फंड यामध्ये जमा करू शकता.
एलआयसी कन्यादान पॉलिसी म्हणजे काय?
एलआयसीच्या योजनेला जीवन लक्ष या नावानेही ओळखले जाते. विशेष करून मुलींना दक्ष ठेवून ही योजना सुरू करण्यात आली आहे. जेव्हा कुठला व्यक्ती मुलीच्या नावावर या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करतो आणि अचानक त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर पुढील प्रीमियम एलआयसी द्वारे भरला जातो. याबरोबरच कुटुंबाला एलआयसी कडून 10 लाख रुपये दिले जातात.
असा जमा होईल मोठा फंड
जर तुम्ही जास्त गुंतवणूक करू शकत नाहीत तर केवळ 121 रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याला 3600 बचतच्या माध्यमातून तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकता. या योजनेचा कालावधी पंचवीस वर्ष आहे. मात्र गुंतवणूक 22 वर्षापर्यंतच करावी लागते. तीन वर्ष साठी कुठलाही प्रीमियम भरावा लागत नाही. मॅच्युरिटी नंतर गुंतवणुकीवर जवळपास 27 लाख रुपयांचा फंड परतवा म्हणून तुम्हाला मिळतो.
या रकमेतून तुम्ही तुमच्या मुलीची संपूर्ण शिक्षण, लग्न करू शकता. एलआयसीच्या या कन्यादान योजनेमध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. कुठलाही व्यक्ती प्रत्येक महिन्याला कमी गुंतवणुकीमध्ये या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
तुम्ही तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार गुंतवणुकीची रक्कम कमी जास्त करू शकता. मुलीच्या नावावर केलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला टॅक्स सूटही मिळतो. म्हणजेच कमी गुंतवणूक असलेल्या या योजनेमध्ये तुम्हाला रिफंड सोबतच टॅक्स सेविंग पण दिला जातो.