Sanjay Gandhi Niradhar Yojana : सरकारच्या या योजनेतून आता मिळणार 1500 ऐवजी 2500 रुपये

Sanjay Gandhi Niradhar Yojana In Marathi : राज्य सरकारने केली महत्त्वाची घोषणा

Sanjay Gandhi Niradhar Yojana : राज्य सरकारने नागरिकांच्या हितासाठी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. प्रत्येक योजनेतून सरकार घरोघरी पोहोचले आहे. सरकारने आर्थिक दृष्ट्या नागरिकांना मदत व्हावी, प्रत्येक नागरिक स्वतःच्या पायावर उभा राहावा यासाठी सतत प्रयत्नशील असते.

त्यामुळे सतत नवनवीन योजनांची अंमलबजावणी सरकार करत असते. त्यामधील आता एका योजनेअंतर्गत अनुदानात वाढ करण्यात आली आहे.

government scheme सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिव्यांग निराधार योजनेच्या अनुदानात वाढ केली आहे. आता योजनेतील दिव्यांग नागरिकांना 2500 रुपये मिळणार आहेत. परंतु त्यासाठी एक अट ठेवण्यात आलेली आहे. आज आपण ज्या योजनेविषयी बोलत आहोत ही योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना.

संजय गांधी निराधार योजनेत किती रुपये मिळतात

What Is The Monthly Payment Of Sanjay Gandhi Niradhar Yojana

Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार योजनेत लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळतात. मात्र या योजनेतील दिव्यांग नागरिकांसाठी अनुदानात वाढ केली आहे. आता नागरिकांना 2500 रुपये मिळणार आहे.

या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांना UDID अपडेट करून सादर करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान ज्या लाभार्थ्यांना UDID सादर केले नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

संजय गांधी निराधार योजना, श्रावण राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेत युडीआयडी आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक केले आहे. जर तुम्ही हे दोन्ही आयडी लिंक केले नाही तर लाभ बंद केला जाईल.

या योजनेत दिव्यांग नागरिकांना विशेष सहाय्यक योजनेअंतर्गत सर्व लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना अपडेट आधार कार्ड आणि युडीआयडी ची प्रत आणि बँक पासबुक संबंधित तहसील कार्यालयात योजनेच्या शाखेत जमा करायची आहे.

युडीआयडी कार्ड काय? ते कसे काढायचे?

UDID Card For Sanjay Gandhi Niradhar Yojana

संजय गांधी निराधार योजनेत दिव्यांग लाभार्थ्यांना युडीआयडी कार्ड बंधनकारक केले आहे. हे एक दिव्यांग प्रमाणपत्र आहे. हे ऑनलाईन डिजिटल स्वरूपात काढले जाते. सर्वप्रचार रुग्णालयातील दिव्यांग विभागातून लाभार्थ्यांना हे प्रमाणपत्र दिले जाते.

Maharashtra Government Scheme या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असणे आवश्यक आहे. तुम्ही सरकारच्या स्वावलंबन या पोर्टलवर जाऊन युडीआयडी कार्ड साठी अर्ज करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 50 हजारांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.