Business Loan Schemes for Women In Marathi : वाचा सविस्तर
Business Loan Schemes for Women : महिलांना बिजनेस सुरू करण्यासाठी आणि महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. महिलांना बिजनेस सुरू करण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते. त्या योजना कोणत्याही आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
These 5 Central Government Schemes Provide Loans To Women To Start A Business केंद्र सरकार किंवा राज्य सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत असते. ज्यामधून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते. त्या पाच योजना आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
लखपती दीदी योजना
Lakhapati didi yojana प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी लखपती दीदी योजनेची सुरुवात केली. या योजनेचा लाभ आतापर्यंत करोड महिलांनी घेतला आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गत 1 लाख रुपये पासून ते 5 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते. यामध्ये महिलांना छोटे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जेणेकरून त्या त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील आणि स्वतःच्या पायावर उभा राहू शकतील, आत्मनिर्भर बनू शकतील. यासाठी सरकारने लखपती दीदी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी https://yojanamazi.com/lakhapati-didi-yojana-2024-in-marathi/ या लिंकवर क्लिक करा.
अन्नपूर्णा योजना
महिलांना स्वतःचा फूड व्यवसाय सुरू करण्यासाठी अन्नपूर्णा स्कीम योजना सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कर्ज सुविधा मिळते. महिलांना 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज सुविधा या योजनेअंतर्गत दिली जाते. हे कर्ज 3 वर्षात अगदी सहजरीत्या फेडले जाते. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यवसायामध्ये महिलेची 50% हिस्सा असणे किंवा त्यापेक्षा जास्त हिस्सा असणे आवश्यक आहे.
उद्योगिनी योजना
ज्या महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करायचा आहे जसे की टिफिन सर्विस, शिलाई मशीन, ब्युटी पार्लर यासारखे बिजनेस सुरू करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 3 लाख रुपये पर्यंत कर्ज सुविधा मिळते. त्याचबरोबर या व्यतिरिक्त या योजनेमध्ये 30 टक्के यांची सबसिडी चा लाभ देखील मिळतो.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना
सरकारने या योजनेअंतर्गत लघु आणि सूक्ष्म उद्योग उद्योगासाठी 20 लाख रुपये पर्यंत लोन देण्याची सुविधा या योजनेअंतर्गत केली आहे. हे कर्ज 4 हिस्स्यांमध्ये दिले जाते.
शिशु 50 हजार
किशोर 50 ते 5 लाख
तरुण 5 लाख ते 10 लाख
तरुण + 10 लाख ते 20 लाख पर्यंत
या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते. या योजनेतून महिलांना चांगला व्यवसाय सुरू करता येतो.
स्टँड अप योजना
केंद्र सरकार द्वारे उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत बिजनेस सुरू करण्यासाठी 10 लाख पासून 1 कोटी रुपयांपर्यंत लोन मिळते. या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिला https://www.standupmitra.in या लिंक वर जाऊन अर्ज करू शकतात.