RBI Repo Rate : नवीन वर्षात EMI कमी होणार
RBI Repo Rate May Cut : रिझर्व बँक ऑफ इंडिया आता पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाची दर 2 महिन्याला पतधोरण बैठक असते. या बैठकीत पैशांसंबंधीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.
RBI Repo Rate दरम्यान रिझर्व बँकेची डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पतधोरण बैठक झाली. या बैठकीत रेपो दरात कपात झाली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा नवीन वर्षात रेपो दर कपात होण्याची शक्यता आहे.
रिझर्व बँकेचा रेपो रेट कमी होणार
RBI Repo Rate May Cut
RBI रिझर्व बँकेची फेब्रुवारीमध्ये पतधोरण बैठक होणार आहे. या बैठकीत रेपो रेट कमी होण्याची शक्यता आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्ट नुसार रिझर्व बँक फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या बैठकीत रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंट्स ने कपात होऊ शकते. जर रेपो रेटमध्ये कपात झाली तर तो 5 टक्के होऊ शकतो.
दरम्यान यामुळे होम लोन, कार लोन, पर्सनल EMI स्वस्त होऊ शकतो. मिळालेल्या रिपोर्टनुसार आरबीआयची बैठक 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार सध्या महागाईचे जास्त प्रमाण वाढत नाहीये, अनुकूल चलनवाढ आणि कमी किमती यामुळे रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने अजून रेपो रेट मध्ये कपात होणार की नाही यावर निर्णय झालेला नाही.
दरम्यान हा निर्णय महागाई आणि जीडीपी वर अवलंबून असेल. जर यामध्ये कपात झाली तर रेपो रेटमध्ये देखील कपात होईल. सध्या रेपो रेट 5.25% आहे.
येत्या काळात हा दर अजून कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नागरिकांना कर्ज घेण्यासाठी अधिक दिलासा मिळेल.