Whatsapp Call Recording : फॉलो करा या स्टेप्स
Whatsapp Call Recording : आपण पाहतो की, मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेला आहे आणि प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप हे ॲप्लिकेशन असतेच. whatsapp हा दैनंदिन आयुष्याचा घटक बनला आहे. हे कॉल अँड टू एन्ड इनक्रीप्शन वर आधारित असल्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित आहे. या सुरक्षेच्या कारणामुळे व्हाट्सअप ॲप मध्ये थेट कॉल रेकॉर्डिंग चा पर्याय देण्यात आलेला नाही.
Meta कंपनीच्या मते इनबिल्ड कॉल रेकॉर्डिंग फीचर दिल्यास युजर्सच्या प्रायव्हसीवर परिणाम होऊ शकतो. मात्र बऱ्याचदा वैयक्तिक किंवा कामाच्या कारणांसाठी कॉल सेव करणे गरजेचे असते. यावेळी स्क्रीन रेकॉर्डिंग हा सोपा पर्याय ठरतो.
Android वापरकर्त्यांसाठी व्हाट्सअप कॉल रेकॉर्ड करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग. फीचर स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू केल्यावर फोनची स्क्रीन आणि ऑडिओ दोन्ही रेकॉर्ड होतात. त्यामुळे व्हाट्सअप कॉल आपोआप सेव होतो. या पद्धतीसाठी कोणत्याही थर्ड पार्टीच्या ॲपची गरज नाही. यामुळे प्रायव्हसी ही सुरक्षित राहते.
रेकॉर्डिंगची कॉलिटी फोनच्या मायक्रोफोन आणि स्पीकरवर अवलंबून असते. बहुतेक अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग चा पर्याय क्विक सेटिंग पॅनल मध्ये दिलेला असतो. स्क्रीनच्या वरून पॅनल ओपन करून स्क्रीन रेकॉर्ड किंवा स्क्रीन कॅप्चर हा पर्याय सुरू करता येतो.
सॅमसंग, शायोमी, विवो, वन प्लस यासारख्या वेगवेगळ्या ब्रॅण्डेड मोबाईल मध्ये या फीचर चे नाव थोडे वेगवेगळे असू शकते. कॉल दरम्यान स्पीकर ऑन ठेवल्यास आवाज क्लियर रेकॉर्ड होतो आणि ही पद्धत व्हाट्सअप कॉल रेकॉर्डिंग साठी जास्त विश्वासाची आहे. परंतु iphone युजर साठी ही प्रक्रिया सोपी नाही.
Apple ची कडक सेक्युरिटी पॉलिसी आणि IOS च्या मर्यादांमुळे स्क्रीन रेकॉर्डिंग व्हाट्सअप कॉल चा आवाज कॅप्चर करत नाही. स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू झाले तरी कॉल चा ऑडिओ रेकॉर्ड होत नाही.
त्यासाठी जर तुम्हाला व्हाट्सअप कॉल रेकॉर्ड करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील स्क्रीन रेकॉर्डर सुरू करणे हा पर्याय आहे. तुम्ही स्क्रीन रेकॉर्डर हा पर्याय सुरू करून तुमचा व्हाट्सअप कॉल रेकॉर्ड करू शकता.