PM Kisan Yojana : असे काढा फार्मर आयडी कार्ड
Farmer ID Online Process In Marathi : सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता फार्मर आयडी आवश्यक झाला आहे. कारण आता फार्मर आयडी शिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने सह अनेक सरकारी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार नाही. चला जाणून घेऊया यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी.
देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. याद्वारे कोट्यावधी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. यातीलच एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांन वर्षभरातील हप्त्यामध्ये 6000 रुपये आर्थिक मदत करण्यात येते. मात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही पात्रता अटी शर्ती निश्चित केले आहेत.
सरकारने PM Kisan Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सह अनेक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता फार्मर आयडी बंधनकारक केला आहे. याशिवाय कुठल्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही.
केंद्र सरकारच्या ॲग्री स्टॅक प्रोजेक्ट अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल ओळख बनवता येते. फार्मर आयडी शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र आहे पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक राज्यांमध्ये आता नवीन अर्ज करण्यापूर्वी फार्मर आयडी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
येणाऱ्या काळामध्ये सर्व लाभार्थ्यांसाठी किसान आयडी लागू केला जाऊ शकतो. जर शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर पीएम किसान सन्माननिधी योजनेसारख्या अनेक सरकारी योजनेच्या मदत त्यांची थांबू शकते. याबरोबरच शेतकऱ्यांना बी बियाणे, फसल विमा योजना सह अन्य सरकारी योजनेचा लाभ घेण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.
फार्मर आयडी साठी लागणारी कागदपत्रे
Farmer ID Documents
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय द्वारे सोशल मीडिया अकाउंट एक्स वर दिलेल्या माहितीनुसार फार्मर आयडी साठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड, जमिनीचे कागदपत्र, सातबारा, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुक, मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
शेतकरी ही सर्व कागदपत्रे या मदतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन किसान शिबिर केंद्रामध्ये फार्मर आयडी साठी अर्ज करू शकतो.
फार्मर आयडी साठी अर्ज प्रक्रिया
Farmer ID Online Process In Marathi
- फार्मर आयडी बनवण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या राज्यातील ऍग्री स्ट्रॅक पोर्टल वर जावे लागेल.
- तेथे क्रेडिट न्यू युजर या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- तेथे आधार नंबर टाकून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- अटी शर्ती वाचून संमती देत शेवटी फॉर्म सबमिट करावा लागेल.
- यानंतर आधार किंवा लिंक असणाऱ्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागेल.
- त्यानंतर पुन्हा एकदा मोबाईल नंबर टाकून ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागेल.
- त्यानंतर नवीन पासवर्ड बनवून तुमच्याकडे सेव करा.
- याद्वारे तुमचा यूजर आयडी तयार होईल.
- लॉगिन केल्यानंतर फार्मर टाईप मध्ये ऑनर हा पर्याय निवडा आणि fetch land डिटेल्स वर क्लिक करा.
- सातबारा नंबर जमिनीची संपूर्ण माहिती भरा.
- एकापेक्षा अधिक ठिकाणी शेत असेल तर त्याचीही माहिती भरा.
नोंदणी नंतर काय करावे
जमिनीची संपूर्ण माहिती भरल्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर सोशल registry tab मध्ये फॅमिली आयडी किंवा रेशन कार्ड ची माहिती भरा. त्यानंतर डिपार्टमेंट अप्रुव्हलमध्ये रेवेन्यू डिपार्टमेंट निवडणे आवश्यक आहे. शेवटी consent वर क्लिक करून डिजिटल सही करा संपूर्ण स्टेप पूर्ण झाल्यानंतर तुमचा फार्मर आयडी प्रक्रिया मध्ये जाईल.
अनेक राज्यांमध्ये फार्मर आयडी काढण्यासाठी अनेक ग्रामपंचायतीमध्ये शिबिरही घेण्यात येत आहेत. या शिबिरामध्ये शेतकरी ऑफलाइन पद्धतीने फार्मर आयडी बनवू शकतात. तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जर असे प्रकारचे शिबिर झाले नसेल किंवा होणार नसेल तर तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊनही आपला फार्मर आयडी तयार करू शकता आणि या फार्मर आयडीच्या माध्यमातून तुम्ही केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकता.