HSRP Number Plate Deadline 31st December 2025 : लाखो वाहनधारकांची नंबर प्लेट बाकी
HSRP Number Plate Deadline 31st December 2025 : राज्यातील सर्व वाहनधारकांना आपल्या गाडीला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट HSRP लावणे बंधनकारक केले आहे. यापूर्वीच राज्य सरकारने 2 ते 3 वेळेस नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ दिलेली होती. ती आता 31 डिसेंबरला समाप्त होणार आहे.
HSRP Number Plate Deadline In Marathi यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत. 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे. जर तुम्ही नंबर प्लेट अजूनही बसवली नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
HSRP Number Plate Deadline In Marathi परंतु आतापर्यंत अशा लाखो गाड्या आहेत ज्यांची अजूनही याच्या गाडीला नंबर प्लेट बसवलेली नाही. आता मुदत वाढ होणार का? हे आपल्याला पाहावे लागेल.
HSRP Number Plate Installment Deadline Extended मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर मध्ये पुण्यात फक्त 50,000 वाहनांनी HSRP नंबर प्लेट बसवली आहे. पुण्यात 16 लाख वाहन धारकांची अजूनही नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया राहिलेली आहे. आता हे 16 लाख वाहनधारक नंबर प्लेट कधी बसवणार त्यांच्याकडे एकूण फक्त आता दोनच दिवस शिल्लक आहे.
2 दिवसात त्यांना ही नंबर प्लेट बसवणे शक्य नाही. त्यामुळे मदत वाढ दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना त्यांच्या गाडीला नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे.
त्यानंतरच्या वाहनांना आधीच ही नंबर प्लेट बसवली आहे. त्यामुळे एप्रिल 2019 पूर्वी जेवढे वाहने आहेत, तेवढ्या सर्व वाहनधारकांना हे काम लगेच करावे लागणार आहे.
HSRP नंबर प्लेट बसवणे का गरजेचे?
HSRP Number Plate
अपघात किंवा गुन्ह्यातील वाहनांना सहज पकडता यावे यासाठी ही नंबर प्लेट बसवणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकाचे वाहन सुरक्षित असावे यासाठी एक युनिक नंबर प्लेट दिली जात आहे. या प्लेटमुळे गुन्हेगारांना सहज शोधता येईल असे सांगितले जात आहे.
नंबर प्लेट न बसवल्यास भरावा लागेल दंड
ज्या वाहनधारकांनी अजूनही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेली नाही आणि जर सरकारने याची मुदत वाढ केली नाही तर 31 डिसेंबर नंतर वाहनधारकांना दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.