Side effects of unnecessary purchases : अनावश्यक खरेदीचे साईड इफेक्ट, खरेदी केलेल्या अधिकतर कपड्याचा उपयोगच करत नाहीत लोक, कार्बन उत्सर्जन आणि पाण्याचा वापरात वाढ
Side effects of unnecessary purchases : अलमारी उघडतात कपड्याचा ढीग समोर येतो. पण तरीही वाटते की घालण्यासाठी आपल्याकडे कपडेच नाहीत. ही आजच्या प्रत्येक घरातील गोष्ट आहे. सतत बदलणारे फॅशन ट्रेड आणि ऑनलाईन सेलच्या भडिमाराने आपल्याला आवश्यकतेपेक्षा अधिक खरेदी करायला शिकवले आहे.
कपडे आता केवळ घालण्याची वस्तू नाही तर सोशल इमेज बनली आहे. एका बाजूला घरामध्ये कपडे ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे तर दुसऱ्या बाजूला पृथ्वीवर बोजा वाढत आहे.
कपड्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी रसायन आणि ऊर्जा खर्च होत आहे. याची किंमत निसर्गाला चुकती करावी लागत आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार, लोक 15 वर्ष पूर्वीच्या तुलनेनुसार 60 टक्केपेक्षा अधिक कपडे खरेदी करत आहेत. विशेष बाब म्हणजे यातील अनेक कपडे कधी घातलेच जात नाहीत.
विचार न करताच खरेदी, पर्यावरणावर संकट
लोक मॉल किंवा ऑनलाईन जातात आणि कुठलाही विचार न करता कपडे खरेदी करतात. याची त्यांना आवश्यकताही नसते याला इंपल्स बाईंग असे म्हणतात, ती सवय होऊन जाते. जर आपण आपल्या सवयी बदलल्या नाहीत तर पर्यावरणीय संकट वाढेल असे विशेष तज्ञ सांगतात.
भारतामध्ये फास्ट फॅशन इंडस्ट्री वेगाने वाढत आहे. आणि याच्या उत्पादना साठी पाण्याचा भरमसाठ वापर आणि प्रदूषण होत आहे.
फास्ट फॅशनमध्ये दिखाऊपणा
Side effects of unnecessary purchases आज-काल तरुणांमध्ये फास्ट फॅशनचे वेड आहे. यामध्ये दिखाऊ पण आहे तर स्लो फॅशन ब्रांडचे महत्व देऊन सस्टेनेबल शॉपिंगद्वारे आपण पर्यावरण प्रती आपली जबाबदारी निभावू शकतो.
ही आहे आपली स्थिती
- भारत प्रत्येक वर्षी 7793 किलो टन टेक्सटाईल कचरा निर्माण करत आहे. जो जागतिक कचऱ्याचा जवळपास 8.5% आहे.
- भारतामध्ये फास्ट फॅशन बाजार 13.48 अब्ज डॉलरचा आहे. जो 2032 पर्यंत 39.74 अरब डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
- भारतीय महिलांच्या अलमारी मध्ये जवळपास 120 कपडे (ड्रेस) असतात. यातील 80 टक्के कपड्याचा वापर नाहीच्या बरोबर आहे. ( फॅशन फॉर गुड रिपोर्ट नुसार)
यामुळे पर्यावरणाला धोका
- 10 टक्के कार्बन उत्सर्जनसाठी फॅशन उद्योग जबाबदार.
- 2700 लिटर पाण्याचा वापर होतो एक कॉटन टी-शर्ट बनवण्यासाठी.
- 01% पेक्षाही कमी कपडे होतात रिसायकल.
- 92 मिलियन टन कपडे प्रत्येक वर्षी कचरा म्हणून फेकले जातात.
- 80 टक्के कपडे केवळ ठेवून दिले जातात ते नियमित वापरले जात नाहीत
आंदोलन पण.. कमी खरेदी, जास्त सांभाळ
- लंडनमध्ये आंदोलन : 2019 मध्ये लंडनमध्ये पर्यावरण समूह ए रेबेलीयन डिस्पोजेबल फॅशन विरोधात आंदोलन केले. यात कमी खरेदी जास्त सांभाळ अशी घोषणा देण्यात आली.
- बर्लिन आंदोलन : फेब्रुवारी 2024 मध्ये ग्रीन प्रिसने बर्लिनमध्ये फॅशन ब्रांच द्वारे आफ्रिका मध्ये कपडा- कचरा फेकल्या जात असल्याच्याविरोधात मोठा कपड्याचा ढेक लावून आंदोलन केले.