Makar Sankranti 2026 In Marathi : मकर संक्रांत 2026

Makar Sankranti 2026 Information In Marathi : वाचा सविस्तर माहिती

Makar Sankranti 2026 Information In Marathi : मकर संक्रांत हा सण प्रत्येक सौभाग्यवती महिलेच्या आयुष्यातील महत्त्वाचा सण असतो. प्रत्येक महिला अति आनंदाने हा सण साजरा करते.

मकर संक्रांत हा सण इंग्रजी वर्षातील पहिला सण असून हा दिवस धार्मिक दृष्ट्या देखील खूप महत्त्वाचा आहे.

Makar Sankranti 2026 या दिवशी सुवासिनी महिला पूजा करतात, वाण ओवसायला जातात, साजशृंगार करतात. या दिवशी एक विशिष्ट रंग घालणे टाळावे लागते. म्हणजेच ज्यावर संक्रांत आली आहे तो रंग महिलांनी घालू नये असे म्हणतात.

Makar Sankranti 2026 In Marathi आज आपण या लेखाच्या माध्यमातून हे पाहणार आहोत की, यावर्षी संक्रांत कशावर आली आहे? कोणत्या रंगावर आली आहे? धार्मिक मान्यतेनुसार संक्रांत ज्या वाहनावरून ज्या रंगाची वस्त्र परिधान करून येते तो रंग सुवासीनेने घालू नये असं म्हणतात. चला तर मग जाणून घ्या कोणता आहे रंग?

मकर संक्रांतीचा सण हा काही दिवसांवर आला आहे. या दिवशी सुवासिनी महिला देवाचा ओवसा करतात, मंदिरात जाऊन पूजा करतात. मकर संक्रांतीचे हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य हा मकर राशित प्रवेश करतो तो काळ म्हणजे मकर संक्रांतीचा काळ असतो. त्यामुळे या दिवशी सूर्य देवाची देखील पूजा केली जाते.

सुवासिनी स्त्रिया या दिवशी साजशृंगार करून देवाला ओवसा द्यायला जातात. संक्रांतीला साडी नेसताना त्यांनी कोणत्या रंगाची नेसावी याचे महत्त्व आहे. त्याचबरोबर ज्या महिलांची पहिली मकर संक्रांत असते त्या महिला काळ्या रंगाची साडी परिधान करून हलव्याचे दागिने घालून मोठा सण साजरा करतात.

काळा रंग का घालतात

Makar Sankranti 2026

काळा रंग हा प्रामुख्याने शुभ कार्यात वर्ज केला जातो मंगल कार्यात काळ्या रंगाचे कपडे घालत नाहीत. मात्र मकर संक्रांतीला विशेष करून काळ्या रंगाची साडी नवविवाहित सुवासिनी आवर्जून घालतात. त्यावर हलव्याचे दागिने घालतात.

मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त

Makar Sankranti 2026 Information

  • वैदिक पंचांगानुसार 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजून 13 मिनिटांनी संक्रांती लागणार आहे.
  • मकर संक्रांति 2026 चे पुण्यकाळ दुपारी 3 वाजून 13 मिनिटांपासून सायंकाळी 6 वाजून 45 मिनिट या वेळेत असेल.
  • या पुण्यकाळाचा एकूण कालावधी 2 तास 32 मिनिटे आहे.
  • 2026 मध्ये मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ दुपारी 3 वाजून 13 पासून 4 वाजून 58 मिनिट या वेळेत असेल. महापुण्यकाळाचा कालावधी 1 तास 45 मिनिटे इतका असेल.

या रंगाची साडी नेसून नेसू नये

Makar Sankranti 2026 Information In Marathi

मकर संक्रांति 2026 या वर्षी कोणता रंग आला आहे ते आपण पाहू. दरवर्षी असा एक रंग असतो जो परिधान करणे टाळतात. त्या मागचे कारण म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार संक्रांती जे वस्त्र परिधान करून येते त्या वस्त्राच्या रंगाचे कपडे किंवा साडी सुवासिनीने नेसू नये असे म्हणतात.

यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये मकर संक्रांत पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार असल्यामुळे हा रंग महिलांनी वापरू नये. या रंगाची साडी, बांगड्या, पर्स असे कोणतेही वस्तू महिलांनी परिधान करू नये.

कोणता रंग शुभ

Makar Sankranti 2026

2026 रोजी मकर संक्रांतीला तुम्ही केसरी, लाल, हिरवा रंग वापरू शकता. हे वर्ष सूर्याचे वर्ष समजले असल्याने केसरी रंग हा शुभ आहे.

त्याचबरोबर लाल रंगाला देखील शुभकार्यात महत्व असते. या रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकता. त्यानंतर हिरवा रंगाला देखील महत्त्व आहे. हिरव्या रंगाची साडी, बांगड्या यावर्षीच्या मकर संक्रांतीला सुवासिनी परिधान करू शकतात.