Vande Bharat Sleeper Train Route And Ticket Price : भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन

Vande Bharat Sleeper Train Route And Ticket Price : कुठून कुठपर्यंत धावणार, वाचा सविस्तर

Vande Bharat Sleeper Train Route And Ticket Price : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जानेवारी रोजी या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथे भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेन चे उद्घाटन केले.

pm modi flags off indias first vande bharat sleeper train launched ही रेल्वे हावडा आणि गुवाहाटी दरम्यान धावणार आहे. या ट्रेनला काल हिरवा झेंडा दाखवून रवाना केले आहे. यावेळी त्यांनी चक्क ट्रेन चालकाची भेट त्याबद्दल माहिती घेतली, तसेच पंतप्रधानांनी तेथील प्रवाशांसोबत देखील संवाद साधला.

या रेल्वेमुळे हावडा गुवाहाटी मार्गावरील प्रवासाचा वेळ तब्बल 2.5 तासांनी कमी होईल असे सांगितले. सध्या हावडा ते गुवाहाटी रेल्वेने प्रवास करण्यासाठी अंदाजे 18 तास लागतात.

वंदे भारत स्लीपर ट्रेनची वैशिष्ट्ये

First Vande Bharat Sleeper Train Route And Ticket Price

  • वंदे भारत स्लीपर ट्रेन ही एक सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये एकूण 16 कोच आहेत. त्यामध्ये 11 थर्ड AC, 4 सेकंड AC आणि 1 फर्स्ट AC कोच आहे.
  • थर्ड एसी मध्ये 611 बर्थ आहेत, सेकंड एसी मध्ये 188 आणि फर्स्ट एसी मध्ये 24 बर्थ आहेत. या रेल्वेमध्ये एकूण 823 प्रवासी प्रवास करू शकतात.
  • वंदे भारत स्लीपर चा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर आहे. ही रेल्वे पश्चिम बंगालमधील हावडा ते गुवाहाटी कामाख्या दरम्यानचे 958 किलोमीटरचे अंतर फक्त 14 तासांमध्ये पूर्ण करणार आहे. वंदे भारत स्लीपर रेल्वे मध्ये फक्त कन्फर्म तिकीट उपलब्ध असतील. यामध्ये RAC किंवा waiting list नसल्यामुळे प्रत्येक प्रवासाचा प्रवास हा आरामदायक आणि सुखकर होईल.

आधुनिकयुक्त सुविधा

  • या रेल्वेमध्ये आरामदायी आणि नरम गादी असलेले बर्थ म्हणजेच स्लीपर बेड असेल.
  • वरच्या बर्थ वर सहज पोहोचण्यासाठी नवीन डिझाईन केलेली शेडी असणार आहे.
  • स्टेशनवर उघडणारे आणि बंद होणारे स्वयंचलित स्लाइडिंग दरवाजे या रेल्वेला असतील.
  • ट्रेन सुरक्षिततेसाठी कवच टक्करविरोधी प्रणाली.
  • प्रत्येक कोच मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन बॅग सिस्टम आणि फायर ब्रिगेड असेल.
  • आधुनिक बायो व्हॅक्युम टॉयलेट आणि स्पर्शमुक्त यामध्ये असणार आहे.
  • तुम्हाला यामध्ये बंगाली आणि असा मी जेवण मिळेल.
  • जंतुनाशक तंत्रज्ञानामुळे डबे स्वच्छ आणि जंतू मुक्त राहतात याची खात्री होते.

वंदे भारत स्लीपर ट्रेन चे तिकीट दर

वंदे भारत स्लीपर ट्रेन चे तिकीट आपण हावडा ते गुवाहाटी पर्यंत किती असेल हे पाहणार आहोत.

AC थ्री टायर अंदाजे 2000 ते 2300
AC टू टायर अंदाजे 2500 ते 3000 रुपये
फर्स्ट AC अंदाजे 3000 ते 3600

रेल्वेचे वेळापत्रक

vande bharat sleeper train launched howrah to Guwahati route

ही वंदे भारत स्लीपर ट्रेन हावडा या स्टेशनवरून संध्याकाळी 6.20 मिनिटांनी निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8.20 मिनिटांनी गुवाहाटी येथे पोहोचेल.