Eligible women under ladaki bahin yojana : लाडक्या बहिणींनी कुठे करावा अर्ज?
Eligible women under ladaki bahin yojana still awaiting monthly fifteen hundred rupees despite completing e-kyc राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 दर महिन्याला दिले जातात. मात्र केवायसी करूनही अनेक महिलांच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. अशा महिलांना आता आपले पैसे मिळवण्यासाठी इथे अर्ज करता येईल? चला जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया..
eligible women under ladaki bahin yojana still awaiting monthly fifteen hundred rupees despite completing e-kyc राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. मात्र पात्र महिलांना 1500 रुपये न मिळाल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
ई- केवायसी प्रक्रिया करूनही महिलांच्या खात्यात अद्याप अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये नाराजी आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र आता महिलांना दिलासा देणारी माहिती समोर आलेली आहे.
राज्य सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 ही केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली होती.
यामध्ये राज्यभरातील लाखो महिलांनी ई-केवायसी करून घेतली. त्यानंतरही अनेक महिलांच्या खात्यात हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत. ग्रामीण भागातील महिलांना याचा मोठा फटका बसला आहे.
ई-केवायसी करत असताना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची योग्य माहिती नसणे.
तांत्रिक अडचणी आणि आधार कार्ड व बँक खात्याची लिंकिंग अपूर्ण असणे.
अर्जात चुकून चुकीची माहिती भरली जाणे.
अशा काही कारणामुळे महिलांचे अनुदान रखडल्याची माहिती समोर आलेली आहे.
त्रुटी दूर झाल्यानंतर मिळणार अनुदान?
Eligible women under ladaki bahin yojana
माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ई- केवायसी करत असताना काही महिलांना माहिती नसल्यामुळे प्रश्नांची चुकीची उत्तरे दिले. त्यामुळे त्यांच्या अनुदान थांबल्याचे दिसून येत आहे. हप्ता जमा न झाल्याने महिलांनी बाल विकास विभाग, तहसील कार्यालय तसेच संबंधित सरकारी कार्यालयाकडे धाव घेण्यास सुरुवात केली. मात्र अनेक ठिकाणी स्पष्ट व समाधानकारक उत्तरे त्यांना मिळाले नसल्याने महिलांची चिंता अधिक वाढली आहे.
राज्य सरकारची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अनुदान मिळत नसेल तर याचा लाभ कोणाला मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि याबरोबरच आम्हाला न्याय कोण देणार? अशी मागणी महिला करत आहेत.
दुसरीकडे संबंधित विभागाकडून तांत्रिक पडताळणी सुरू असल्याचे उत्तर दिले जात आहे. मात्र ई-केवायसी प्रक्रियातील त्रुटी दूर झाल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
मिळालेले अर्ज मंत्रालयात पाठवणार?
Eligible women under ladaki bahin yojana
यासंदर्भात राज्य सरकारने लवकरात लवकर आपले मार्गदर्शन करावे, अशी महिलांकडून मागणी करण्यात आली आहे. याबरोबरच तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी गावात विशेष शिबीर आयोजन करावेत, कोणतीही महिला अनुदानापासून वंचित राहू न याची काळजी घ्यावी, अशी मागणी लाभार्थी महिलांकडून करण्यात येत आहे.
मात्र महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ई- केवायसीतील त्रुटीमुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या महिलांचे अर्ज स्वीकारण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्व अर्ज मंत्रालयात पाठविण्यात येणार असून त्यानंतर संबंधित रखडलेले हप्त्याचे पैसे त्यांना मिळू शकतील.
महाराष्ट्र सरकारने संक्रांतिपूर्वी दोन हप्त्याचे एकत्रित अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र न्यायालयाने हरकत घेतल्याने दोन महिन्याच्या अनुदान विपरीत करण्यात अनेक अडचणीचा सामना करावा लागला.
तसेच निवडणूक आचारसंहितामुळे दोन महिने ते जमा करता आले नाही. त्यामुळेही अनुदान रखडले आहे. आता निवडणुकीचा निकाल लागला आहे आचारसंहिताय संपली आहे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी पैसे जमा होतात हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे.