Who is the mayor of Mumbai? : मुंबईचा महापौर कोण?

Who is the mayor of Mumbai : देवाच्या मनात असेल तर आपलाच महापौर- उद्धव ठाकरे

Who is the mayor of Mumbai : महानगरपालिकेचा निकाल लागला. मात्र आता मुंबईचा महापौर कोण होणार? असा प्रश्न पडला आहे. कारण शनिवारी उद्धव ठाकरे म्हणाले की देवाच्या मनात असेल तर आमचाच महापौर होईल. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी आपले निवडून आलेले सर्व नगरसेवक हॉटेलमध्ये एकत्र ठेवले आहेत. तर संजय राऊत यांनीही आमचाच महापौर होणार असे संकेत दिले आहेत. आता मुंबईत काय होते हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकल्या असल्या तरी सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज त्यांना पडणार आहे. मात्र हे लक्षात घेत एकनाथ शिंदे यांनी आम्हालाही अडीच वर्षासाठी महापौर पद मिळावे असा आग्रह धरला आहे. त्यामुळे त्यांनी आपले 29 निवडून आलेले नगरसेवक वांद्रे येथील हॉटेल ताज लेन्समध्ये एकत्र ठेवले आहे. त्यांना आपले नगरसेवक फुटण्याची भीती तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपने 89 जागा जिंकले आहेत. शिंदे सेनेने 29 जागांवर विजय मिळवला आहे. तर ठाकरे बंधूंनी 72 जागावर विजय मिळवला आहे. त्यामुळे सर्वांनाच महापौर बसवण्याची संधी मिळू शकते. विधानसभेप्रमाणे आमदार पळवा पळवी चा प्रकार महानगरपालिकेमध्ये ही दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोणाचे नगरसेवक फुटणार? कोणाकडे जाणार? आणि कोणाचा महापौर बनणार? हे येणारा काळच ठरवणार आहे. लवकरच हे चित्र स्पष्ट होईल आणि मुंबईला नवा महापौर मिळेल. पण तो कोणाचा असेल? हे आता स्पष्ट सांगता येणे कठीण आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 89 जागा वर विजय मिळाला तर एकनाथ शिंदे यांना 29 जागा मिळवता आल्या तर ठाकरे बंधूंना ७२ जागांवर विजय मिळवला आहे. पहिल्यांदाच भाजपला महापौर पद मिळणार आहे तर शिवसेनेची पंचवीस वर्षे सत्ता राखण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गटातील निवडून आलेल्या नगरसेवकांनी ठाकरे यांच्यासोबत वर्षांवर्ष काम केलेले आहे. यामुळे दगा फटक्याची भीती लक्षात घेऊन शिंदेंकडून नवनियुक्त नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. शिंदे सेनेकडून ही काळजी घेतली जात आहे. महापौर भाजपचा होत असला तरी आपल्या नगरसेवकाशिवाय ते शक्य नाही हे एकनाथ शिंदेंना माहिती आहे. त्यामुळे त्यांनीही अडीच वर्षाचा फॉर्मुला भाजप सोबत ठेवण्याची चर्चा आहे. मात्र भाजप सोबत बोलणे जास्त ताणली तर आहेत तेही नगरसेवक फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत महापौरपदी कोणाची निवड होत नाही तोपर्यंत विजयी नगरसेवकांना हॉटेल ताज लँड मध्ये थांबण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

महायुतीत वाद होणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई महानगरपालिकेतील महापौर बाबत महायुतीत कोणताही वाद होणार नाही. महापौर कोण? Who is the mayor of Mumbai? कधी होणार? आणि किती काळासाठी असेल या सर्व गोष्टी उपमुख्यमंत्री Eknath Shinde एकनाथ शिंदे, मी आणि आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते बसून ठरवू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी म्हटले आहे.

देवाच्या मनात असेल तर आपला महापौर- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray मुंबई महानगरपालिकेत आपल्याला 72 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. आपण मोठा आकडा गाठू शकलो नाही परंतु आपला महापौर व्हावा हे स्वप्न तर आहे. देवाच्या मनात असेल तर तेही नक्की घरेल असे ठाकरे म्हणाले आहेत. त्यांचे हे वक्तव्य देखील देवा म्हणजे नक्की कोण यावर प्रश्न निर्माण झाला आहे.