How To Change Mobile Number In Driving Licence Online See Complete Process : ड्रायव्हिंग लायसनचा मोबाईल नंबर ऑनलाईन कसा बदलावा?
How To Change Mobile Number In Driving Licence Online See Complete Process : जर तुम्ही नुकताच तुमचा मोबाईल नंबर बदलला आहे तर तुमच्यासाठी आवश्यक आहे की, तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन मध्ये नवीन मोबाईल नंबर अपडेट करावा. यामुळे तुम्हाला आवश्यक अपडेट वेळेवर मिळत राहतील. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, तुम्ही घर बसून ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हर लायसन ला लिंक असलेला मोबाईल नंबर ऑनलाईन पद्धतीने कसा अपडेट करू शकता.
तुमच्या ड्रायव्हिंग लायसन चा मोबाईल नंबर अपडेट होणे खूप आवश्यक झाला आहे. कारण ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित कुठलीही माहिती अर्जाची स्थिती रिन्यूअल अलर्ट किंवा अन्य आवश्यक मेसेज मोबाईलवर येतात.
जर तुमचा मोबाईल नंबर चुकीचा असेल तर तुम्हाला ही माहिती मिळणार नाही आणि जर तुम्ही नुकताच तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसनला नवीन नंबर अपडेट करणे आवश्यक आहे.
यामुळे तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, घरी बसून ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसनला तुम्ही तुमचा नवीन मोबाईल नंबर कसा अपडेट करू शकता याची प्रक्रिया खूप सोपी आहे.
ड्रायव्हिंग लायसनचा मोबाईल नंबर बदलण्यासाठीची कागदपत्रे
Change Mobile Number In Driving Licence Online See Documents
ड्रायव्हिंग लायसनला लिंक असलेला मोबाईल नंबर जर तुम्हाला अपडेट करायचा असेल तर ड्रायव्हिंग लायसन नंबर, नवीन मोबाईल नंबर आणि आधार कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भातील अनेक सेवा आता ऑनलाईन झालेल्या आहेत. मोबाईल नंबर अपडेट केल्याने तुम्हाला सर्व सूचना वेळेवर मिळत राहतील. या व्यतिरिक्त भविष्यामध्ये लायसन रिन्यूअल ऍड्रेस चेंज किंवा डुप्लिकेट लायसन बनवण्यासाठी ही मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
असा बदला मोबाईल नंबर
How To Change Mobile Number In Driving Licence Online See Complete Process
ड्रायव्हिंग लायसन मध्ये मोबाईल नंबर बदलण्यासाठी सर्वात प्रथम परिवहन या अधिकृत वेबसाईटवर जा.
होम पेजवर गेल्यावर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन रिलेटेड सर्व्हिस या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागेल.
लॉगिन करा आणि अपडेट मोबाईल नंबर किंवा चेंज मोबाईल नंबर या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आता तुमच्या नवीन मोबाईल नंबर नोंदणी करा आणि एक ओटीपी द्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण करा आणि त्यानंतर तुम्ही सर्व माहिती एकदा वाचून सबमिट या बटनावर क्लिक करा.
ड्रायव्हिंग लायसनचा मोबाईल नंबर बदलण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क लागत नाही. मात्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये नियमांमध्ये थोडे बदल असू शकतात.
ऑनलाइन अपडेट नाही झाला तर काय करावे?
जर कुठल्या कारणाने ऑनलाईन मोबाईल नंबर अपडेट नाही झाला तर तुम्ही तुमच्या जवळच्या आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन मोबाईल नंबर अपडेट करू शकता. यासाठी ड्रायव्हिंग लायसन ओळखपत्र तुमच्या सोबत असणे आवश्यक आहे.