Devendra Fadnavis Announces 15 Lakh Jobs In Maharashtra In Marathi : राज्यात 15 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार
CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावस येथे एक मोठी घोषणा केली राज्यात 15 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र हेच खरे गेटवे ऑफ इंडिया असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. स्वित्झर्लंडच्या येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ड इकॉनोमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत त्यांनी हे विधान केले.
महाराष्ट्र हे भारताच्या भविष्याचे पावर हाऊस आहे असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी दावस या दौऱ्यावर असताना पहिल्याच दिवशी 14 लाख 50 हजार कोटी गुंतवणुकीचे 19 सामंजस्य करार झाले.
यावेळी गुंतवणुकीबरोबरच राज्यात 15 लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत केली. सरकारच्या विविध विभागाचे प्रतिनिधी मंडळ दावस येथे गेले आहेत.
Devendra Fadnavis Announces 15 Lakh Jobs In Maharashtra दावस दौऱ्याच्या पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सारस्य दाखवण्यात सुरुवात केली आहे. तब्बल 14 लाख 50 हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आला आहे.
CM Devendra Fadnavis या गुंतवणुकी सोबतच राज्यात 15 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यावेळी विविध विभागांनी आणि विविध कार्यक्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समावेश मुख्यमंत्री फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या आहेत.
हरित ऊर्जा, अन्नप्रक्रिया पोलाद निर्मिती, आयटीआयटीएस डाटा सेंटर, मोबाईल जहाज बांधणी, डिजिटल इन्फ्रा आशा विविध क्षेत्रातील ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पोहोचणार आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला देखील चालना मिळणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की भविष्याचे वेध घेण्यासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि दीर्घकाळाच्या भागीदार म्हणून महाराष्ट्र स्वागत करीत आहे. भारताच्या भविष्याचे पावर हाऊस म्हणून महाराष्ट्र जगाला उद्योग विश्वाला साथ घालत आहे.
महाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा गुंतवणूकदारांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाही बाबत वॉर रूमच्या माध्यमातून लक्षात ठेवण्यात येईल. उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि उत्तम पद्धतीने मिळाव्यात याची पुरेपूर काळजी घेण्यात येईल.