Ladki Bahin Yojana : पुढील हप्त्याबद्दल आली नवी अपडेट
Ladki Bahin Yojana August Installment 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात कधी जमा होणार? याकडे लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. ऑगस्टचा महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? e- kyc पूर्ण करणे आवश्यक आहे का? तसेच पैसे खात्यात आले की नाही हे कसे तपासावे. यासंदर्भातील संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.
जुलै महिन्याचा हप्ता जमा
Ladki Bahin Yojana रक्षाबंधन पूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनचा जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला. मात्र अद्यापही अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यांना अजूनही जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहेत. ज्या महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आता त्यांना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लावली आहे.
या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत महिला व बालविकास विभागाच्या संकेतस्थळावरही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती दिलेली आहे.
ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार?
जुलैचा हप्ता जमा झाल्यानंतर आता महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याची प्रतीक्षा लागलेली आहे. मात्र सरकारकडून अजून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे अधिकृत तारीख जारी करण्यात आलेली नाही.
त्यामुळे लाभार्थी लाडक्या बहिणींनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तारखावर विश्वास ठेवू नये. अधिकृत अपडेट कडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पण जुलैचा हप्ता जमा झाल्यानंतर आता ऑगस्टच्या हत्याबाबत प्रक्रिया आणि पात्र लाभार्थ्यांची पडताळणी याकडेही लक्ष लागलेली आहे. कारण जुलै महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यामधील जमा झालेला नाही.
e-KYC का महत्वाची?
Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया महत्त्वाची आहे. याद्वारे अपात्र लाभार्थी महिला वगळल्या जातात आणि पात्र लाभार्थी महिलांनाच योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही पडताळणी करणे आवश्यक आहे.
त्यामुळे तुमची ई केवायसी पूर्ण आहे का? आधार संबंधित माहिती योग्य आहे का? आणि बँक खाते डीबीटी साठी योग्य आहे का? आदी माहिती तुम्ही तपासून घेणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण केली नाही त्यांना पुन्हा संधी देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे. कारण यावर अजून निर्णय झालेला नाही.
हप्ता खात्यात आला की नाही कसे तपासावे?
आपल्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झाला आहे का नाही हे तपासण्यासाठी महिलांनी खालील गोष्टी कराव्यात..
सर्वात प्रथम बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासून घ्या.
बँक खात्यात कडून आलेला SMS तपासा यामधूनही तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का नाही कळेल.
तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का? हे बँकेत जाऊन एकदा तपासून घ्या.
डीबीटी संदर्भातील माहिती तपासून घ्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध असलेली माहिती एकदा तपासून घ्या.
यासंदर्भातली माहिती महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर दिलेली आहे.
कोणाला मिळतो हप्ता?
महाराष्ट्र सरकारने ई- केवायसी पडताळणी केल्यानंतर ज्या महिला पात्र ठरल्या आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा करण्यात येतात. याच महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. पात्रता, अपात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर नियम अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यामुळे केवळ पूर्वी हप्ता मिळाला म्हणून पुढील प्रत्येक हप्ता निश्चित मिळेल असे समजता येणार नाही. लाभार्थ्यांची पात्रता आणि आवश्यक पडताळणी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये ई केवायसी प्रक्रिया महत्त्वाची आहे.
महिलांनी काय करावे?
जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला नाही म्हणून महिलांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांनी आपली ई-केवायसी, आधार बँक लिंकिंग आणि बँक खाते सक्रिय आहे का हे तपासून घ्यावे. एखाद्या वेळेस एक- दोन दिवसातही लाडक्या बहिणीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो. त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आणि लवकरच त्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचाही हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची सूचना
लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या दिवशी जमा होणार आहे. या संदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा किंवा तारीख देण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर मिळणाऱ्या तारखेकडे लक्ष न देता अधिकृत पोर्टल द्वारे मिळणाऱ्या माहितीकडे आणि बातमीकडे लक्ष द्यावे जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळेल.
लाडकी बहीण योजनेचे अधिकृत पोर्टल
कुठलीही मनात शंका असेल तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल वर जाऊन पात्रता आणि अर्ज संबंधित माहिती तपासून शकता. बनावट वेबसाईट पासून दूर राहा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.
FAQs
ऑगस्टचा लाडक्या बहिणीचा हप्ता किती आहे?
पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रत्येक महिन्याला जमा करण्यात येतात.
जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला का?
रक्षाबंधनापूर्वीच अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. मात्र अनेक बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया चालू आहे.
ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार?
लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातील अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. त्यामुळे तारीख जाहीर झाल्यानंतरच आपल्याला ते कळेल.
ekyc महत्त्वाची आहे का?
होय.. लाभार्थ्यांची पात्रता आणि पडताळणी प्रक्रियेसाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
हप्ता आला नाही तर काय करावे?
सर्वात प्रथम लाडक्या बहिणींनी घाबरून जाऊ दे. बँके खाते आधार लिंकिंग, डीबीटी आणि ई केवायसीची माहिती तपासून घ्या. त्यानंतर अधिकृत योजनेच्या पोर्टलवर जाऊनही तुम्ही तुमची माहिती तपासून घ्या.