Sukanya Samriddhi Yojana 2026 How Much Needs To Be Invested To Earn Rs 1000000 Interest in marathi : जाणून घ्या कॅल्क्युलेशन
sukanya samriddhi yojana : सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही आपल्या मुलीच्या नावावर गुंतवणुकीची सुरुवात करून 10 लाख रुपयांपेक्षा अधिक व्याज मिळू शकतात. यासाठी तुम्हाला मुलीच्या नावावर काढलेल्या सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला केवळ 2550 रुपये जमा करावे लागतील. चला या संदर्भातील जाणून घेऊया संपूर्ण माहिती..
SSY : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना देशात गेम चेंजर ठरत आहे. कारण या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात मुलींच्या नावावर गुंतवणूक होत आहे यामुळे मुलींची भविष्य सुरक्षित होत आहे.
सुकन्या समृद्धी योजनामध्ये दहा वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या मुलीच्या नावावर गुंतवणूकीची सुरुवात करता येते.
बेटी बचाव बेटी पढाव अभियान अंतर्गत या योजनेची सुरुवात 2015 मध्ये झाली. जर तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक करून मॅच्युरिटी वर 10 लाख पेक्षा अधिक व्याज मिळवायचे असेल तर यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती पैसे गुंतवावे लागतील, हे जाणून घ्यावे लागेल. सुकन्या समृद्धी योजना मध्ये वर्षाला 8.2% दराने व्याजदर दिले जाते.
SSY मध्ये गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी?
sukanya samriddhi yojana : या योजनेमध्ये कुठलाही व्यक्ती आपल्या दहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीच्या नावाने गुंतवणूक सुरू करू शकतो.
कुठलीही अधिकृत बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता.
यासाठी तुम्हाला कुठली बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडावे लागेल आणि त्यामध्ये गुंतवणूक करावी लागेल.
कुठलाही व्यक्ती वर्षाला 250 रुपये पासून ते दीड लाख रुपये पर्यंत गुंतवणूक सुकन्या समृद्धी योजनेमध्ये करू शकतो.
एका कुटुंबातील दोन मुलींच्या नावावरच या योजनेअंतर्गत गुंतवणूक करता येते.
गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी सुरुवात केल्यापासून 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते.
अकाउंट उघडल्या पासून 21 वर्षानंतर गुंतवणूक मॅच्युअर होते.
दहावी पास झाल्यानंतर किंवा 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून अर्धी रक्कम काढता येते.
या योजनेमध्ये 8.2% वर्षाला चक्र व्याज मिळते.
दहा लाख व्याज मिळवण्यासाठी किती गुंतवणूक?
SSY : जर तुम्हालाही तुमच्या मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत गुंतवणूक सुरू करायचे आहे आणि तुम्हाला मॅच्युरिटी वर 10 लाख रुपये पर्यंत व्याज मिळवायचे असेल तर प्रत्येक महिन्याला या योजनेमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2550 रुपये सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे म्हणजेच वर्षाला तुम्हाला 30,600 रुपये या योजनेमध्ये गुंतवावे लागतील.
SSY : सतत 15 वर्ष गुंतवणूक सुरू ठेवल्यानंतर एकूण रक्कम 4 लाख 59 हजार रुपये होईल. वर्षाला मिळणाऱ्या 8.2 व्याज दरानुसार मॅच्युरिटी वर 10 लाख रुपयेपेक्षा अधिक व्याज तुम्हाला या योजनेतून मिळू शकते. म्हणजेच मॅच्युरिटीवर तुम्हाला 14 लाख 60 हजार रुपये पेक्षा अधिक फंड मिळू शकतो. जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये वर्षात दीड लाख रुपये गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी वर तुम्हाला 44 लाख रुपयापेक्षा अधिक रक्कम परत मिळू शकते.
मुलीचे भविष्य करा सुरक्षित
SSY : केंद्र सरकारने 2015 मध्ये सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक व्यक्ती आपल्या दहा वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडू शकतो आणि त्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. यामध्ये तुम्हाला 250 रुपये पासून ते दीड लाख रुपयापर्यंत वर्षाला गुंतवणूक करता येते.
SSY : ज्यावेळेस मुलीचे वय 21 वर्षे किंवा ती दहावी पास झाल्यानंतर तुम्हाला या योजनेतून अर्धी रक्कम काढता येते. त्यानंतर तिच्या लग्नाच्या वेळी किंवा पुन्हा उच्च शिक्षणासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेतून संपूर्ण रक्कम काढू शकता. त्यामुळे ही योजना मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलीच्या भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुमच्या मुलीला उच्च शिक्षण घेत असताना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही आणि ती आपल्या पायावर उभी राहील.
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे
sukanya samriddhi yojana :
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 8.2% व्याजदर मिळते.
मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय.
कमी गुंतवणुकीमध्ये चांगला परतावा या योजनेतून मिळतो.
या योजनेमुळे मुलींच्या पंखांना बळ मिळते.
मुलीला उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा पैसा या योजनेमुळे प्राप्त होतो.
मुलीला कुठल्याही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही.