PM Shram Yogi Mandhan Yojana : भन्नाट योजना…दररोज 2 रुपये गुंतवून मिळवा 3000 रुपये पेन्शन

2 rupees per day to get a guaranteed life time pension of 3000 in marathi : जाणून घ्या श्रमयोगी मानधन योजनेची अधिक माहिती

PM Shram Yogi Mandhan Yojana : केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. या योजनेमध्ये केवळ दररोज 2 रुपये गुंतवणूक करून महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळवता येते. तुम्हाला या योजनेबद्दल माहिती आहे का? नाही चला मग आपण जाणून घेऊया केंद्र सरकारच्या या योजनेबद्दल..

PM SYM yojana : केंद्र सरकारची ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन मिळण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला केवळ 55 रुपये गुंतवणूक करून प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये गॅरंटी पेन्शन मिळवता येते.

PM-SYM Scheme : केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहे ज्या देशातील असंघटित कामगारांना लक्ष ठेवून सुरू करण्यात आलेल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्ही केवळ 55 रुपये महिन्याला गुंतवणूक करून निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये गॅरंटीने पेन्शन मिळू शकता. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM-SYM) असे या योजनेचे नाव आहे. मोदी सरकारने ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केली आहे.

कोणासाठी आहे ही योजना?

PM SYM yojana : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना आहे. यामध्ये रिक्षाचालक, भाजीपाला विक्रेते, घर काम करणाऱ्या महिला, शेतमजूर अशासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे. तुमचे वय 18 ते 40 दरम्यान आहे आणि तुमचा पगार 15000 पेक्षा कमी आहे तर ही योजना तुमच्यासाठी आहे. यामध्ये विशेष करून अशा गोष्टी लक्षात ठेवण्यात आल्या आहेत की अर्जदार आयकर दाता नसावा तसेच ईपीएफओ, ईएसआयसी आणि एनपीएस सारख्या कोणत्याही सरकारी सामाजिक सुरक्षा योजनेचा सदस्य नसावा.

श्रमयोगी मानधन योजनेची पात्रता 

वय मर्यादा : 18 ते 40 दरम्यान वय असावे.
उत्पन्न मर्यादा : तुमचे उत्पन्न महिन्याला 15000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
अन्य अटी : श्रमिक EPFO, NPS किंवा ESIC चा सदस्य नसावा आणि आयकर जाता नसावा.

श्रमयोगी मानधन योजनेची वैशिष्ट्ये

किती पेन्शन मिळते : साठ वर्षे पूर्ण झाल्यावर तीन हजार रुपये महिना पेन्शन या योजनेतून मिळते.
योगदान किती : ही एक अंशदायी योजना आहे यामध्ये लाभार्थी चे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावे त्यानुसार 55 रुपये ते दोनशे रुपये प्रति महिना योगदान म्हणून रक्कम भरावी लागते आणि सरकार पण तेवढीच रक्कम श्रमयोगी मानधन योजनेच्या खात्यामध्ये जमा करते
कुटुंबीयांना पेन्शन मिळते : जर अचानक लाभार्थी व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला 50% ( 1500 रुपये) पेन्शन दिली जाते.

सरकारही देते 50 टक्के योगदान

PM SYM yojana : या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 50% योगदान सरकार कडून दिले जाते म्हणजेच ही एक ‘मॅचिंग कॉन्ट्रीब्युशन’ योजना आहे. म्हणजे जेवढी रक्कम तुमच्या बँक खाते मधून वजा होईल तेवढीच रक्कम भारत सरकारकडूनही तुमच्या पेन्शन खात्यामध्ये जमा करण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही 55 रुपये रक्कम भरत असाल तर सरकारही 55 रुपये तुमच्या खात्यात भरेल. यामुळे एकूण रक्कम 110 रुपये प्रति महिना होईल. वय वाढण्याबरोबरच प्रीमियम ही वाढत जातो आणि सरकारचे योगदानही वाढत जाते.

श्रमयोगी मानधन योजनेची अर्ज प्रक्रिया

PM SYM yojana : तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन केंद्र सरकारची अधिकृत श्रमयोगी मानधन पोर्टलवर ऑनलाईन रजिस्टर करू शकता. यासाठी केवळ आधार कार्ड आणि बचत बँक खाते किंवा जनधन खाते (ज्याद्वारे प्रत्येक महिन्याला auto डेबिट होऊ शकेल) आवश्यकता असते. PM Shram Yogi Mandhan registration श्रमयोगी योजनेत जुलै 2026 पर्यंत नोंदणीकृत लाभार्थ्यांची संख्या 54 लाख पेक्षा अधिक होती. देशभरामध्ये जवळपास 4 लाख सेंटरचे एक नेटवर्क आहे.

FAQs

श्रमयोगी मानधन योजना कोणासाठी आहे?
श्रमयोगी मानधन योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे.
श्रमयोगी मानधन योजना कोणी सुरू केली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 रोजी ही योजना सुरू केली.
श्रमयोगी मानधन योजनेचा फायदा काय?
निवृत्ती वय झाल्यानंतर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन मिळते.
श्रमयोगी मानधन योजनेमध्ये किती रुपये गुंतवणूक करावी लागेल?
श्रमयोगी मानधन योजनेमध्ये महिन्याला केवळ 55 रुपये गुंतवणूक करून तुम्हाला 3 हजार रुपये पेन्शन मिळते.
श्रमयोगी मानधन योजनेचा कोणाला मिळतो?
श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगार म्हणजेच भाजीवाले, रिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिल्या, शेतमजूर आदींना या योजनेचा लाभ दिला जातो.

श्रमयोगी मानधन योजनेचा कसा करावा अर्ज

तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन केंद्र सरकारची अधिकृत श्रमयोगी मानधन पोर्टलवर ऑनलाईन रजिस्टर करू शकता.