Pradhanmantri Suryoday Yojana
Pradhanmantri Suryoday Yojana 2024 प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 ची संपूर्ण माहिती:
PM solar Panel Yojana 2024 :अयोध्यामध्ये श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हरित ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करून दिल्लीला परतल्यानंतर मोदींनी देशभरातील १ कोटी घरांना सौरऊर्जेवरील छत देण्याची घोषणा आहे. ही सुविधा प्रधानमंत्री सूर्योदय योजनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
- ठळक मुद्दे :-
- प्रधानमंत्री सुर्योदय योजना म्हणजे काय?
- सौर उर्जेसाठी सरकारचे प्रयत्न
- प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची थोडक्यात माहिती
- प्रधानमंत्री सूर्योदय योजनाचा कोणाला मिळणार लाभ
- २५ वर्षांसाठी केवळ प्रतिदिन ८ रूपये दर
- सोलर पॅनल योजनेद्वारे 1 कोटी कुटुंबांना मिळणार मोफत वीज
- १८ हजार कोटींची होणार बचत
- २०७० पर्यन्त निव्वळ शून्य लक्ष्य
- या योजनेतून होणार रोजगार निर्मिती
- प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा उद्देश Purpose of PM Suryoday Yojana
- प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे लाभ Benefites of PMSY
- प्रधानमंत्री सूर्योदय योजणेसाठी पात्रता Eligibility
- या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे Document’s
- पीएम सुर्योदय योजनेची वैशिष्ट
- पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करावा pradhanmantri suryoday yojana online apply
- आता मिळणार 60 टक्के सबसिडी
- FAQ’S
प्रधानमंत्री सुर्योदय योजना म्हणजे काय? what is PM Suryoday Yojana?
देशातील अल्प-मध्यम उत्पन्न असलेल्या नागरिकांच्या घराच्या छतावर या योजने अंतर्गत सौर पॅनेल बसवले जाणार आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेद्वारे १ कोटी लोकांना याचा लाभ होणार आहे. ही सौरऊर्जा पॅनेल सूर्यप्रकाशात चार्ज होतील आणि नागरिकांना मोफत वीज पुरवठा होईल. यामुळे विजेची बचत होईल आणि नागरिकांचा खर्चही वाचेल.
सौर उर्जेसाठी सरकारचे प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार 2030 पर्यंत देशात सौर उर्जेसह बिगर जीवाश्म इंधनापासून 500 गिगावॅट वीज निर्मिती क्षमता साध्य करण्याचे लक्ष ठेवले आहे.
देशात नोव्हेंबर 2023 पर्यंत एकूण 72 .31 गिगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यात 1 कोटी 10 लाख पेक्षा अधिक सौर दिव्यांचा समावेश आहे.
सौर पार्क आणि अल्ट्रा मेगा सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे नोव्हेंबर 2023 पर्यंत 37490 मेगावॅट क्षमतेचे 50 सौर पार्क उपलब्ध केले आहेत. तर 10401 मेगावॅट क्षमतेचे पार्क सुरू करण्यात आले आहेत.
2030 पर्यंत रेल्वे हरित उर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट मोदी सरकारने ठेवले आहे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | प्रधानमंत्री सूर्योदय योजना |
कधी सुरू झाली | 22 जानेवारी 2024 |
किती मिळणार सबसिडी | 60% टक्के |
उद्देश | 1 कोटी घरांवर बसणार सौर पॅनल |
लाभ | वीज वाचवण्यासाठी होणार मदत |
कसा करावा अर्ज | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | https://solarrooftop.gov.in |
प्रधानमंत्री सूर्योदय योजनाचा कोणाला मिळणार लाभ
प्रधानमंत्री सूर्योदय योजनाचा लाभ अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या नागरिकांना मिळणार आहे. या योजनेसाठी अल्प-मध्यम उत्पन्न वर्गातील लोक पात्र आहेत. पात्र असलेल्या नागरिकांच्या घरांना सौरऊर्जेतून निर्माण होणारी वीज मोफत मिळणार आहे.
२५ वर्षांसाठी केवळ प्रतिदिन ८ रूपये दर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचा गरीब लोकांना मोठा फायदा होणार आहे. सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ३ kw (केडब्ल्यू) क्षमतेच्या प्लांटसाठी प्रकल्पाची किंमत जवळपास एक लाख २६ हजार रूपये आहे. त्यापैकी सरकार ५४ हजार रूपये अनुदान म्हणून देणार आहे. म्हणजेच हा प्लांट तयार करण्यासाठी तुम्हाला केवळ ७२ हजार रूपयांचा खर्च करावा लागेल. हा तयार करण्यात आलेला सौरऊर्जा प्लांटचे आयुष्य २५ वर्षे असेल. त्यानुसार २५ वर्षे विजेसाठी तुम्हाला दररोज फक्त ८ रूपये खर्च करावे लागतील. त्यामुळे नागरिकांचा एक प्रकारे फायदाच आहे. या योजनेचा लाभार्थ्यांची प्रत्येक महिन्याला भरावे लागणाऱ्या बिलातून सुटका होणार आहे.
सोलर पॅनल योजनेद्वारे 1 कोटी कुटुंबांना मिळणार मोफत वीज
पंतप्रधान सूर्योदय योजनेद्वारे देशातील एक कोटींहून अधिक कुटुंबांना वार्षिक 18,000 कोटी रुपयांची बचत करता येईल, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करता असताना दिली होती. यासोबतच सूर्योदय योजनेमुळे लोकांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील, असंही सीतारमण या वेळी बोलताना म्हणाल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024 मध्ये पीएम सूर्योदय योजनेबाबत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आपण याबाबत आणि योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ..
१८ हजार कोटींची होणार बचत
PM solar Panel Yojana 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातून परतल्यानंतर प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची PMSY घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत जवळपास १ कोटी घरांवर सोलार पॅनल बसवण्यात येणार आहे असे मोदींनी सांगितले. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा करून असे सांगितले की एका कुटुंबाला कमीत कमी ३०० युनिट वीज वाचवता येईल असा सौर पॅनल छतावर बसवणार आहोत त्यामुळे १८००० कोटींची बचत होईल. यामुळे वीज वाचण्यास मोठी मदत होईल कोट्यवधी कुटुंबे ही वीज वाचवतील आणि त्याचबरोबर वीज कंपन्यांना ही कुटुंबे वीज वाचून हातभार लावतील, ही वीज कंपन्यांना विकून त्यातून उत्पन्न वाढवू शकतील.
२०७० पर्यन्त निव्वळ शून्य लक्ष्य
२०२४ च्या अर्थसंकल्पनात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी असे सांगितले की २०७० पर्यन्त आपल्याला “नेट झीरो” ही लक्ष्य साध्य करायचे आहे. या सौर उर्जेसोबतच पवन ऊर्जा स्त्रोतांचा पाठपुरावा करण्यासाठी सरकार आणखीन निधीची व्यवस्था करत आहे. सरकार वीज कंपन्यांना पवन उर्जेद्वारे १००० मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. आणि त्याचबरोबर बायोगॅस बनवण्यासाठी जी आवश्यक उपकरणे असतात ते उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकार मदत करणार आहे.
या योजनेतून होणार रोजगार निर्मिती
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या PM Suryoday Yojana 2024 माध्यमातून अशी आशा निर्माण केली आहे की देशात एलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. या योजनेतून निर्माण होणाऱ्या उर्जेचा पुरवठा करण्यासाठी त्याचे कौशल्य असलेल्या तरुणांना रोजगार मिळेल त्यामुळे रोजगारांच्या अनेक संधी निर्माण होतील.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा उद्देश Purpose of PM Suryoday Yojana 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ ही केंद्र सरकारची नवीन योजना घोषित केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे १ कोटी गरीब व मध्यम कुटुंबाच्या घरच्या छतावर सोलार पॅनल बसवणे हा आहे.
देशातील मध्यम आणि गरीब कुटूंबांसमोर सर्वात मोठी समस्या आहे महागाई आणि अव्वाचे सव्वा येणारे वीज बिल या समस्यामधील महत्वाची भूमिका निभावतो. पीएम सुर्योदय योजना २०२४ देशातील गरीब जनतेला याचा महागड्या बिलापासून सुटका करून देण्याचा एक प्रयत्न आहे. या योजनेअंतर्गत सरकारद्वारे देशातील एक कोटी गरीब व मध्यम वर्गातील कुटुंबियांच्या घरांवर सोलर पॅनल लावले जातील. याबरोबरच सोलर पॅनल लावण्यासाठी सरकारकडून सब्सिडीही देण्यात येणार आहे. या योजनेची योग्य पद्धतीने अमलबजावणी झाल्यास गरीब कुटूंबियाचे जीवनातील आर्थिक स्थितीवर एक सशक्त प्रभाव तर टाकेलच, याबरोबरच सरकारची ऊर्जा संरक्षण नीतीमध्येही ही योजना एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे लाभ Benefites of PMSY
पीएम सुर्योदय योजना २०२४ द्वारे देशातील गरीब कुटुंबातील लोक आणि सरकारलाही अनेक दीर्घकाळीन लाभ होतील. चला तर मग जाणून घेऊ की सुर्योदय योजनेचे काय लाभ आहेत तर…
- पीएम सुर्योदय योजनेअंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबाला आपल्या महागड्या वीज बिलांपासून कायमची सुटका मिळेल. हा मोठा दिलासा आहे.
- या योजनेद्वारे गरीबांच्या घरांवर सोलर पॅनल लावले जातील.
- ऐवढेच काय तर सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार तुम्हाला सब्सिडीही देणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून सरकार आपले सौर ऊर्जा संरक्षणाचे लक्ष्य ही पूर्ण करू शकेल.
प्रधानमंत्री सूर्योदय योजणेसाठी पात्रता Eligibility
सध्या पीएम सुर्योदय योजना २०२४ ची काय पात्रता, अटी बद्दल अजून अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र काही आधारभूत अटी, ज्या प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून निश्चित करण्यात येतात, त्या सर्व या योजनेसाठीही असू शकतील. याबद्दलही आपण जाणून घेऊ…
- पीएम सुर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देशाचे रहिवासी असावे.
- ही योजना केवळ गरीब आणि मध्यमवर्गींयासाठी आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती दारिद्रय रेषेखालील किंवा मध्यम उत्पन्न गटातील असावा.
- या योजनेच्या पात्रतेसाठी तुमचे स्वत:चे घर असणे आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने निश्चित केलेले सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे Document’s
पीएम सुर्योदय योजना २०२४ चा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- लाभार्थीचे आधार कार्ड असावे.
- मुळ रहिवाशी प्रमाणापत्र
- लाभार्थ्यांचे उत्पन्न प्रमाणापत्र.
- लाभार्थ्यांच्या नावाचे वीज बिल
- फोन नंबर गरजेचा आहे
- कुठल्याही बँक मध्ये खाते असणे आवश्यक
- लाभार्थ्यांचा पासपोर्ट साइज फोटो
- रेशन काडे किंवा बीपीएल कार्ड -आदी.
पीएम सुर्योदय योजनेची वैशिष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘पीएम सूर्योदय योजना’ Pradhanmantri Suryoday Yojana सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश देशभरातील गरीब परिवारांना वीज बिलापासून दिलासा देण्यासाठी घरांवर सोलर पॅनल अथवा सोलर प्लेट लावून त्याचे वीज बिल कमी करणे या योजनेचा उद्देश आहे. या योजनेत जवळपास एक कोटी नारिकांना सोलर पॅनल लावण्यासाठी केंद्र सरकारकडून सब्सिडी देण्यात येणार आहे. त्यामुळे ही योजना सर्वांसाठी चांगली ठरणार आहे.
जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, योजनेचा फार्म भरायचा आहे, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. येथे पीएम योजनेसाठी असलेली पात्रता काय असेल तर यासाठी तुम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील असायला हवे. पीएम सुर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीय कुटूंबातील नागरिकांना होणार आहे.
पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करावा
pradhanmantri suryoday yojana online registration
पी एम सूर्योदय योजना 2014 साठी अर्ज करायचा आहे आपल्या घरावर सोलर बॅलन्स लावायचे आहे आणि यासाठी तुम्हाला सबसिडी हवी आहे यासाठी तुम्हाला या योजने साठी सर्वप्रथम अर्ज करावा लागेल.
पी एम सूर्योदय योजना 2024 साठी अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईट पीएम सूर्योदय योजना 2024 https://solarrooftop.gov.in या साइटवर भेट द्या.
त्यानंतर तुमच्यासमोर आलेल्या पीएम सूर्योदय योजना 2024 नोंदणीवर क्लिक करा. या योजनेवर मागण्यात आलेली सर्व माहिती तुम्ही भरा त्यानंतर सर्व माहिती तपासून सबमिट बटणावर क्लिक करा अशा पद्धतीने तुम्ही पीएम सूर्योदय योजना 2024 साठी आपला अर्ज करू शकता आणि सोलर पॅनल लावण्यासाठी सबसिडी प्राप्त करू शकता.
आता मिळणार 60 टक्के सबसिडी
या पूर्वी नागरिकांना घरावर सोलार पॅनल बसविण्यासाठी सरकारकडून 40 टक्के सबसिडी मिळत होती मात्र आता प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत 60 टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. बाकीची 40 टक्के रक्कम तुम्ही कर्ज स्वरूपात घेऊ शकता अशी माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी दिली आहे.
FAQ’S
या योजनेअंतर्गत विचारली जाणारी काही प्रश्न
- प्रधानमंत्री सूर्योदय योजना म्हणजे काय ?
- केंद्र सरकारच्या वतीने गरिबांना मोफत वीज मिळावी यासाठी सोलार पॅनल च्या माध्यमातून मोफत वीज दिली जाणार आहे.
- या योजनेचा कोणाला मिळतो लाभ ?
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो.
- किती टक्के मिळणार सबसिडी ?
- प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत आता 60 टक्के सबसिडी मिळणार आहे.
- कधी सुरू झाली प्रधानमंत्री सूर्योदय योजना ?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी आयोध्यातील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करून दिल्लीला परत गेल्यानंतर या योजनेची घोषणा केली.