Saur Kumpan Yojana 2024 In Marathi : सौर कुंपणाद्वारे करा शेतीचे संरक्षण

Saur Kumpan Yojana 2024 Information In Marathi : सौर कुंपण योजना 2024 मराठी माहिती

Saur Kumpan Yojana 2024 In Marathi : महाराष्ट्र सरकारने वन्यजीवांपासून शेतीचे संरक्षण व्हावे यासाठी सौर कुंपण योजना 2024 Saur Kumpan Yojana 2024 सुरू केली आहे. यामुळे शेतकरी आपल्या शेताचे वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी शेतात सौर कुंपण करून शेतीचे संरक्षण करू शकतो. त्यामुळे शेतीचे होणारे नुकसान थांबवता येईल आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. या योजनेच्या माध्यमातून 25 टक्के खर्च शेतकरी आणि 75 टक्के खर्च राज्य सरकार अशा पद्धतीने सौर कुंपण योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. Saur Kumpan Yojana सौर कुंपण योजना ही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेचा एक भाग आहे.

solar fencing yojana maharashtra चला तर मग आपण या सौर कुंपण योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. या योजनेसाठी अर्ज कसा करावा?, या योजनेसाठी कोण पात्र आहे?, त्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती या लेखात च्या माध्यमातून पाहूया.

Saur Kumpan Yojana

Saur Kumpan Yojana 2024 In Marathi भारत हा एक कृषीप्रधान देश आहे.  देशातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती हा आहे. परदेशातील वाढती लोकसंख्या त्यामुळे वाढत असलेली मानवी वस्ती तसेच नागरिकांच्या वाढत्या गरजा याबरोबरच अधिक उत्पादन घेण्याची स्पर्धा यामुळे जंगल कमी होत आहे. त्यामुळे वन्यजीव नागरी वस्तीत किंवा शेतात आपला निवारा शोधत आहेत.

Saur Kumpan Yojana 2024 सध्या मानव आणि वन्यजीव असा संघर्ष निर्माण झाला आहे. वन्यजीवांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सोलर कुंपण योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये सौर कुंपण बसवण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.

solar fencing yojana maharashtra राज्यामध्ये 2022 -23 या वर्षामध्ये शंभरहून अधिक लोकांनी वन्यजीवांच्या हल्ल्यामुळे प्राण गमावले आहेत. या वन्यजीवांपासून नागरिकांचे आणि शेतीचे संरक्षण करण्यासाठी सौर कुंपण योजना सुरू करण्यात आली आहे.

Saur Kumpan Yojana महाराष्ट्र सरकारने श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा कुंपण योजनेला मान्यता दिली आहे. यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. सौर ऊर्जा कंपनीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळाल्यानंतर पुढील 5 वर्षात वन्य प्राण्यांकडून होणारी शेतकरी नुकसान भरपाई साठी अर्ज करता येत नव्हता याबाबत बदल करण्यासाठी चा निर्णय सरकारच्या विचाराधीन होता त्यानुसार महाराष्ट्र सरकारने श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचा मला लाभ मिळाल्यानंतर वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास मी कुठल्याही परिस्थितीत नुकसान भरपाई करता अर्ज सादर करणार नाही असे नमूद केले आहे. त्याऐवजी या अटीमध्ये बदल करून सदर योजनेचा मला लाभ मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षापर्यंत वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास मी कुठल्याही परिस्थितीत नुकसान भरपाई करता अर्ज सादर करणार नाही अशी सुधारणा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

सौर कुंपण योजना 2024 मराठी माहिती

Saur Kumpan Yojana 2024 Information In Marathi

सौर कुंपण योजना 2024 म्हणजे काय

What Is Saur Kumpan Yojana

सौर कुंपण योजनेसाठीची कागदपत्रे

Saur Kumpan Yojana Documents

सौर कुंपण योजनेची अर्ज प्रक्रिया

Saur Kumpan Yojana Online Apply

अर्जाची स्थिती कशी तपासावी

Saur Kumpan Yojana 2024

सौर कुंपण योजना 2024 म्हणजे काय

What Is Saur Kumpan Yojana

Saur Kumpan Yojana या योजनेच्या माध्यमातून सरकारने मार्च अखेरपर्यंत 50 कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या निधीच्या माध्यमातून 1,173 गावातील 33,000 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतांना गुरे चारण्यापासून संरक्षित करण्यासाठी आणि नुकसान झालेल्या पिकाच्या संरक्षणाच्या उद्देशाने सौर कुंपण बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही योजना श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचाच एक भाग आहे.

solar fencing yojana maharashtra या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्याला सौर कुंपणाच्या 25 टक्के म्हणजे 5 हजार रुपये खर्च करावा लागेल तर 75  टक्के म्हणजे 15 हजार रुपये इतका खर्च वनविभागाच्या माध्यमातून करण्यात येईल. महाराष्ट्र सरकारच्या solar fencing yojana maharashtra सौर कुंपण योजनेच्या माध्यमातून मागील वर्षात नवेगाव, नागझिरा आणि ताडोबा अंधारी या वाग्र प्रकल्पांच्या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांना शेतीचे संरक्षण करण्यासाठी सोलर कुंपण सुविधा देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पीक संरक्षित राहते आणि वन्यजीवांकडून त्याचे रक्षण होते.

Saur Kumpan Yojana

सौर कुंपण योजनेसाठीची कागदपत्रे

Saur Kumpan Yojana Documents

  • शेतीचा सातबारा
  • आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • पॅन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • नमुना आठ अ

सौर कुंपण योजनेची अर्ज प्रक्रिया

Saur Kumpan Yojana Online Apply

  • महाराष्ट्र सरकारच्या सौर कुंपण योजनेचा solar fencing yojana maharashtra लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आपले सरकार या पोर्टलवर लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर विभागाचे नाव निवडावे लागेल.
  • त्यानंतर कृषी विभाग निवडा.
  • कृषी विभाग निवडल्यानंतर सौर कुंपण हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक सौर कुंपण योजनेचा अर्ज दिसेल तो अर्ज उघडा.
  • त्यानंतर अर्जावर विचारलेले माहिती जसे की स्वतःचे नाव, गावाचे नाव, तालुका, जिल्हा असे सर्व माहिती अचूक पद्धतीने भरा.
  • तसेच विचारलेली संपूर्ण कागदपत्रे अपलोड करा.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर शुल्क भरा असा पर्याय दिसेल त्यानंतर तुम्ही त्यावर क्लिक करून 23.60 रुपये असे शुल्क भरणा करा.
  • त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होऊन जाईल.

अर्जाची स्थिती कशी तपासावी

Saur Kumpan Yojana 2024

सौर कुंपण योजनेसाठी अर्ज केल्यानंतर तुम्ही अर्जाची स्थिती तपासण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन माहिती तपासू शकता किंवा संबंधित महसूल व वन विभाग महाराष्ट्र सरकारच्या साईटवरही याची माहिती तुम्हाला मिळेल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024

महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट 

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024 

जिव्हाळा योजना 2024 

 गाव तेथे गोदाम योजना 2024

आता मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024 

पोस्ट ऑफिस स्कीम इन मराठी

महावितरण गो ग्रीन योजना 2024

ताडपत्री अनुदान योजना 2024