Manodhairya Yojana 2024 In Marathi : पीडित महिलांना 10 लाखांपर्यंत अर्थसहाय्य

Manodhairya Yojana 2024 Information In Marathi : मनोधर्य योजना 2024 मराठी माहिती

Manodhairya Yojana 2024 : नमस्कार वाचकहो, आज आपण मनोधैर्य योजनेची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Manodhairya Yojana मनोधैर्य योजना ही केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या एकत्रित करण्याने सुरू करण्यात आलेली योजना आहे.  मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ऍसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना आर्थिक सहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी किमान 1 ते 10 लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

Manodhairya Yojana

Manodhairya Yojana 2024 In Marathi राज्यात बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार यामुळे मानसिक आघात होतो. महिलांना आणि बालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना खूप त्रास होतो त्यामुळे राज्यातील अशा महिलांना झालेल्या मानसिक आघाता मधून सावरणे हे खूप महत्त्वाचे असते. त्याचबरोबर त्यांना आर्थिक मदत, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत, निवारा त्याचबरोबर समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणेदेखील महत्वाचे असते. या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने महिला व बालविकास विभागा अंतर्गत राज्यात मनोधैर्य योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पीडित महिलांना आर्थिक मदत पुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Manodhairya Yojana 2024 आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण मनोधैर्य योजना म्हणजे काय?, मनधैर्य योजनेची काय आहेत वैशिष्ट्ये, फायदे?, मनोधैर्य योजनेसाठी अंतर्गत किती मिळेल लाभाची रक्कम?, या योजनेसाठी कसा करावा लागेल अर्ज? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ठळक मुद्दे

मनोधर्य योजना 2024 मराठी माहिती

Manodhairya Yojana 2024 Information In Marathi

मनोधैर्य योजनेची थोडक्यात माहिती

Manodhairya Yojana 2024 In Short

मनोधैर्य योजनेचे उद्दिष्ट

Manodhairya Yojana Purpose

मनोधैर्य योजनेची वैशिष्ट्ये

Manodhairya Yojana Features

मनोधैर्य योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत

Manodhairya Yojana 2024

मनोधैर्य योजनेचे फायदे

Manodhairya Yojana Benefits

मनोधैर्य योजनेची पात्रता

Manodhairya Yojana Eligibility

मनोधैर्य योजनेच्या अटी

Manodhairya Yojana Terms And Conditions

मनोधैर्य योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Manodhairya Yojana Online Apply

मनोधैर्य योजनेची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

Manodhairya Yojana Offline Apply

मनोधैर्य योजनेची थोडक्यात माहिती

Manodhairya Yojana 2024 In Short

योजनेचे नावमनोधैर्य योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
विभागमहिला व बाल विकास विभाग
कधी सुरू झाली21 ऑक्टोबर 2013
उद्देशपीडित महिलांना मानसिक अपघातातून सावरणे
लाभार्थीपीडित महिला व बालके
लाभदहा लाखांपर्यंत आर्थिक मदत
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://womenchild.maharashtra.gov.in/

मनोधैर्य योजनेचे उद्दिष्ट

Manodhairya Yojana Purpose

पीडित महिलांना व बालकांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

पीडित महिला व बालकांना प्रतिष्ठा व आत्मविश्वास पुन्हा मिळवून देणे या उद्देशाने मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली आहे.

महिला व बालकांना शारीरिक मानसिक आघातातून बाहेर काढणे.

महिला व बालकांना समुपदेशन निवारा, वैद्यकीय व कायदेशीर मदत इत्यादी आधार सेवा पुरवणे.

महिला व बालकांना व त्यांच्या वारसदारांना आर्थिक मदत आणि मानसोपचार तज्ञाची सेवा उपलब्ध करून देणे.

मनोधैर्य योजनेची वैशिष्ट्ये

Manodhairya Yojana Features

मनोधैर्य योजना योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अंतर्गत केली जाते.

या योजनेअंतर्गत 50 टक्के केंद्र सरकार व 50 टक्के राज्य सरकार ने तरतूद केली आहे.

मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यात आली आहे.

या योजनेमध्ये पीडित महिला व बालकांची ओळख गुप्त ठेवण्यात येते.

मनोधैर्य योजना पीडित महिला व बालकांना पुन्हा आत्मविश्वास मिळवण्यासाठी व त्यांना त्यांचे आयुष्य पुन्हा सामान्य पद्धतीने जगण्यात साठी सक्षम करते.

मनोधैर्य योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत

Manodhairya Yojana 2024

या योजनेअंतर्गत बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी किमान 2 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येते.

गंभीर व क्रूर स्वरूपाच्या बलात्काराच्या घटनेमध्ये पीडित महिला व बालक यांना यथास्थिती त्यांच्या वारसदारांना 3 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येते.

ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकांना अथवा त्यांना कायमचे अपंगत्व आल्यास 3 लाख रुपये आणि ऍसिड जखमा झालेल्या महिलांना व बालकांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

भूलथापा देऊन फसवून लग्नाचे व इतर अमिष दाखवून केलेले बलात्कार प्रथम खबरी अहवाल दाखल झाल्यानंतर 2 लाख रुपयांच्या 50% रक्कम धनादेश द्वारे दिली जाते आणि न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाल्यावर उर्वरित 50 टक्के आर्थिक मदत जिल्हा महामंडळामार्फत दिली जाते.

मनोधैर्य योजनेअंतर्गत दिलय जाणाऱ्या अर्थ सहाय्य व्यतिरिक्त बलात्कार, लैंगिक अत्याचार, ऍसिड हल्ल्यात पीडित महिला व बालक यांना वैद्यकीय उपचार, प्रवास व इतर खर्च साठी प्रत्येक प्रकरणात 50 हजार रुपयांच्या आर्थिक मदत करण्यात येते.

मनोधैर्य योजनेचे फायदे

Manodhairya Yojana Benefits

पीडितांना आर्थिक मदत : लैंगिक अत्याचार व ॲसिड हल्ल्यात पीडित मुलींना 50 हजार रुपये मदत.

बलात्कार आणि आयसीड हल्ल्यातील पीडित महिलांना 1 लाख रुपये मदत.

गंभीर प्रकारांमध्ये 10 लाखांपर्यंत आर्थिक मदत.

वैद्यकीय मदत : विनामूल्य वैद्यकीय तपासणी आणि उपचार.

मानसिक आरोग्य समुपदेशन आणि समर्थन.

कायदेशीर मदत : पोलीस तक्रार दाखल करण्यास मदत खटल्यात विनामूल्य कायदेशीर मदत.

पुनर्वसन सुविधा : निवारा सुविधा.

शिक्षण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण.

रोजगार निर्मिती स्वयंरोजगाराच्या संधी.

मनोधैर्य योजनेची पात्रता

Manodhairya Yojana Eligibility

अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असावी.

मनोधैर्य योजनेच्या अटी

Manodhairya Yojana Terms And Conditions

महाराष्ट्रातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

महाराष्ट्र बाहेरील पीडित महिला व बालकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत पीडित महिला व बालकास आर्थिक मदत देण्यात येईल त्यामुळे गृह विभागाच्या किंवा अन्य विभागाच्या योजनांमध्ये सदर पीडितांना आर्थिक मदत देण्यात येणार नाही.

अर्जदाराच्या आर्थिक मदतीच्या रकमेसाठी तिच्या स्वतःच्या नावे बँक खाते असणे आवश्यक आहे.

पीडित व्यक्ती अज्ञान असेल तर त्याच्याबाबत पालकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या नावाने बँक खाते उघडण्यात यावे.

Manodhairya Yojana

मनोधैर्य योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Manodhairya Yojana Online Apply

अर्जदार महिलेला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

तेथील होम पेजवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.

रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड मिळेल त्याच्या साह्याने तुम्हाला लॉगिन करावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला मनोधैर्य योजना यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल.

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.

त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुमची मनोधैर्य योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

मनोधैर्य योजनेची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

Manodhairya Yojana Offline Apply

अर्जदार पिडीतेला आपल्या क्षेत्रातील महिला व बालविकास विभागात जावे लागेल.

तेथील कर्मचाऱ्यांकडून योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतील.

सदर अर्ज विभागात जमा करावा लागेल.

त्यानंतर तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करून तुम्हाला या योजनेअंतर्गत च्या लाभाचे वितरण केले जाईल.

अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024

महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट 

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024 

जिव्हाळा योजना 2024 

 गाव तेथे गोदाम योजना 2024

आता मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना