POCRA 2.0 In Marathi 2024 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी 2.0 साठी मंजुरी

POCRA 2.0 In Marathi 2024 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी 2.0 साठी मंजुरी

POCRA 2.0 यापूर्वी आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा पहिला टप्पा हा या लेखाच्या माध्यमातून पाहिला आहे. आता Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2.0 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यास देखील मंजुरी देण्यात आली आहे. या अंतर्गत 21 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. पहिल्या प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांचा समावेश होता यामध्ये 5142 खेड्यांमध्ये Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2.0 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू करण्यात आली होती तर आता या योजनेअंतर्गत 21 जिल्हे असतील. आणि त्यामध्ये 6,959 गावांचा समावेश असेल

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

POCRA 2.0 मंत्रिमंडळाने नुकताच जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp 2024 या प्रकल्पात राज्यातील एकूण 21 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली त्याचबरोबर विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच खानदेशातील जळगाव व नाशिक अशा एकूण 21 जिल्ह्यांमध्ये अंदाजे 6000 कोटी रुपयांच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा दोन राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या टप्पा दोन मध्ये समाविष्ट करण्यासाठी गावासाठीचे निकष निर्धारित करून त्यानुसार गावांच्या निवडीबाबतची प्रक्रिया पूर्ण करून निवड केलेले एकूण 6959 गावांच्या यादीत मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे. Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp