Pradhanmantri Ujjwala Yojana 2024 प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024
देशभरातील गरीब महिलांसाठी केंद्र सरकार सतत नवनवीन योजना आणत असते. यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२४ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024 आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारद्वारे ग्रामीण क्षेत्रातील गरीब कुटुंब आणि एलपीजी कार्डधारक कुंटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. नुकत्याच रक्षाबंधनच्या पूर्वी केंद्र सरकारने देशातील महिलांच्या घरातील एलपीजी गॅस कनेक्शनची किंमत दोनशे रुपयांनी कमी केली आहे. या योजनेच्या घोषणेनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केली की, केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० Pradhanmantri Ujjwala Yojana 2.0 अंतर्गत देशातील महिलांना ७५ लाख नवीन मोफत एलपीजी कनेक्शन देणार आहे, हे सर्व कनेक्शन येणाऱ्या तीन वर्षात म्हणजेच २०२६ पर्यंत देण्यात येणार आहेत. यासाठी सरकारने सरकारी तेल कंपन्यांना तब्बल १६५० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे देशातील गरीब कुटुंबातील महिलांची आता धुरापासून सुटका होणार आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल त्याबरोबरच पर्यावरणाचाही समतोल राखण्यास मोठी मदत होणार आहे
आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून तुम्ही या योजेसाठी कसा अर्ज करू शकता?. याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. आणि अर्ज करण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतात. आणि या योजनेसाठी काय पात्रता आहे, याची संपूर्ण माहिती यात देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला अर्ज करणे सोपे जाईल आणि योजनाचा लाभ घेता येईल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना म्हणजे काय?
What is Pradhanmantri Ujjwala Yojana
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे ‘स्वच्छ इंधन चांगले जीवन’ या घोषवाक्यासोबत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना १ मे २०१६ रोजी सुरू करण्यात आली होती. Pradhanmantri Ujjwala Yojana या योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन बरोबरच सिलेंडरचे पहिले रिफिलिंग मोफत दिले जाते. याव्यतिरिक्त या योजनेअंतर्गत सरकार गॅस शेगडी ही फ्री मध्ये देत आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाअंतर्गत आत्तापर्यंत देशभरात नऊ कोटी साठ लाख कनेक्शन देण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत १ जानेवारी २०२४ पासून महिलांना गॅस सिलेंडर ४५० रुपयात मिळत आहे.
या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना एका वर्षात १२ गॅस सिलेंडरचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच बाराशे गॅस सिलेंडर तुम्हाला साडेचारशे रुपये प्रति सिलेंडर या किमतीत मिळणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना Pradhanmantri Ujjwala Yojana गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन स्वस्तात गॅस सिलेंडर उपलब्ध करून देत आहे. कारण यातून महिलांना स्वयंपाक करण्यासाठी एक स्वच्छ इंधन उपलब्ध होईल, यामुळे महिलांचे आरोग्य सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. ज्या गरीब कुटुंबाकडे यापूर्वी कुठलेही गॅस कनेक्शन नाही अशा कुटुंबातील गरीब महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनासाठी अर्ज करू शकतात. आणि त्यांना या योजनेचा लाभही घेता येतो.
ठळक मुद्दे :
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२४ बद्दल थोडक्यात माहिती
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश
प्रधानमंत्री उज्वला योजनेची वैशिष्ट्ये
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे फायदे
उज्ज्वला योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२५ पर्यंत स्वस्तात मिळणार एलपीजी सिलेंडर
पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रूपयाचे अनुदान
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी १६५० कोटीचा निधी मंजुर
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी पात्र कोण
प्रधानमंत्री योजनेसाठीची पात्रता
प्रधानमंत्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२४ साठी अर्ज कसा करावा
ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खाली देत आहोत.
FAQ’S
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२४ बद्दल थोडक्यात माहिती
Pradhanmantri Ujjwala Yojana in short
योजनेचे नाव | प्रधानमंत्री उज्ज्वला योजना |
कधी सुरू झाली | 1 मे 2016 |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
संबंधित मंत्रालय | पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय |
लाभ | मोफत गॅस कनेक्शन |
या योजनेचे लाभार्थी कोण | देशातील गरीब महिला |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://www.pmuy.gov.in/ |
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश
Purpose of Pradhanmantri Ujjwala Yojana
केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना Pradhanmantri Ujjwala Yojana सुरू करण्याचा उद्देश म्हणजे स्वयंपाक घरातील स्वयंपाक घर धुरमुक्त करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याबरोबरच स्वयंपाक करताना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देत महिलांचे आरोग्य सक्षम करणे, महिलांचे सशक्तिकरण करणे हाही या योजनेचा उद्देश आहे. कारण गरीब आणि मध्यम उत्पन्न गटातील महिलांना एलपीजी सिलेंडरचा लाभ देण्यात येत आहे. ही योजना केंद्र सरकारने यशस्वीपणे राबवलेली एक महत्त्वाची योजना आहे. पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यशस्वी ठरल्यानंतर केंद्र सरकारने आता दुसरा टप्पा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० PM Ujjwala Yojana 2.0 सुरू केली आहे. त्यामुळे देशातील गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येत आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेची वैशिष्ट्ये
Features of Pradhanmantri Ujjwala Yojana
प्रधानमंत्री उज्वला योजना Pradhanmantri Ujjwala Yojana ही केंद्र सरकार ची योजना आहे.
देशभरातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांच्या इंधन समस्या लक्षात घेऊन प्रधानमंत्री उज्वला योजना Pradhanmantri Ujjwala Yojana सुरू करण्यात आली आहे
प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत PM Ujjwala Yojana जे गॅस कनेक्शन देणार आहे ते कुटुंबातील महिलेच्या नावावर असेल
देशभरातील तब्बल नऊ कोटी कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत २०२३-२४ चा अर्थसंकल्पनात केले आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेमुळे Pradhanmantri Ujjwala Yojana ग्रामीण भागात असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे फायदे
Benefits of Pradhanmantri Ujjwala Yojana
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या नवीन नियमानुसार गॅस कनेक्शन सोबतच भरलेला सिलेंडर देखील लाभार्थ्याला मोफत मिळणार आहे.
या योजनेमुळे इंधनापासून महिलांची मुक्तता होईल.
या योजनेअंतर्गत देशातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे.
या योजनेमुळे महिलांना डोळ्याच्या आजारापासून आणि चुलीचा धुरापासून मुक्तता मिळणार आहे.
या योजनेचा लाभ देशातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना होणार आहे.
चुल पेटवण्यासाठी लाकडाची आवश्यकता असायची आणि त्यामुळे कित्येक झाडे कापली जायची या योजनेमुळे आता झाडेही कापले जाणार नाहीत.
उज्ज्वला योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२५ पर्यंत स्वस्तात मिळणार एलपीजी सिलेंडर
देशभरातील दहा कोटी पेक्षा अधिक गरीब कुटुंबातील महिलांसाठी केंद्र सरकारने सबसिडीवर गॅस सिलेंडर देणाऱ्या पीएम उज्ज्वला योजनेचा PM Ujjwala Yojana अवधी एक वर्षासाठी वाढवला आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनाच्या लाभार्थ्यांना आता ३१ मार्च २०२५ पर्यंत एलपीजी सिलेंडरवर मोठी सबसिडी मिळणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये ७ मार्चला हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजना आता ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. या PM Ujjwala Yojana योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व महिलांना पुढील एक वर्षापर्यंत १२ एलपीजी सिलेंडरच्या खरेदीवर तीनशे रुपयांची प्रति सिलेंडर सबसिडी मिळणार आहे, ही सबसिडी देत असताना सरकारवर या सबसिडीद्वारे १२००० कोटी रुपयाचा अतिरिक्त भार पडणार असल्याची ही माहिती यावेळी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने मे २०१६ मध्ये ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजीसारखे ‘स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन’ उपलब्ध करून देण्यासाठी ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ (PMUY) ही योजना सुरू केली होती. जळाऊ लाकूड, कोळसा आणि गोवऱ्यामुळे स्वयंपाकाच्या पारंपारिक इंधनाच्या वापरामुळे महिलांचे आरोग्यावर आणि पर्यावरणावरही याचा विपरीत परिणाम होता. त्यामुळे या महिलांची धुरापासून सुटका करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मे २०१६ ला उत्तरप्रदेशच्या बलिया येथे या योजनेची सुरूवात केली होती.
पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रूपयाचे अनुदान
१०.२७ कोटी उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना मिळणार अनुदान
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची ७ मार्च २०२४ रोजी एक बैठक पार पडली. यात आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या PMUY लाभार्थ्यांना दरवर्षी १२ रिफिलसाठी प्रति १४.२ किलो सिलिंडर मागे (आणि ५ किलोच्या सिलिंडरसाठी प्रमाणनुसार प्रमाणबद्ध केलेले) ३०० अनुदान सुरू ठेवण्याला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता १ मार्च २०२४ पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या १०.२७ कोटीहून अधिक झाली आहे.
या योजनेवर अनुदान दिल्याने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सरकारवर १२००० कोटीचा अतिरिक्त भार पडणार आहे. हे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना एलपीजी हे स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार ही योजना सुरू केलेली आहे.
भारत गरजेपैकी ६० टक्के एलपीजी आयात करतो. एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किमतीत सतत चढ-उतार होत असतात. मात्र याचा प्रभाव प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या PM Ujjwala Yojana लाभार्थ्यांवर होऊ नये म्हणून या ग्राहकांना एलपीजी अधिक परवडण्यासाठी सरकारने प्रतिवर्षी १२ रिफिलसाठी प्रति १४.२ किलो सिलिंडर मागे (आणि ५ किलोच्या सिलिंडरसाठी प्रमाणनुसार प्रमाणबद्ध केलेले) २०० रूपयांचे अनुदान मे २०२२ ला दिले होते. या अनुदानामुळे लाभार्थ्यांना एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये सरकारने प्रतिवर्षी १२ रिफिलसाठी प्रति १४.२ किलो सिलिंडर मागे (आणि ५ किलोच्या सिलिंडरसाठी प्रमाणनुसार प्रमाणबद्ध केलेले) २०० रूपयांचे अनुदार वाढवून ३०० रूपये केले आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी १६५० कोटीचा निधी मंजुर
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा PMUY पहिला टप्पा देशभरात यशस्वी ठरल्यानंतर आता पुन्हा केंद्र सरकारने दुसरा टप्पा सुरू केला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० PM Pradhanmantri Ujjwala Yojana 2.0 अंतर्गत सरकार देशातील ७५ लाख महिलांना नवीन मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठी तब्बल १६५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाचे PM Ujjwala Yojana लाभार्थ्यांची संख्या १० कोटी ३५ लाख होणार आहे. या योजनेवर होणारा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलत आहे. यापूर्वी महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्वस्तात एलपीजी सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे. सामान्य ग्राहकांसाठी सरकारने एलपीजी सिलेंडरच्या रकमेत दोनशे रुपयेची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत Pradhanmantri Ujjwala Yojana दोनशे रुपये व्यतिरिक्त २०० रुपये प्रति सिलेंडरचे हिशोबाने सूट मिळत आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गतील लाभार्थींना 450 रुपये स्वस्त एलपीजी सिलेंडर मिळणार आहे.
अटल पेंशन योजनेसाठी इथे क्लिक करा. https://yojanamazi.com/atal-pension-yojana-2024-in-marathi/
सुकन्या समृद्धी योजनेसाठी इथे क्लिक करा. https://yojanamazi.com/sukanya-samruddhi-yojana-2024-in-marathi/
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी पात्र कोण
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनासाठी कोण कोण पात्र आहेत आणि कोणाला उज्ज्वलायोजनाअंतर्गत गॅस सिलेंडर घेता येतो. याची माहिती पुढील प्रमाणे :-
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे लाभार्थी
- अति मागास वर्ग कुटुंबातील महिला (ओबीसी)
- अनुसूचित जाती कुटुंबातील महिला
- अनुसूचित जाती जमाती कुटुंबातील महिला
- अंतोदय अन्न योजना लाभार्थी महिला
- वनवासी समाजातील महिला
- चहा आणि पूर्वीच्या चहा बागायतदार जमातीतील महिला
- अशी कुटुंब जे १४ सूत्री घोषणा अंतर्गत गरीब परिवारात येतात
प्रधानमंत्री योजनेसाठीची पात्रता
Eligibility of Pradhanmantri Ujjwala Yojana
ज्या महिलचे वय १८ वर्ष पूर्ण आहे आणि त्या देशाच्या नागरिक आहे. अशी कुठलीही महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते.
अर्जदार महिला बीपीएल कार्ड कुटुंबातील असायला हवी.
अर्जदार महिलेच्या कुटुंबात यापूर्वीचे एलपीजी कनेक्शन घेतलेले नसावे.
प्रधानमंत्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Documents of Pradhanmantri Ujjwala Yojana
आधार कार्ड
बीपीएल राशन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
वयाचे प्रमाणपत्र
बँक पासबुक खाते
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर -आदी.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२४ साठी अर्ज कसा करावा
Pradhanmantri Ujjwala Yojana 2024 online application
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनासाठी तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. आधी आपण ऑनलाइन पद्धतीने कसा अर्ज करावा ही बघू.
जर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर पुढील पद्धत वापरा.
सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या PMUY अधिकृत वेबसाइट https://www.pmuy.gov.in/ वर जावे लागेल.
आता तुमच्या समोर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे होमपेज दिसेल. त्यात तुम्हाला apply for new ujjwala 2.0 connection या लिंक वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला तीन पर्याय दिसतील जसे की इंडियन गॅस, भारत गॅस आणि एचपी गॅस यापैकी तुम्हाला कोणत्याही एक पर्याय निवडावा निवडून त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा असे पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला उज्वला लाभार्थी कनेक्शन या पर्यावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्या जिल्ह्याची निवड करावी लागेल.
प्रधानमंत्री उज्वला योजना ई-केवायसी अर्ज पाहायला मिळेल यामध्ये योग्य त्या पर्यायावर करावी लागेल.
पुढे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमचा मोबाइल नंबर जो आधार कार्ड ला लिंक असेल तो आणि कॅप्चा टाकावा लागेल.
त्यानंतर सेंड ओटीपी या बटनवर क्लिक करावे लागेल.
तुमच्या मोबाइल एक ओटीपी येईल तो तिथे टाकावा लागेल.
त्या नंतर तुम्हाला त्या फॉर्म मध्ये तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड तपशील, बँक खात्याची माहिती इत्यादी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला 2 किलो वजनाचा किंवा 5 किलो वजनाचा जो एलपीजी गॅस सिलेंडर हवा आहे त्याची निवड करावी लागेल.
नंतर सबमीट बटन वर क्लिक करावे लागेल.
प्रधानमंत्री उज्वला योजनेमध्ये Pradhanmantri Ujjwala Yojana अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल तो नंबर तुमच्याजवळ जपून ठेवणे आवश्यक आहे.
आशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा Pradhanmantri Ujjwala Yojana ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकता.
ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खाली देत आहोत.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा Pradhanmantri Ujjwala Yojana ऑफलाइन अर्ज तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीवर जाऊन किंवा उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनही मिळू शकता.
यासाठी तुम्हाला उज्ज्वला योजनेच्या Pradhanmantri Ujjwala Yojana अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल, त्यानंतर तुमच्या समोर वेबसाईटचे होम पेज उघडेल, होम पेज वरून डाऊनलोड फॉर्म या अॅप्लिकेशन वर क्लिक करून तुम्ही हा अर्ज डाऊनलोड करू शकता.
त्यानंतर तुम्हाला अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे. त्याबरोबरच या अर्जासोबत तुम्हाला विचारण्यात आलेली आवश्यक कागदपत्राच्या झेरॉक्स कॉपी जोडाव्या लागतील. त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या गॅस एजन्सी वर जाऊन सर्व कागदपत्रांसोबत असलेला तुमचा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना Pradhanmantri Ujjwala Yojana गॅस कनेक्शनचा अर्ज जमा करू शकता.
या योजनेचे पडताळणी झाल्याच्या नंतर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन या योजनेअंतर्गत मिळेल.
FAQ’S
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाची सुरुवात कधी झाली?
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये केला आहे.
उज्ज्वला योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ देशातील गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत अर्ज कसा करावा?
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत ऑनलाइन तसेच ऑफलाईन प्रक्रियेद्वारे देखील तुम्ही अर्ज करू शकता. ऑफलाईनसाठी तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीवर जाऊनही अर्ज करता येतो. तर ऑनलाइन साठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.