Devendra Fadnavis, Uddhav Thackeray’s meeting : खरंच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली?
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray’s meeting : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाकडून आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणाही करण्यात आली आहे. राज्यात आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून जागावाटपाचे सत्रही सुरू झाले आहे. त्यातच आता राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, ते म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची बातमीची सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. मात्र आता संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अशी कुठल्याही प्रकारची भेट झाली नसल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची भेट झाली नसून अशी चुकीची बातमी काही जण पसरवत असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray’s meeting सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची बातमी मोठ्या प्रमाणात चर्चिली जात आहे. मात्र संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे, अशी कुठल्याही प्रकारची भेट या दोन नेत्यांमध्ये झाली नसल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray’s meeting भाजप उद्धव ठाकरे यांना घाबरला असून आमची लढाई महाराष्ट्र लुटणाऱ्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांच्या कडूनच अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. महाराष्ट्राला लुटणाऱ्या लोकांसोबत आमचं नाव जोडून ते आम्हाला भीती दाखवत आहेत, हा दावा खूप हास्यास्पद आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या बातमीला कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचेही संजय राऊत यांनी बोलताना सांगितले.
दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या बातमीमुळे विविध चर्चेला उधाण आले आहे. पण अशा प्रकारची कुठलीही भेट झाली नसल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray’s meeting सध्या महाराष्ट्राचे राजकारण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती फिरताना दिसत आहे. त्यामुळे आज राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्याची बातमी समोर आली. त्यामुळे सर्वत्र तर्क वितर्क लावले जात आहेत. खरंच ही भेट झाली का? की संजय राऊत सांगताहेत तसे ही बातमी पेरण्यात आली आहे, हे आपल्याला येणारा काळच सांगेल.
जागा वाटपाचा तिढा सुटेना?
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray’s meeting विधानसभेची निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार गटानेही आपल्या काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. असे असताना दुसरीकडे महाविकास आघाडी मधील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही. त्यांच्यात अजूनही काही जागा वाटपावरून मतभेद असल्याचे समोर येत आहे. मात्र काँग्रेसच्या हाय कमांडने यात लक्ष घालून हा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा तिढा लवकर सुटेल अशी आशा निर्माण झाली आहे. आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून जागावाटप कधी जाहीर होणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.