Ladki Bahin Yojana Scrutiny : नियमबाह्य भरण्यात आलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय
Ladki Bahin Yojana Scrutiny : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सुरू केलेली आहे. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील काही अर्जांची फेर छाननी होणार आहे. अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
Ladki Bahin Yojana Scrutiny : ज्या लाभार्थी महिलांचे उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे तसेच ज्या महिलेकडे कार आहे, नोकरी आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्याची शक्यता आहे. याचा फटका राज्यातील अनेक महिलांना बसू शकतो. त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे टेन्शन या बातमीने वाढवले आहे.
Ladki Bahin Yojana Scrutiny : राज्यातील कोणत्याही लाभार्थी महिले संदर्भात तक्रार मिळाल्यास तिच्या अर्जाची छाननी केली जाईल. त्यानुसार नियमबाह्य भरण्यात आलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ही तटकरे यांनी दिली. गुरुवारी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
Ladki Bahin Yojana : या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र सरसकट लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी होणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
काय आहेत तक्रारी
Ladki Bahin Yojana Scrutiny : राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत राज्यभरातून पाच प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे मिळाल्या आहेत.
Ladki Bahin Yojana New Update 2025 विविध पद्धतीने आम्ही याचा विचार करत आहोत, आम्हाला मिळालेल्या काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आपण पात्र नसण्याची माहिती दिल्याचे ही आदिती तटकरे यांनी सांगितले.
Ladki Bahin Yojana : तसेच प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अर्जांची पडताळणी होणार आहे. मात्र मूळ जीआर मध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
या अर्जाची होणार पडताळणी
अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.
चार चाकी वाहने असलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे.
Ladki Bahin Yojana New Update 2025
एकाच महिलेने दोन अर्ज दाखल केले असल्यास अशा अर्जांची तपासणी होणार आहे.
लग्न झाल्यानंतर महाराष्ट्रातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या महिलांच्या अर्जाचीही तपासणी करण्यात येणार आहे.
आधार कार्ड आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रावरील नावांमध्ये तफावत जाणवल्यास अशा अर्जांची ही तपासणी केली जाणार आहे.
यांची अर्ज होणार अपात्र?
Ladki Bahin Yojana Scrutiny : अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न असतानाही मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा लाभ घेतलेला असल्यास अशा महिलेचा अर्ज अपात्र होणार आहे.
चार चाकी वाहन असलेल्या महिलांचाही अर्ज अपात्र होणार आहे.
विवाह नंतर महाराष्ट्रातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या महिलेचा अर्ज ही अपात्र ठरविण्यात येणार आहे.
Ladki Bahin Yojana Scrutiny : अशा प्रकारच्या अर्जांची छाननी होऊन त्या महिलांचे अर्ज अपात्र ठरवले जातील. मात्र त्यांच्याकडून आतापर्यंत दिलेल्या हप्त्याची पैसे परत घेतले जाणार नसल्याची माहितीही आदिती तटकरे यांनी दिली आहे. Ladki Bahin Yojana New Update 2025
Ladki Bahin Yojana Scrutiny : महाराष्ट्र सरकारने जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सुरू केली. या योजनेसाठी राज्यातून दोन कोटी 63 लाख अर्ज दाखल झाले, त्यापैकी दोन कोटी 47 लाख अर्ज पात्र ठरले होते.
Ladki Bahin Yojana Scrutiny : बारा लाख 87 हजार बहिणींचे बँक खाते आधार कार्डशी जोडले गेले नव्हते, त्यांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही. दोन कोटी 34 लाख महिलांना ऑक्टोंबर महिन्यात नोव्हेंबर पर्यंत प्रत्येकी दीड हजार रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात आले. Ladki Bahin Yojana New Update 2025
Ladki Bahin Yojana Scrutiny : तसेच महाराष्ट्र सरकारने डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना देण्यासाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली. त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ताही महिलांच्या खात्यात जमा झाला.
Ladki Bahin Yojana Scrutiny : आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या राज्यातील बारा लाख 87 हजार लाडक्या बहिणींना ६ महिन्याचे एकूण 9000 रुपये त्यांच्या थेट बँकेच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात आले.
Ladki Bahin Yojana Scrutiny : मात्र आता अर्जाची छाननी होणार असल्याच्या बातमीने सर्वच महिलांचे टेन्शन वाढले आहे. यामधून आता कोण पात्र ठरतात आणि कोण अपात्र? हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. कारण या योजनेने महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुक निकालाची सर्व गणिते बदलून टाकली आहेत.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै महिन्यापासून ते डिसेंबर महिना पर्यंत महिलांना 11500 रुपये याप्रमाणे हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहे, आणि आता मकर संक्रांतीच्या आधी जानेवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
Ladki Bahin Yojana : तर मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळू शकतात. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना 2100 रुपये प्रमाणे त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
Ladki Bahin Yojana Scrutiny : लाडकी बहीण योजनेत नव्याने 12 लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु यासाठी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही.