Ayushman Yojana 2025 In Marathi : जाणून घ्या आयुष्मान योजनेची संपूर्ण माहिती
Ayushman Yojana 2025 In Marathi : दिल्लीमध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर अनेक योजनांचे काम मार्गी लागले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये स्वास्थ संबंधित महत्वपूर्ण योजना चालू आहे. यामध्येच एक प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आहे. परंतु ही योजना दिल्लीमध्ये लागू नव्हती. परंतु आता दिल्लीमध्ये बीजेपी ची सरकार आलेली आहे.
Ayushman Arogya Yojana : CM रेखा गुप्ता यांनी कॅबिनेट च्या पहिल्या बैठकीमध्ये आयुष्मान योजना सुरू करण्यात साठी मंजुरी दिली. दिल्ली मधील नागरिकांना आयुष्मान योजने अंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंत मोफत विलाज करता येणार आहे. त्यामधील 5 लाख रुपये दिल्ली सरकार देईल.
Ayushman Yojana 2025 जर तुम्ही दिल्लीतील रहिवासी असाल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता आणि काही आवश्यक कागदपत्रांची गरज आहे ती कोणती हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याचबरोबर या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागेल याची देखील माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहू.
आयुष्मान योजनेचे फायदे
Ayushman Yojana 2025 Benefits
Ayushman Arogya Yojana या योजनेमुळे 10 लाख रुपये पर्यंत मोफत विलाज तुम्हाला करता येईल.
यामध्ये ऑपरेशन सर्जरी चा खर्च देखील दिला जाईल.
औषधांसोबतच सर्व सुविधा दिल्या जातील.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Ayushman Yojana Documents
आधार कार्ड
रेशन कार्ड
मोबाईल नंबर
रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
आयुष्मान भारत योजनेची अर्ज प्रक्रिया
Ayushman Yojana 2025 Apply
आयुष्मान भारत योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील सीएससी केंद्रावर जावे लागेल
तिथे आयुष्यमान भारत योजनेचा तुम्ही अर्ज करू शकता
तिथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड, रेशन कार्ड आणि आवश्यक कागदपत्रे द्यावे लागतील
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमचा आयुष्मान कार्ड बनवले जाईल
त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने देखील या योजनेचा अर्ज करू शकता.