Maharashtra Assembly CM Devendra Fadnavis Speech 2025 In Marathi : काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
Maharashtra Assembly CM Devendra Fadnavis Speech : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या धर्तीवर लवकरच राज्यात योजना तयार केली जात आहे. आज आपण जी वीज वापरतो ती अपारंपारिक स्तोत्रातून आणायची आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2030 पर्यंत 52 टक्के ऊर्जा अपारंपारिक क्षेत्रातून करणार असे देखील म्हणाले. दीड कोटी ग्राहक वीज बिल मुक्त होतील असं त्यांनी नमूद केलं. बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केली त्यातून 45 लाख कृषी धारकांना मोफत वीज देत आहोत. वर्षाला 14 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे.
CM Devendra Fadnavis Speech अर्थमंत्र्यांनी या योजनेत कोणतीही कपात सुचवली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत मिळत आहे. मुख्यमंत्री कृषी वाहिनी हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात कृषीचे फिडर वेगवेगळे केले आहे. कृषी ला एकूण 16 हजार मेगावॅट वीज द्यावी लागते त्याची कॉस्ट 8 रुपये प्रति युनिट आहे पण आपण शेतकऱ्यांकडून 1 रुपया किंवा सव्वा रुपये युनिट घेत होतो. 6 रुपये सबसिडी द्यायचं आता डिस्ट्रीब्यूटर पद्धतीने फिडरच सोलरायझेशन करण्यात येत आहे. त्यामुळे 16000 मेगावातच काम सुरू झालं आहे. CM Devendra Fadnavis Speech
2000 मेगावॅटच काम झालं असून 2026 पर्यंत ही योजना मार्गी लागेल. त्यामुळे जी वीज आतापर्यंत 7 रुपयाला मिळायची ती आता 3 रुपयाला मिळेल यामुळे युनिट मागे 5 रुपये आपण वाचवणार आहोत. म्हणून विजेची खरेदी किंमत देखील यामुळे कमी होणार आहे. शेतकऱ्यांना 365 दिवस वीज मिळणार. वीज खरेदी खर्चात 10 हजार कोटींची बचत होणार आहे. कार्बन उत्सर्जनात 25% ची कपात होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.