gulkand marathi movie 2025 : 1 मे रोजी पाहायला मिळणार प्रेमाचा “गुलकंद”

gulkand marathi movie 2025 : ढवळे आणि माने कुटुंब घेऊन येणार मुरलेल्या प्रेमाचा “गुलकंद”

gulkand marathi movie Trailer : ज्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती त्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तो चित्रपट म्हणजे “गुलकंद”. मागील काही दिवसापासून प्रेक्षक “गुलकंद” या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. तो ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आहेत.

gulkand marathi movie Trailer चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ढवळे फॅमिली म्हणजेच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांनी स्कूटरवर धमाकेदार एन्ट्री घेतली, तर माने फॅमिली म्हणजेच ईशा डे आणि प्रसाद ओक यांनी बुलेटवर एन्ट्री घेतली आहे. पुष्पवृष्टीने कलाकारांचे स्वागत करण्यात आले आणि “चल जाऊ डेटवर” या गाण्यावर कलाकारांनी रंगतदार माहोल निर्माण केला.

marathi entertainment news नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरमध्ये सई आणि प्रसाद यांच्या एका खास सीन मुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली होती. आता ट्रेलर मधून “प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं” या प्रसादच्या संवादाने उत्सुकता आणखी वाढली आहे.

ढवळे आणि माने कुटुंब 1 मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहेत. ही दोन कुटुंबे यांच्यात काय नातं निर्माण होईल? हे पाहण्यासाठी प्रेक्षक सज्ज झाले आहे.

“गुलकंद” हा चित्रपट कौटुंबिक विनोदी चित्रपट असून नात्यांमधील गुंतागुंत, भावना, हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेल या ट्रेलर मध्ये आपल्याला दिसून येतो.

gulkand चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, इशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्वील आगटे यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

gulkand या चित्रपटाची निर्मिती सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात “नातं जेव्हा एकसूरी होतं तेव्हा त्यातला गोडवा टिकवणे महत्त्वाच असतं”, आणि हाच गोडवा “गुलकंद” चित्रपटात आहे.