Mahila Sanman Yojana Maharashtra 2024 : महिला सन्मान योजना महाराष्ट्र मराठी माहिती
Mahila Sanman Yojana Maharashtra 2024 : राज्यात 2022 मध्ये शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले, तेव्हा त्यांनी भरपूर निर्णय घेतले. अनेक नवनवीन योजना सुरू केल्या. त्यामध्ये दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. 2022 मध्ये भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृत महोत्सवानिमित्त हे दोन निर्णय घेण्यात आले ते म्हणजे 75 वर्षा वरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि महिला सन्मान निधी योजना अंतर्गत महिलांना 50 टक्के तिकीट दरात सवलत. 17 मार्च 2023 रोजी हा निर्णय संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला. या योजनेला 16 मार्च 2024 रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. एका वर्षात एसटीला किती उत्पन्न मिळाले? तसेच किती महिलांनी एसटीने प्रवास केला? याबद्दल चा आढावा घेतला आहे. दरम्यान 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये महिला सन्मान योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये महिलांना बसच्या तिकीटामध्ये 50 टक्के सवलत देण्याची घोषणा झाली. त्यानंतर ही योजना 17 मार्च 2023 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. सध्या दररोज 55 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात, त्यामध्ये 18 ते 20 लाख महिलांचा समावेश आहे. ही योजना लागू होण्यापूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या 8 ते 10 लाख होती ती संख्या आज 18 ते 20 लाखापर्यंत पोहोचली आहे. एसटीच्या प्रवासात वाढ झाली आहे. तसेच महिला सन्मान योजना Mahila Sanman Yojana Maharashtra अंतर्गत शासनाने प्रतिपूर्ति रकमेपोटी एसटीला तब्बल 1,605 कोटी रुपये रक्कम अदा केली आहे. 17 मार्च 2023 ते 16 मार्च 2024 म्हणजेच एक वर्षभराच्या कालावधीमध्ये 55 कोटी 99 लाख 57 हजार 161 एवढ्या महिलांनी एसटीने प्रवास केलेला आहे. तसेच या योजनेअंतर्गत बसेसला 1,605 कोटी रुपयांच्या भर पडली आहे. या योजनेमुळे महिलांना त्यांच्या तिकीटतात 50% ची सवलत मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी आता कितीही लांबचा प्रवास केला किंवा कितीही जवळचा प्रवास केला तरी फक्त पूर्ण तिकीटा पैकी अर्धे पैसे द्यावे लागणार आहेत. यामुळे प्रोत्साहित होऊन अधिकाधिक महिला या योजनेचा लाभ घेत असताना दिसत आहेत. या योजनेमुळे महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनल्या आहेत. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिला, छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या महिला, शेतमजूर महिला, भाजी विक्री करणाऱ्या महिला या सर्व महिला या योजनेचा विशेष लाभ घेताना दिसत आहेत. तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ होत आहे.
Mahila Sanman Yojana Maharashtra सरकार महिलांसाठी नवनवीन योजना राबवत आहे. आज आपण महिलांसाठीची एक योजना पाहणार आहोत ती म्हणजे महिला सन्मान योजना. विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 2023 चा अर्थसंकल्प मांडला होता. त्यावेळी राज्य सरकारने महिलांसाठी या योजनेची घोषणा केली. आता महिलांना एसटीने प्रवास करणे अत्यंत आनंददायी झाले आहे, कारण की महिलांना आता एसटी प्रवासामध्ये 50 टक्के सूट मिळणार आहे. अर्थसंकल्पीयच्या भाषणात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा केली. शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यापासून सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. राज्य सरकारने महिलांना विशेष प्राधान्य देऊन काही घोषणा केल्या आहेत. महिला सुरक्षा सुविधा जनक प्रवासासाठी महिलांना महिला केंद्रित पर्यटन धोरण राबविण्यात येणार असून आता महिलांना बस सेवा देखील खूप सुख सोयी झालेली आहे. या महामंडळाच्या बस सेवेतील तिकीट दर दरात आता महिलांसाठी 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केली. या योजनेची सुरुवात 17 मार्च 2023 पासून सुरू झालेली आहे. आता सर्व महिलांना राज्यात कुठेही राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस भाड्यांमध्ये पन्नास टक्के सवलत करण्यात आली आहे.
आजच्या लेखात आपण Mahila Sanman Yojana Maharashtra 2024 महिला सन्मान योजना महाराष्ट्र उद्दिष्ट काय आहेत? या योजनेचे वैशिष्ट्ये काय आहेत? या योजनेचा लाभ कसा घेता येईल? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता असेल? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आमचा हा आजचा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
ठळक मुद्दे :
महिला सन्मान योजना थोडक्यात माहिती
Mahila Sanman Yojana In Short
महिला सन्मान योजनेचा उद्देश
Mahila Sanman Yojana Purpose
महिला सन्मान योजनेची वैशिष्ट्ये
Mahila Sanman Yojana Maharashtra Features
महिलांना सवलत देणाऱ्या गाड्यांची यादी खालील प्रमाणे
महिला सन्मान योजनेचे लाभार्थी
Mahila Sanman Yojana Maharashtra Beneficiary
महिला सन्मान योजनेची पात्रता
Mahila Sanman Yojana Eligibility
महाराष्ट्र सन्मान योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
Mahila Sanman Yojana Maharashtra Documents
Mahila Sanman Yojana Maharashtra Apply
FAQ’s
महिला सन्मान योजना थोडक्यात माहिती
Mahila Sanman Yojana In Short
योजनेचे नाव | महिला सन्मान महाराष्ट्र योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
कधी सुरू झाली | 17 मार्च 2023 |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ |
लाभ | एसटी तिकीट यांच्या दरात महिलांना 50 टक्के सवलत |
लाभार्थी | राज्यातील सर्व महिला |
उद्देश | महिलांचा आर्थिक विकास करणे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | अर्ज करण्याची आवश्यकता नाही |
महिला सन्मान योजनेचा उद्देश
Mahila Sanman Yojana Purpose
- राज्यातील सर्व महिलांना एसटी प्रवास करण्यासाठी आकर्षित करणे तसेच त्यांना प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
- राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवणे.
- राज्यातील महिलांना सशक्त बनवून महिलांचे जीवनमान सुधारणे.
- राज्यातील महिलांना समाजात स्थान मिळवून देणे.
महिला सन्मान योजनेची वैशिष्ट्ये
Mahila Sanman Yojana Maharashtra Features
- महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे महिला सन्मान योजना महाराष्ट्र या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- Mahila Sanman Yojana या योजनेमध्ये सर्व प्रकारच्या बस तिकीट दरामध्ये 50 टक्के सवलत लाग लागू करण्यात आली.
- राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवणे, त्यांचे जीवनमान घडवणे त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.
- महिला सन्मान योजना महाराष्ट्र या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
- त्यामुळे या योजनेचा लाभ अगदी सहजरीत्या महिलांना घेता येतो.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जाती धर्मातील पात्रता नाही राज्यातील प्रत्येक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलाही प्रवर्गाची अट ठेवलेली नाही.
महिलांना सवलत देणाऱ्या गाड्यांची यादी खालील प्रमाणे
Mahila Sanman Yojana Maharashtra 2024 राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस त्यामध्ये साधी बस, रातराणी, मिनी बस, नीमआराम बस, विनावातानुकुलीत शयन-आसनी, शिवशाही बस, शिवनेरी, शिवाई (साधी आणि वातानूकुलित), अश्वमेध या गाड्यांना पण मध्ये 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे.
सर्व प्रकारच्या बसेस मध्ये 50% सवलत सर्व महिलांसाठी करण्यात आली आहे. त्याचे निर्देश प्राप्त झालेल्या असून ते पुढील प्रमाणे आहे
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस मध्ये 50% सवलत ही १७ मार्च 2023 पासून सर्व महिलांसाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये साधी बस मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकुलीत) इतर बसेस आहेत.
ही सवलत भविष्यात राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन जेवढ्या बस येतील तेवढ्या बससाठी हे लागू राहील.
ही योजना महिला सन्मान योजना या नावाने ओळखली जाईल.
ही सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत राहील
ही सवलत शहरी वाहतुकीस दिली जाणार नाही
ज्या महिलांनी राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासाचे ॲडव्हान्स बुकिंग घेतलेले आहे अशा महिलांना 50 टक्के सवलती देण्यात येणार नाही
Mahila Sanman Yojana Maharashtra या योजनेचा लाभ सर्व महिलांना होणाऱ्या 50% सवलती मध्ये होणार असला तरीही या योजनेतून जे प्रवासी ऑनलाइन बुकिंग करतील म्हणजेच जसे की संगणकीय आरक्षण सुविधा द्वारे किंवा विंडो बुकिंग द्वारे, ऑनलाईन पद्धतीने, मोबाईल ॲप द्वारे, संगणकी आरक्षणाद्वारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडून आरक्षण कर वसूल केला जाईल
सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने 50% सवलत दिली असल्याने 50% प्रवासाचे भाडे द्यावे लागतील
ज्या महिलांचे वय 75 वर्षाच्या वर आहेत म्हणजेच जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना या सूचनेप्रमाणे 100 टक्के सवलत दिली जाईल
महिला सन्मान योजना ही सवलत 65 ते 75 या वर्ष वयोगटातील महिलांना दिली जाईल
मुलींना पूर्वीप्रमाणेच सवलत राहील जशी की 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलींना 50 टक्के सवलत
महिला सन्मान योजनेचे लाभार्थी
Mahila Sanman Yojana Maharashtra Beneficiary
- राज्यातील सर्व महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
- महिला सन्मान योजनेचा Mahila Sanman Yojana लाभ महिला सन्मान योजनेचा लाभा सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बस तिकीट घरामध्ये 50% सवलत दिली जाणार आहे.
- या योजनेमुळे राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारेल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील महिला आत्मनिर्भर बनतील.
- या राज्यातील महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- या योजनेमुळे एसटीने प्रवास करण्यासाठी महिला प्रोत्साहित होतील.
- या योजनेचा लाभ घेऊन महिला राज्यभर 50% सवलतीने प्रवास करू शकतील.
महिला सन्मान योजनेची पात्रता
Mahila Sanman Yojana Eligibility
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी
- महाराष्ट्र सन्मान योजनेचा फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल
- या योजनेअंतर्गत एसटीने प्रवासासाठी 10 टक्के सवलत दिली जाणार नाही
- महिलांना तिकिटाचे 50 टक्के रक्कम ही सवलत असेल तर 50 टक्के रक्कम ही भरणे आवश्यक राहील
- ज्येष्ठ नागरिक महिलांमध्ये म्हणजेच ज्यांचे वय 75 वर्षाच्या वर आहे त्यांना शंभर टक्के सवलत देण्यात येईल
- राज्यात कुठेही महिला या योजनेअंतर्गत प्रवास करू शकतील
- शहरी वाहतुकीस ही सवलत दिली जाणार नाही
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील प्रवासासाठी ही योजना लागू होणार नाही
महाराष्ट्र सन्मान योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
Mahila Sanman Yojana Maharashtra Documents
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना कुठलाही कागदपत्रांची आवश्यकता नाही
परंतु जे 75 वर्षांच्या वरील महिला आहेत त्यांनी त्यांचे आधार कार्ड किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड त्यांच्यासोबत ठेवणे आवश्यक आहे.
Mahila Sanman Yojana Maharashtra Apply
Mahila Sanman Yojana महिला सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलीही अर्ज प्रक्रिया नाही. या योजनेचा लाभ सर्व महिलांना घेता येतो.
FAQ’s
प्रश्न: महिला सन्मान योजना म्हणजे काय?
उत्तर: महाराष्ट्रातील महिलांना राज्य परिवहन मंडळाच्या सर्व बस मध्ये 50% सवलतीवर कुठेही प्रवास करता येणार.
प्रश्न: महिला सन्मान योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
उत्तर: महिला सन्मान योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व महिलांना घेता येतो. यासाठी वयाची अट नाही.
प्रश्न: महिला सन्मान योजनेअंतर्गत कुठल्या बस मध्ये करता येणार प्रवास?
उत्तर: राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बस मध्ये महिलांना 50% तिकिटावर सवलत दिली जाते. यामध्ये शिवनेरी, शिवशाही, शिवाई, आदि बसमध्ये महिलांना हाफ तिकीटाची सवलत दिली जाते.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA