Post Office Schemes 2025 In Marathi : पोस्ट ऑफिसच्या या योजनातून मिळते बँके पेक्षा अधिक व्याज
Post Office Schemes In Marathi : केंद्र सरकार प्रमाणेच पोस्ट ऑफिस कार्यालयाने ही देशातील नागरिकांसाठी विविध गुंतवणुकीच्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्यामध्ये काही योजना केवळ महिलांसाठी राबवल्या जातात.
या योजना अंतर्गत महिलांना बँकेतील मुदत ठेवी पेक्षा अधिक व्याजदर दिला जातो.
Post Office Schemes In Marathi चला तर मग अशा कुठल्या योजना आहेत की ज्याद्वारे महिलांना बँकेपेक्षा अधिक व्याजदर मिळाला जातो हे आपण पाहूया.
Post Office Schemes 2025 जर तुम्ही ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस ने सुरु केलेल्या या योजना फायदेशीर ठरू शकतात.
पोस्ट ऑफिस कार्यालयाकडून अनेक गुंतवणुकीच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेक महिलांच्या कल्याणासाठी योजना सुरू करण्यात आले आहेत.
Post Office Schemes पोस्ट ऑफिस बचत योजना ही महिलांना गुंतवणुकीसाठी एक उत्तम आणि विश्वासू पर्याय ठरत आहे. या योजनेअंतर्गत सामाजिक सुरेक्षेसह बँकेच्या तुलनेत अधिक परतावा दिला जातो. आपण आज पोस्ट ऑफिसच्या 5 महत्त्वाच्या बचत योजना बद्दल माहिती जाणून घेऊया. ज्याचा महिलांना, मुलींना अधिक फायदा होऊ शकेल.
सुकन्या समृद्धी बचत योजना
Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana सुकन्या समृद्धी बचत योजना मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असताना तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेवर वार्षिक 8.2% व्याजदर दिला जातो.
Post Office Schemes या योजनेअंतर्गत तुम्ही खाते उघडल्यावर पुढील 15 वर्षे ही योजना सुरू राहते. त्या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यातील गुंतवणुकीवर कलम 80c अंतर्गत कर सवलत दिली जाते. यामुळे तुम्हाला अधिक फायदा होतो.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
Post Office Monthly Income Scheme
Post Office Monthly Income Scheme पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना अंतर्गत ज्या महिलांना दरमहा नियमित उत्पन्न हवे आहे त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
या योजनेअंतर्गत 7.4% वार्षिक व्याजदर दिला जातो. निवृत्त महिला आणि ज्या महिलांना नियमित मासिक उत्पन्नाची गरज आहे अशा महिला त्यांच्यासाठी ही एक योजना चांगला पर्याय ठरू शकते.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
mahila sanman bachat yojana
ही योजना गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. या योजनेत जोखीम नाही. विशेष बाब म्हणजे या योजनेमध्ये सर्व वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात.
या योजनेच्या खात्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करू शकता. तुम्हाला यावर 7.5% एवढे व्याजदर दिले जाईल.
1 वर्षानंतर तुम्ही तुमच्या जमा केलेल्या रकमेतील 40% पर्यंत पैसे काढू शकता. ज्यामुळे तुम्हाला गरजेच्या वेळी पैशाची उपलब्धता सहज होऊ शकेल आणि तुमची गुंतवणूक ही होत राहील.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. या योजनेअंतर्गत तुम्ही 100 रुपये पासून गुंतवणूक करू शकता. या योजनेची मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षाचा आहे यावर 7.60% चक्रवाढ वार्षिक व्याज दर दिला जातो. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्या महिलांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे.
पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना
पोस्ट ऑफिस ची ही योजना गुंतवणुकीसाठी खूप महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत किमान 500 रुपये गुंतवणूक करावी लागते. त्यावर वार्षिक 7.1% व्याजदर दिला जातो. ही योजना 15 वर्षाची असली तरी त्यात तुम्हाला कर सवलतीचा 80c अंतर्गत फायदा मिळतो.
पोस्ट ऑफिसच्या या 5 योजना चा लाभ घेऊन महिलांना चांगली गुंतवणूक करता येऊ शकते. या गुंतवणुकीतून त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत होईल आणि त्या आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनु शकतील.
तर वाट कसली बघताय लवकरच आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन आपल्या गरजेनुसार आणि आपल्याला परवडेल अशा प्रकारच्या योजनेची निवड करून तुम्ही तात्काळ गुंतवणुकीला सुरुवात करू शकता आणि आपले भविष्य सुरक्षित करू शकता आणि स्वावलंबी होऊ शकतात.