HSRP Number Plate Deadline May Extended : HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढणार ?

HSRP Number Plate Deadline May Extended : काय असेल सरकारचा निर्णय

HSRP Number Plate Deadline May Extended : केंद्र सरकारने HSRP नंबर प्लेट गाडीला बसवणे बंधनकारक केले आहे. याची मुदत 30 जून देण्यात आली आहे. मात्र अनेक नागरिकांच्या गाडींना अजून या प्रकारची नंबर प्लेट बसवण्याची काम बाकी आहे. त्यामुळे कदाचित या तारखे मध्ये वाढ होऊ शकते. सध्या 30 जून पर्यंत तुम्ही HSRP Number Plate साठी ऑनलाईन अर्ज करून नंबर प्लेट बुक करू शकता.

एचएसआरपी नंबर प्लेट गाडीला बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना आता HSRP नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे. 2019 नंतर आलेल्या सर्व गाड्यांना हे नंबर प्लेट बसविण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना ही नंबर प्लेट बसवण्याची आवश्यकता नाही. आता याच High Security Registration Number Plate बसवण्यासाठी मुदतवाढ केली जाऊ शकते कारण अनेक जणांचे नंबर प्लेट बसवण्याचे काम अजून बाकी आहे.

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनेक लोकांनी आपल्या गाडींना बसवली आहे. मुंबईमध्ये 10 लाख वाहनधारकांनी ही नंबर प्लेट आपल्या गाडीने बसवले आहेत. अनेक जणांचे काम चालू आहे. तर अनेक वाहनधारकांचे नंबर प्लेट बसवणे बाकी आहे.

त्यामुळे कदाचित याच्या मुदत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र एचएसआरपी नंबर प्लेट बसण्यासाठी अनेक तक्रारी आल्या आहेत. डायरेक्ट पेमेंट संदर्भात काही तक्रारी आहेत. संपूर्ण पेमेंट तुम्हाला बुकिंग करतानाच करायचे आहे.

परिवहन विभागाने एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख 30 जून निश्चित केलेली आहे. परंतु तोपर्यंत कदाचित सर्व वाहनांना नंबर प्लेट बसवले जाणार नाही त्यामुळे ही मुदतवाढ केली जाऊ शकते.

अजूनही तुम्ही जर आपल्या गाडींना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेली नसेल तर तात्काळ त्यासाठी अर्ज करून आपल्या गाडीला नंबर प्लेट बसून घ्या. कारण त्यानंतर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होणार नाही.

मुंबईतील नागरिकांना एचएसआरपी नंबर प्लेट बसण्यासाठी 3 एजन्सी काम करत आहेत. वेगवेगळ्या बघात त्या एजन्सी आहेत. तेथे जाऊन तुम्ही HSRP Number Plate बसू शकता. जर तुम्हाला कोणती तक्रार करायची असेल तर तुम्ही hsrpcomplaint.tco@gmail.com वर तक्रार करू शकता.

दोन कोटी वाहने

जवळपास 2 कोटी वाहने ही 2019 पूर्वीचे आहेत. यापैकी फक्त काहीच जणांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवली आहे असं आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कदाचित मुदत वाढ दिली जाऊ शकते.

त्याचा फायदा नागरिकांना होऊ शकतो. जेणेकरून ज्यांनी आतापर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवली नाही ते अर्ज करून आपली नंबर प्लेट बसू शकतील आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार नाही.