16 Billion Passwords Leaked 2025 : एप्पल, गुगल, फेसबुक, टेलीग्रामचे 1600 कोटी पासवर्ड लीक

16 Billion Passwords Leaked Apple, Facebook, Google, Telegram : आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला, सामान्य नागरिकासह सरकारी आणि मोठ्या कंपनीचे पोर्टल निशाण्यावर?

16 Billion Passwords Leaked जगभरामधील एप्पल, google, फेसबुक आणि टेलिग्रामचे जवळपास 1600 कोटी युजरचे पासवर्ड ऑनलाइन लीग झाले आहेत. सायबर सुरक्षा तज्ञांनी याला आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लिक झाल्याचे म्हटले असून सायबर गुन्हे वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

1600 crore password breach apple facebook telegram google issues warning 2025 या पासवर्डच्या मदतीने सायबर गुन्हेगार युजरची खाजगी माहिती, फोटो, व्हिडिओ आणि अन्य माहिती चोरू शकतात.

16 Billion Passwords Leaked फोबर्स आणि सायबर न्यूजच्या अहवालानुसार, या डेटा मध्ये सामान्य नागरिकासह सरकारी आणि मोठ्या कंपन्याचे पोर्टलच्या डेटाचाही समावेश आहे. यातील अधिक तर पासवर्ड नवीन आहेत आणि मोठ्या हुशारीने ते चोरण्यात आले आहेत.

Apple, Facebook, Google, Telegram Passwords Leaked यासाठी विशेष प्रकारचे मैलवेअर इन्फोस्टीलर्सचा वापर करण्यात आला आहे. या मैलवेअर लोकांच्या कंम्प्युटर आणि मोबाईल द्वारे युजरनेम आणि पासवर्ड चोरून हॅकर्सला पाठवतात. त्यानंतर ही माहिती डार्क वेब वर विकली जाते किंवा सायबर गुन्हे करण्यासाठी तिचा वापर केला जातो.

Passwords Leaked एका अहवालानुसार, लीक झालेली डेटा मध्ये यूजरची विविध सर्विसेस साठी लॉगिन सुचवण्यात आले होते. याद्वारे युजरच्या ईमेलसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, गुगल, टेलिग्राम याची संपूर्ण माहिती होती.

Passwords Leaked यामध्ये डेव्हलपर्स अकाउंटची संपूर्ण माहिती आणि काही सरकारी पोर्टलची ही माहिती होती. अशी अधिक तर माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर ऑर्गनायझेशन केली जाते. यामुळे सायबर हल्ला करण्यासाठी याचा वापर करणे सोपे होते.

बचावासाठीची टिप्स

या सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी तुम्ही तात्काळ आपले पासवर्ड बदलले पाहिजेत. प्रत्येक अकाउंट साठी वेगवेगळ्या पासवर्डचा वापर केला पाहिजे. टू फॅक्टर अथेंटिकेशन ऑन करा. पासवर्ड मॅनेजचा वापर करा. पासकी फीचरचा वापर करा, पासकी लॉगिन साठी बायोमेट्रिक अथेंतिकेशनची आवश्यकता असते. याद्वारे डबल सुरक्षा पुरवली जाते. तसेच अकाउंट मध्ये कुठलही संशयास्पद कृती दिसून आल्यास तत्काळ ॲक्शन घ्या.

डार्क वेबवर विक्री

डेटा ब्रिजचे पासवर्ड स्वस्त दरात डार्क वेबवर विक्री केले जातात. कुठलाही व्यक्ती पासवर्ड खरेदी करून दुसऱ्याच्या अकाउंट्स पर्यंत पोहोचू शकतो. याद्वारे सामान्य नागरिकसह मोठ्या कंपन्या आणि संस्थांची माहितीही लीक होण्याची शक्यता आहे.

डेटा लिक झालय का? असा तपासा…

तुमचा डेटा लीक झाला आहे का? ही माहिती सहज तपासण्यासाठी https://haveibeen owned.com या वेबसाईटवर जा. यावर ईमेल टाकून चेक करा, ही वेबसाईट सांगेल की तुमचा डेटा लिक झाला आहे किंवा नाही. जर तुमचा डाटा लिक झाला असेल तर त्यामध्ये ईमेल पासवर्ड किंवा युजरनेम समावेश असेल. यामध्ये हेही कळेल की यामध्ये किती लोकांचा डेटा आहे व डार्क वेबवर कधी शेअर झाला आहे.

आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्याची ब्लू प्रिंट

तज्ञ या डेटा लीकला ‘ग्लोबल सायबर क्राईम ब्लू प्रिंट’ असल्याचे सांगतात. यामध्ये 30 मोठे डेटा सेटचा समावेश आहे. प्रत्येक डेटा सेट मध्ये लाखो ते अरब लॉगिन क्रेडेंशियल्सचा ( अकाउंटचा) समावेश आहे.

तज्ञांनी तीस डेटा सेट तपासले आहेत, यात जवळपास साडेतीनशे कोटी रेकॉर्ड्स मिळाले आहेत. यामध्ये कॉर्पोरेट आणि डेव्हलपर प्लॅटफॉर्म लॉगिन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या यूजर च्या क्रेडेंशियल्सचा (माहितीचा) समावेश आहे.

हा डेटा 2025 च्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा आहे. तज्ञांचा दावा आहे की, सायबर गुन्हेगारांनी या क्रेडेंशियल्सचा वापर करून यूजरला फसवले आहे. याबरोबरच बिजनेस ई-मेल वर हल्ला होऊ शकतो.