Annasaheb Patil Loan Yojana 2024 In Marathi : बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी 10 लाखांचे कर्ज

Table of Contents

Annasaheb Patil Loan Yojana 2024 Information In Marathi : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 मराठी माहिती

Annasaheb Patil Loan Yojana 2024 राज्यात बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, आर्थिक मदत करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. या योजनेच्या माध्यमातून मराठा समाजातील सुशिक्षित आणि बेरोजगार तरणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत 10 ते 50 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देत आहे.

Annasaheb Patil Loan Yojana 2024 प्रत्येक वर्षी राज्यभरात लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. मात्र उच्च शिक्षण घेऊनही प्रत्येकाला नोकरी मिळेलच याची गॅरंटी राहिलेली नाही. त्यामुळे अशा तरुणांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार त्यांना अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या माध्यमातून बिनव्याजी 10 लाख रुपयांचे कर्ज देऊन आर्थिक मदत करत आहे.

Annasaheb Patil Loan Yojana 2024 देशासह राज्यात शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र त्या तुलनेत रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीयेत, त्यामुळे अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. वाढती बेरोजगारी ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. देशभरात बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रत्येकाला नोकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक तरुण स्वयंरोजगाराकडे वळताना दिसत आहेत. मात्र प्रत्येकाकडे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक भांडवल असेलच असे नाही, अनेकांना आर्थिक अडचणीमुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही. अशा सर्व तरुणांना मदत करण्यासाठी सरकारने अण्णासाहेब पाटील Annasaheb Patil आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना 10 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुण-तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होत आहे. असा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ स्वतःचा व्यवसाय सुरू करणाची इच्छा असणाऱ्या सर्व तरुण-तरुणींना मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ते आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत. यातून त्यांचा रोजगारीचा प्रश्न मिटत आहे.

Annasaheb Patil Loan Yojana

Loan Yojana भारत हा जगात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशात एकूण लोकसंख्येच्या 54% तरुणांची संख्या आहे. यामध्ये पंचवीस वर्षाच्या आतील वयोगटातील तरुणांचा समावेश आहे अशा या तरुण वर्गाला कुशल बनवणे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या व उत्पादन क्षमता वयोगटातील तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनण्याची इच्छा असणाऱ्या आणि त्याची पात्रता असणाऱ्या सर्व तरुण-तरुणींना अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाते.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024

Annasaheb Patil Loan Yojana 2024

Annasaheb Patil राज्यातील सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या Annasaheb Patil Loan Scheme माध्यमातून महाराष्ट्र सरकार अशा उद्योजकांना 10 ते 50 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे अनेक तरुणांना स्वतःचा पायावर उभारण्याची संधी या योजनेच्या माध्यमातून मिळत आहे.

Annasaheb Patil Loan Scheme राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग वर्गातील नागरिकांचा विकास करण्याच्या हेतूने सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. सरकारने सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील Annasaheb Patil आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व तरुणांना आर्थिक मदत केली जाते. राज्यात बेरोजगारीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरत आहे. यामुळे तर बेरोजगार करण्याच्या हाताला काम मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुण-तरुणी स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःला तर रोजगार निर्माण करून घेत आहेतच त्याबरोबरच इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे बेरोजगारीचा तरुणांच्या हाताला काही प्रमाणात का होईना काम मिळत आहे. या माध्यमातून राज्याचा विकास व्हावा या हेतूने सरकारने अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात केली आहे.

Annasaheb Patil Loan Scheme राज्य सरकारने सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेतून मिळाले कर्ज बिनव्याजी दिले जाते. या योजनेमध्ये महामंडळाचे कर्ज घेतल्यास त्या रकमेवरील व्याज महामंडळ भरते. त्यामुळे तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळते. राज्यातील मराठा समाजातील तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जेणेकरून मराठा समाजातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभा राहता येईल. हा या योजनेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे.

Annasaheb Patil Loan Yojana महाराष्ट्र सरकारने ज्यावेळी या योजनेची सुरुवात केली त्यावेळी तरुणांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. बेरोजगार तरुणांना कर्ज देण्यासाठी अनेक बँकांकडून टाळाटाळ आणि विलंब लावण्यात येत होता. त्यामुळे तरुणांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते आणि ही योजना अनुदान स्वरूपात नसल्यामुळे कोणी कर्ज घेण्यास पुढे येत नव्हते, मात्र महामंडळ योजनेचा तरुणांना फायदा होण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या स्थितीत राज्यातील अनेक तरुणांना महामंडळाच्या माध्यमातून कर्ज दिले जाते आणि हे तरुण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहे.

Annasaheb Patil Loan Yojana

राज्यातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येते. विशेष बाब म्हणजे लाभार्थी व्यक्तीने कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास हप्त्याच्या व्याजाची रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यात डीबीटीच्या मदतीने जमा करण्यात येते. याबरोबरच Annasaheb Patil या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती साठी 4 टक्के चा निधी राखीव ठेवण्याची तरतूदही या योजनेत करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी व्यक्तीला या कर्जाची परतफेड 5 वर्षाच्या कालावधीमध्ये करावी लागते.

ठळक मुद्दे :

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024

Annasaheb Patil Loan Yojana 2024

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची थोडक्यात माहिती

Annasaheb Patil Loan Yojana In Short

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा उद्देश

Annasaheb Patil Loan Yojana Purpose

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची वैशिष्ट्ये

Annasaheb Patil Loan Scheme Features

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे तीन प्रकार आहेत

3 Types of Annasaheb Patil Loan Yojana

1 वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

2 गट कर्ज व्याज भरतावा योजना

3 गट प्रकल्प कर्ज योजना

कर्ज मंजुरीनंतर पूर्तता करावयाची कागदपत्रे

करारपत्रे

कर्ज वसुलीचे आगाऊ धनादेश

व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे

Annasaheb Patil Loan Scheme Documents

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठीची पात्रता

Annasaheb Patil Loan Yojana Eligibility

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेचे अटी व नियम

Annasaheb Patil Loan Yojana Terms And Conditions

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत करण्यात आलेले महत्त्वाचे बदल

Annasaheb Patil Loan Scheme

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या बँका

Annasaheb Patil Loan Yojana Including Bank

ऑनलाइन नोंदणी साठीची कागदपत्रे

बँके द्वारे कर्ज घेताना लागणारी आवश्यक कागदपत्रे

व्याज परत करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

Annasaheb Patil Loan Yojana Online Application

FAQ’s

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची थोडक्यात माहिती

Annasaheb Patil Loan Yojana In Short

योजनेचे नावअण्णासाहेब पाटील कर्ज योजना
कधी सुरू झाली27 नोव्हेंबर 1998
विभागकौशल्य विकास व उद्योजकता विकास
लाभार्थीराज्यातील तरुण व्यक्ती  
लाभ काय10 ते 50 लाखापर्यंतचे व्यावसायिक कर्ज
उद्देशनवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे
अर्जाची प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा उद्देश

Annasaheb Patil Loan Yojana Purpose

  • राज्यातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी अण्णासाहेब पाटील Loan Yojana आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळवून देणे हाही या योजनेचा उद्देश आहे. जेणेकरून तरुण आपला व्यवसाय सुरू करण्यात सक्षम बनतील.
  • राज्यातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून बेरोजगार तरुणांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांचा सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यातील सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक अडचण भासू नये, यासाठी महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब पाटील Annasaheb Patil आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून या योजनेच्या माध्यमातून या तरुणांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • राज्यातील बेरोजगारी कमी करून राज्यात नवीन उद्योग सुरू करणे हा सरकारचा उद्देश आहे.
Annasaheb Patil Loan Yojana

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची वैशिष्ट्ये

Annasaheb Patil Loan Scheme Features

महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब पाटील Annasaheb Patil आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

या Loan Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील मराठा समाजातील बेरोजगार आणि सुशिक्षित तरुण अर्ज करू शकतात.

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कुठल्या शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही घरबसल्या तुम्ही या योजनेसाठी मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करू शकता योजनेसाठी अर्ज केल्यानंतर योजनेची सध्याची स्थिती मोबाईलच्या सहाय्याने तपासून शकता.

Annasaheb Patil Loan Scheme या योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन असल्यामुळे या योजनेत मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आहे आणि या योजनेतून सहज कर्ज व लवकरात लवकर कर्ज उपलब्ध होते.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे तीन प्रकार आहेत

3 Types of Annasaheb Patil Loan Yojana

1 वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

2 गट कर्ज व्याज भरतावा योजना

3 गट प्रकल्प कर्ज योजना

यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आपण पाहू

1 वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे :

या योजनेची नोंदणी करण्यासाठीची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा अधिक नसावे
  • जातीचे प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • प्रकल्पचा अहवाल

योजनेच्या माध्यमातून बँकेतून कर्ज घेताना लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • विज बिल
  • उद्योग सुरू करण्यासाठी चा परवाना
  • सिबिल रिपोर्ट
  • बँक खात्याचे स्टेटमेंट
  • व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र

योजनेअंतर्गत व्याज पर्तव्यासाठी ची कागदपत्रे

  • बँक कर्ज मंजुरी प्रमाणपत्र
  • बँक स्टेटमेंट
  • उद्योग सुरू करण्यासाठीचा परवाना
  • व्यवसायाचा फोटो

मुख्यमंत्री वयोश्री योजना

फ्री लॅपटॉप योजना

2 गट कर्ज व्याज परतावा योजना

यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे :

नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा अधिक नसावे)
  • जातीचे प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • प्रकल्पचा अहवाल

बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • उद्योग सुरू करण्यासाठीचा परवाना
  • बँक खात्याचे स्टेटमेंट
  • सिबिल अहवाल
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल
  • व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र

योजनेद्वारे व्याज पर्तव्यासाठीची कागदपत्रे

  • बँक कर्ज मंजुरी प्रमाणपत्र
  • बँक स्टेटमेंट
  • उद्योग सुरू करण्यासाठीचा परवाना
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल
  • व्यवसाय ठिकाणाचा फोटो

3 गट प्रकल्प कर्ज योजना

योजनेची नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे खलीलप्रमाणे :

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे
  • जातीचे प्रमाणपत्र
  • वयाचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • प्रकल्प अहवाल
Annasaheb Patil Loan Yojana

कर्ज मंजुरीनंतर पूर्तता करावयाची कागदपत्रे

या योजनेच्या माध्यमातून कर्ज मंजूर झाल्यानंतर महामंडळमार्फत देण्यात येणारे आर्थिक निधी संबंधित गटाचा बँक खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने संबंधित गट संस्थेकडून कागदपत्राची पूर्तता ऑनलाइन करावे लागते यासंबंधीची विहित नमुने आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

करारपत्रे

1 भागीदारी संस्थेतर्फे/ सर्व भागीदार आणि महामंडळ यांच्यातील करार सरकारने निश्चित केलेल्या दराच्या स्टॅम्प पेपरवर करावा लागेल.

2 महामंडळाने दिलेल्या ऑनलाईन नमुना नुसार जॉईंट लायब्ररी स्टेटमेंट कर्ज Don’t प्राप्त झाल्याची पोचपावती.

कर्ज वसुलीचे आगाऊ धनादेश

अर्जदार गट/ संस्थेच्या संबंधित बँक खात्यात, गट /संस्था सहभागाची 10% रक्कम जमा असल्याबाबत बँक खात्याच्या पासबुकची प्रत, व्यवसायासाठी आवश्यक परवान्याची प्रत, प्रकल्पाच्या किमतीत असलेल्या यंत्रसामुग्री/ साधनसामग्रीचे दरपत्रक व्यवसाय सुरू करण्याच्या जागे संदर्भात दस्तावेज (करारनामा किंवा भाडे पट्टी पावती, ना हरकत प्रमाणपत्र) संबंधित जागेचा सातबारा उतारा, स्थावर जंगम मालमत्ता धारकाचे मूल्यांकन, पी आर कार्ड, नमुना 8अ, मूल्यांकन देण्यात येणाऱ्या कर्ज रकमे पेक्षा अधिक असणे आवश्यक, नोंदणीकृत ग्रहणखत, जनरल करारनामा रक्कम पोचपावती वचन प्रमाणपत्र.

व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे

Annasaheb Patil Loan Scheme Documents

  • बँक कर्ज मंजुरी प्रमाणपत्र
  • बँक स्टेटमेंट
  • उद्योग सुरू करण्यासाठीचा परवाना
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल
  • व्यवसायाचा काढलेला फोटो

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठीची पात्रता

Annasaheb Patil Loan Yojana Eligibility

अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

अर्जदार पुरुष 50 वर्षापर्यंत अर्ज करू शकतो तर महिलांसाठी 55 वर्षापर्यंत अर्ज करू शकतील ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेचे अटी व नियम

Annasaheb Patil Loan Yojana Terms And Conditions

  • अर्जदार व्यक्तीने यापूर्वी सरकारच्या कुठल्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • Annasaheb Patil या योजनेच्या माध्यमातून एका व्यक्तीला एकदाच लाभ दिला जातो.
  • अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • व्यक्तीने घेतलेले कर्ज वेळेवर आणि नियमित न फेडल्यास त्याला व्याज परतावा मिळणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून अर्जदाराने व्यावसायिक वाहनासाठी कर्ज घेतले असले तर या कर्जफेडीचा हप्ता प्रति महिना भरावा लागेल.
  • अर्जदार व्यक्तीकडे कुठल्याही बँकेची थकबाकी असता कामा नये.
  • गट प्रकल्प योजने साठी किमान एक भागीदार उमेदवार 10 वी पर्यंत शिकलेला असावा.
  • गट प्रकल्प कर्ज योजनेअंतर्गत गटाचे भागीदार गटाच्या बँक खात्यात गटाचा हिस्सा म्हणून प्रकल्प किमतीच्या 10 टक्के रक्कम महामंडळ गावाचा हिस्सा वाटप करण्यापूर्वी जमा करणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराने उद्योग आजाराची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास पॅन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड झेरॉक्स अपलोड करणे आवश्यक आहे.
  • व्यवसायिक वाहनांसाठी कर्ज घ्यायचे असल्यास कर्ज फेडीसाठीचा EMI प्रतिमहा असणे आवश्यक आहे.  
  • अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.  
  • अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्ड लिंक असावे.
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत करण्यात आलेले महत्त्वाचे बदल

Annasaheb Patil Loan Scheme

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून Annasaheb Patil Loan Yojana महिला बचत गटांना गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असल्यास त्यांच्यासाठी असलेली जास्तीत जास्त वयाची अट रद्द करण्यात आली आहे.

शासनमान्य कोणताही गट सदस्य 100% शेतकरी वर्गातील असेल किंवा त्या व्यक्तीला शेती संबंधित एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अशांना असणारी 45 वर्ष वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे.

अर्जदाराने ऑनलाइन पोर्टलवर व्यवसाय सुरू असण्याचे कमीत कमी तीन फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या बँका

Annasaheb Patil Loan Yojana Including Bank

सारस्वत को ऑपरेटिव्ह बँक

लोकविकास नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद

श्री वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित कोल्हापूर

श्री वारणा सहकारी बँक लिमिटेड वारणानगर

श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक

श्री आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक

दी नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक

जिल्हा मध्यवर्ती बँक

देवगिरी नागरी सहकारी बँक

दी चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक

राजाराम बापू सहकारी बँक ठाणे

जनता सहकारी बँक

पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक

हुतात्मा सहकारी बँक

राजे विक्रम सिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँक

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक

नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक

यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव बँक

शरद नागरी सहकारी बँक

लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक

प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक

पलूस सहकारी बँक

रामेश्वर को-ऑपरेटिव्ह बँक

रेंडेल सहकारी बँक

कुरुंदवाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक

श्री अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँक

जनता सहकारी बँक

अमरावती मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक

अभिनव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक

जिल्हा मध्यवर्ती बँक

अरिहंत को-ऑपरेटिव्ह बँक

कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक

विदर्भ मर्चंट कॉपरेटिव्ह बँक

दि व्यंकटेश्वरा सहकारी बँक

सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक

दी भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक

गोदावरी अर्बन बँक

श्री नारायण गुरु को-ऑपरेटिव्ह बँक

श्रीकृष्ण को-ऑपरेटिव्ह बँक

नागपूर नागरी सहकारी बँक

सातारा सहकारी बँक

दि हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक

बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक

अनुराधा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक

जनता सहकारी बँक

निशिगंधा सहकारी बँक

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

एस बँक

रायगड सहकारी बँक

ऑनलाइन नोंदणी साठीची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे)
  • जातीचे प्रमाणपत्र
  • जन्माचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ईमेल आयडी
  • प्रकल्पाचा अहवाल
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

बँके द्वारे कर्ज घेताना लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • वीज बिल
  • उद्योग सुरू करण्यासाठीचा परवाना प्रमाणपत्र
  • बँक खात्याचे स्टेटमेंट
  • सिबिल स्कोर रिपोर्ट
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल
  • व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र

व्याज परत करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • बँक कर्ज मंजुरी प्रमाणपत्र
  • बँक स्टेटमेंट
  • उद्योग सुरू करण्यासाठीचा परवाना प्रमाणपत्र
  • प्रकल्प व्यवसाय अहवाल
  • व्यवसायाचा फोटो
Annasaheb Patil Loan Yojana

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

Annasaheb Patil Loan Yojana Online Application

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा Annasaheb Patil Loan Yojana लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम या योजनेची अधिकृत वेबसाईट https://udyog.mahaswayam.gov.in/#/registration ला भेट द्यावी लागेल.  

त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल त्यावर असलेल्या नोंदणी पर्याया निवडा.

त्यानंतर तुमच्यापुढे नवीन नोंदणीसाठी तुमची माहिती विचारली जाईल.  

समोर असलेला अर्ज अचूक पद्धतीने भरा.  

सर्व माहिती भरून झाल्यावर एकदा तपासून घ्या पुढे या बटनावर क्लिक करा.

यानंतर तुमच्यासमोर युजरनेम आणि पासवर्ड येईल त्याचा वापर करून तुम्हाला पुन्हा एकदा लॉगिन करायचे आहे.

त्यानंतर अर्ज करा हा पर्याय निवडा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करायची आहे.

जिल्ह्याची निवड केल्यानंतर तुम्हाला पुढे विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे.  

त्यानंतर शेवटी तुम्हाला विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.  

त्यानंतर समोर असलेल्या सबमिट बटनावर क्लिक करून तुम्ही अर्ज सबमिट करू शकता.  

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची ऑफलाइन पद्धत

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला अण्णासाहेब पाटील Loan Yojana आर्थिक विकास महामंडळसाठी जवळील बँकेत जावे लागेल.

तेथील loan department ला भेट द्यावी लागेल.

तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.

त्यानंतर तेथील कर्मचारी तुम्हाला अर्ज देतील. तो तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक भरावा लागेल.

आवश्यक ती कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडून बँक कर्मचाऱ्यांकडे तो अर्ज जमा करावा लागेल.

बँक कर्मचारी व बँक मॅनेजर तुमच्या अर्जाची पडताळणी करतील.

त्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल.

आशा पद्धतीने तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

FAQ’s

प्रश्न: अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत किती कर्ज मिळते?

उत्तर: अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत 10 लाखापासून 50 लाखापर्यंतचे कर्ज मिळते.

प्रश्न: अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर: अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

प्रश्न: अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कधी सुरू झाली?

उत्तर: 27 नोव्हेंबर 1998 रोजी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सूरू झाली.

प्रश्न: अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा कोणाला होतो लाभ?

उत्तर: देशातील तरुण व्यक्तींना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेचा होतो लाभ.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA