mahatma phule jan arogya yojana update marathi news आरोग्य मंत्री आबिटकर यांची माहिती
mahatma phule jan arogya yojana 2025 : राज्यातील धर्मादाय रुग्णालय सरकारच्या सर्व सवलतींचा फायदा घेतात. त्यामुळे या रुग्णालयांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह इतर सरकारी योजनांची अंमलबजावणी करून त्याचा लाभ राज्यातील जनतेला देणे बंधनकारक आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
याबरोबरच त्यांनी जन आरोग्य योजनेतील उपचार खर्चाची मर्यादा ही वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
mahatma phule jan arogya yojana देशातील धर्मादाय रुग्णालयाला केंद्र आणि राज्य सरकारने सर्व शासकीय योजना स्वीकारणे बंधनकारक केलेले आहे. त्यांनी या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर सरकार आपली भूमिका मांडणार आहे.
धर्मादाय रुग्णालयासाठी सरकारकडून जमीन, पाणी करासह ईतर सवलतीही दिल्या जातात. त्यांना केवळ धर्मादाय असल्यामुळे सरकारकडून या सवलती मिळतात. त्यांना सवलतीच पाहिजे नसते असत्या तर त्यांनी खाजगी रुग्णालय सुरू केले असते.
त्यामुळे सरकारी सवलतीचा लाभ घेणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांना सरकारी सेवा देणे आवश्यक आहे. अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
mahatma phule jan arogya yojana विशेष बाब म्हणजे यावेळी बोलताना आरोग्य मंत्री म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उपचार खर्चाची मर्यादा वाढवण्याचा सरकार विचार करत आहे. अनेक रुग्णालयाची तक्रार आहे की, त्यांना या खर्चामध्ये सेवा देणे पुरत नाही.
mahatma phule jan arogya yojana update marathi news आरोग्य आयुक्तांसह बैठका घेऊन यावर बरेच काम झालेले आहे. छोट्या शस्त्रक्रिया पडवळत नाहीत अशा धर्मादाय रुग्णालयांचा मुख्य आक्षेप होता. आता खर्च मर्यादित वाढ करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी बुधवारी पुण्यामध्ये धर्मादाय रुग्णालयाची बैठक घेतली. या बैठकीला धर्मादाय रुग्णालयाकडून कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले.
mahatma phule jan arogya yojana update news marathi यावर आरोग्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांनी धर्मादाय रुग्णालयाच्या प्रतिनिधींची कान उघडणे केली आहे. तसेच रुग्णालयाच्या वतीने या अधिकाऱ्यांना कुठल्याही निर्णय घेण्याचा अधिकार आहे का असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.