Shravani Somvar 2025 in marathi : श्रावणी सोमवार शिवामुठीची संपूर्ण माहिती एका क्लिक मध्ये

Shravani Somvar Katha in marathi : सोमवार शिवामूठीची कहाणी, आरती

Shravani Somvar 2025 in marathi नमस्कार वाचकहो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून श्रावणी सोमवारच्या शिवमुठीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पूर्ण वर्षातील महत्त्वाचा आणि पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिना सुरू झाला आहे.

Shravani Somvar 2025 in marathi मराठी वर्षातील श्रावण महिना हा विशेष मानला जातो. यावर्षी श्रावण महिना सुरू होतानाच गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आला आहे. म्हणजेच श्रावणाची सुरुवात गुरुपुष्यामृत योगाने झाली आहे. श्रावण महिन्याची सुरुवात शुभ योगाने झाली असल्यामुळे पुण्य फलदायी महिना मानला गेला आहे.

Shravani Somvar 2025 in marathi उत्तर भारतीय पंचांगानुसार श्रावण महिना शुक्रवारी 25 जुलै 2025 पासून सुरू झाला आहे. श्रावण महिन्यामध्ये जे सोमवार येतात त्याला आपण श्रावणी सोमवार म्हणतो. श्रावणी सोमवारच्या दिवशी आपण महादेवाची मनोभावे पूजा करून शिवामुठ वाहतो.

Shravani Somvar 2025 Shivmuth Importance In Marathi शिवामूठ कशी अर्पण करावी? त्या मागचे कारण काय? महत्त्व काय? त्या मागची कथा काय? याची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. चला तर मग सुरुवात करूया संपूर्ण माहिती जाणून घ्यायला.

Shravani Somvar 2025 Shivmuth Importance In Marathi श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जेवढे पुण्य कराल तेवढे कमीच असते. प्रत्येक जण श्रावणात आपापल्या पद्धतीने पुण्याचे काम करतो. श्रावण महिन्याला व्रतवैकल्यांचा राजा असे म्हटले जाते.

या दिवशी दररोज वृत आचारले जातात, कथा वाचल्या जातात, धार्मिक संग्रहांचे वाचन केले जाते. श्रावणातील व्रते जेवढी सांस्कृतिक आणि धर्मगुरू धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे तेवढीच नैसर्गिकदेखील आहेत असे मानले जाते. यावर्षी म्हणजेच 2025 साली श्रावणाची सुरुवात शुक्रवारी झाली आहे. पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै 2025 रोजी आला आहे.

श्रावणी सोमवारचे महत्व काय

आषाढी देवशयनी एकादशीला ब्रम्हांडाचे पालक श्री विष्णू योगनिद्रेत जातात. त्यामुळे चातुर्मास काळात ब्रम्हांडाचे पालकत्व महादेवांकडे असते. श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करणारा महिना मानला जातो.

श्री शिवलीलामृत संपूर्ण अध्याय (1 ते 15)

श्रावणातील प्रत्येक सोमवारला एक विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेव जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवमुठीचे देखील महत्त्व आहे.

श्रावणी सोमवारी शिवमुठीचे व्रत कसे करावे

Shravani Somvar 2025 Shivmuth Importance In Marathi

श्रावणातील जे सोमवार येतात त्या सोमवारी उपवास केला जातो, शिवपूजन केले जाते. महादेवाला प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू (पाचवा श्रावणी सोमवार असल्यास) यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते म्हणजेच पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची, तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची, चौथ्या श्रावणी सोमवारी जवची आणि जर पाचवा श्रावणी सोमवार आला तर सातू ची शिवामूठ वाहिली जाते.

का वाहिली जाते शिवामूठ

Shravani Somvar 2025 Shivmuth Importance In Marathi

Shravani Somvar in marathi प्रत्येक मुलीला असे वाटते की आपण जेव्हा सासरी जातो त्यावेळी आपल्या घरातले सर्व व्यक्ती आवडते बनावे. सासरच्यांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे. तो वसा केल्याने सासुरवाशीन आपल्या सासरच्या माणसांची आवडती बनते.

तो वसा म्हणजे प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू-सासरा, दिरा-भावा, ननंद-जावा, भ्रतारा नावडती ती आवडती करा रे देवा”. असे म्हणत महिला महादेवाची मनोभावे पूजा करतात.

या दिवशी उष्टे खाऊ नये, सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र वहावे.

2025 मध्ये श्रावणी सोमवार किती आणि कधी

Shravani Somvar 2025 in marathi

पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै 2025 शिवामुठ :- तांदूळ
दुसरा श्रावणी सोमवार 4 ऑगस्ट 2025 शिवामूठ :- तीळ
तिसरा श्रावणी सोमवार 11 ऑगस्ट 2025 शिवामूठ :- मूग
चौथा श्रावणी सोमवार 18 ऑगस्ट 2025 शिवामूठ :- जव

सोमवार शिवामूठीची कहाणी

Shravani Somvar Katha in marathi

Shravani Somvar Katha in marathi आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्टं, नेसायला जाडंभरडं. राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास आला.

पहिला सोमवार आला. ही रानीं गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, “बाई बाई, कुठं जातां?” ” महादेवाच्या देवळीं जातों, शिवामूठ वाहतों.” “यानं काय होतं?” “भ्रताराची भक्ति होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलंबाळं होतात. नावडतीं माणसं आवडतीं होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ति होते.” मग त्यानीं हिला विचारलं, “तूं कोणाची कोण?” “मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते.”

त्यांचेबरोबर देवळांत गेली. नागकन्या-देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, “काय ग बायांनो वसा वसतां?”, “आम्ही शिवामुठीचा वसा वसतों.” “त्या वशाला काय करावं?” “मूठ चिमूट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, दोन बेलाचीं पानं घ्यावीं. मनोभावं पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तांदूळ वहावेत.

संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टंमाष्टं खाऊं नये. दिवसा निजूं नये. उपास नाहीं निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळीं आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पांच वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसर्‍यास तीळ, तिसर्‍यास मूग, चवथ्यास जव आणि पांचवा आला तर सातू शिवामूठीकरितां घेत जावे.”

पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या-देवकन्यांनीं दिलं, आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला संगितलं. त्या दिवशीं हिनं मनोभावं पूजा केली. सारा दिवस उपास केला. जावानणंदांनीं उष्टंमाष्टं पान दिलं. तें तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली.

पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरांतून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानांत जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावें पूजा केली आणि “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहें ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तीळ वाहिले.

सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळीं सासर्‍यानं विचारलं. “तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, “माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, कांटेकुटे आहेत. साप-वाघ आहेत, तिथं माझा देव आहे.”

पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊं लागली. घरचीं माणसं मागं चाललीं. “नावडते, तुझा देव दाखव,” म्हणून म्हणूं लागलीं. नावडतीला रोजचा सराव होता. तिला कांहीं वाटलं नाहीं. ह्यांना कांटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली.

आजपर्यंत रानांत कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्यांसहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, हांड्या गलासं लागलीं. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली.

सगळ्यांनीं देवाचं दर्शन घेतलं. नावडाती पूजा करूं लागली. गंधफूल वाहूम लागली. नंतर मूग घेऊन “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहें ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून शिवाला वाहिलें.

राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळीं माणसं बाहेर आलीं. इकडे देऊळ अदृश्य झालं.

राजा परत आला. माझं पागोटं देवळीं राहिलं देवळाकडे आणायला गेला. तों तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हां त्यांने सुनेला विचारलं, ” हें असं कसं झालं?” “माझा गरिबाचा हाच देव. मीं देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हांला दर्शन दिलं.” सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखींत घालून घरीं आणलं. नावडती होती ती आवडती झाली.

जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी. पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

श्रावणी सोमवार आरती शंकराची

Shravani Somvar Aarti in marathi

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा।।
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।१।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।

कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।
आर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय. ।।२।।

देवीं दैत्यीसागरमंथन पैं केले।
त्यामाजी अवचित हळाहळ उठिले।
ते त्वां असुरपणे प्राशन केलें।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले।। जय. ।।३।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।
शतकोटीचे बीज वाचें उच्चारी।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।४।।